कोरोनामुळे ‘या’ देशाच्या पंतप्रधानांचा मृत्यू

Rohit Dhamnaskar

|

Updated on: Dec 14, 2020 | 12:18 PM

एस्वाटिनी हा दक्षिण आफ्रिकेचा भाग आहे. या देशाची लोकसंख्या 12 लाख इतकी आहे. | Eswatini PM dies

कोरोनामुळे 'या' देशाच्या पंतप्रधानांचा मृत्यू
Follow us

जोहान्सबर्ग: कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) विळख्यात सापडलेल्या दक्षिण आफ्रिकेतील एस्वाटिनी या देशाच्या पंतप्रधानांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एस्वाटिनीचे पंतप्रधान एम्बरोसे डलामिनी (Ambrose Dalamini) यांना महिनाभरापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. तेव्हापासून डलामिनी यांच्यावर उपचार सुरु होते. (ESwatini’s prime minister, who tested positive for COVID-19, dies)

एस्वाटिनी या देशात अजूनही राजेशाही आहे. रॉयटर्सच्या माहितीनुसार, रविवारी दुपारी एम्बरोसे डलामिनी यांचे निधन झाले. एम्बरोसे यांना 1 डिसेंबरला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिरही झाली होती. मात्र, रविवारी दुपारी अचानकपणे त्यांचे निधन झाले.

एस्वाटिनी हा दक्षिण आफ्रिकेचा भाग आहे. या देशाची लोकसंख्या 12 लाख इतकी आहे. आतापर्यंत एस्वाटिनीमध्ये 6768 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 127 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.

एम्बरोसे डलामिनी यांनी 2018 मध्ये पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली होती. त्यापूर्वी ते एका कंपनीत मुख्य कार्यकारी पदावर (CEO) कार्यरत होते. त्यांनी बँकिंग सेक्टरमध्ये 18 वर्षे काम केले होते. त्यांनी एस्वाटिनी नेडबँकेचे संचालक म्हणूनही काम पाहिले होते.

‘कोरोना लस राक्षसाकडून आलीय’

कोरोनाचा हाहाकार सुरु असताना संपूर्ण जगाचं लक्ष कोरोना नियंत्रण करणाऱ्या लसीवर (Corona Vaccine) आहे. काही देशांनी तर कोरोना लसीला मंजूरीही दिली आहे. इंग्लंडमध्ये तर लसीकरण अभियानालाही सुरुवात झाली आहे. मात्र, जगातील काही भागात कोरोना लसीवर वादही होताना दिसत आहेत. दक्षिण आफ्रिकेचे (South Africa) मुख्य न्यायाधीश मोगोइंग यांनी तर जग वाट पाहत असलेली कोरोना लस राक्षसाकडून आल्याचे वक्तव्य केले होते.

जग मोठ्या उत्सुकतेने ज्या कोरोना लसीची वाट पाहत आहेत ती लस राक्षसाकडून आली आहे. या लसीमुळे लोकांचा डीएनए ‘खराब’ होईल. जी कोरोना लस देवाकडून आलेली नाही अशी कोणतीही लस मी घेणार नाही. या लसीपासून मी दूर राहीन, असे मोगोइंग यांनी म्हटले होते.

संबंधित बातम्या:

कोरोना पुढील काळात आणखी धोकादायक, परिस्थिती बिघडू शकते, बिल गेटस यांचा इशारा

अमेरिकेत लसीकरणाची मोठी तयारी, मेक्सिकोचीही फायझरच्या लसीला परवानगी

‘कोरोना लस राक्षसाकडून आलीय’, दक्षिण आफ्रिकेच्या मुख्य न्यायाधीशांचं अजब वक्तव्य

(ESwatini’s prime minister, who tested positive for COVID-19, dies)

Non Stop LIVE Update

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI