AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फेसबुकची डोनाल्ड ट्रम्पवर मोठी कारवाई, 2 वर्षांच्या बंदीचं कारण काय?

अमेरिकेच्या संसद परिसरात दंगल भडकावण्याच्या आरोपाखाली फेसबुकने माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Former US President Donald Trump) यांच्यावर मोठी कारवाई केली.

फेसबुकची डोनाल्ड ट्रम्पवर मोठी कारवाई, 2 वर्षांच्या बंदीचं कारण काय?
| Updated on: Jun 05, 2021 | 4:21 AM
Share

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या संसद परिसरात दंगल भडकावण्याच्या आरोपाखाली फेसबुकने माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Former US President Donald Trump) यांच्यावर मोठी कारवाई केली. फेसबुकने (Facebook) ट्रम्प यांचं अकाऊंट 2 वर्षांसाठी म्हणजेच 2023 पर्यंत निलंबित केलंय. 6 जानेवारी 2021 रोजी फेसबुकने U.S. Capitol येथील हिंसाचाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प यांचं अकाऊंट तात्पुरत्या स्वरुपात सस्पेंड (Account Suspend) केलं होतं. फेसबुकने विद्यमान राष्ट्राध्यक्षाला बॅन करण्याची ती तेव्हा पहिलीच वेळ होती (Facebook big suspension action on Donald Trump fb account over U.S. Capitol riots).

डोनाल्ड ट्रम्प यांच्या अकाऊंटवरील 2 वर्षांची बंदी 7 जानेवारी 2021 पासून लागू होईल. या दिवशीच पहिल्यांदा त्यांच्या अकाऊंटचं निलंबन झालं होतं. ट्रम्प यांच्या कार्यकाळात फेसबुकने केलेली ही सर्वात कडक कारवाई होती. काही दिवसांनंतर फेसबुकने हे प्रकरण ओव्हरसाईट बोर्डाकडे हस्तांतरीत केलं. त्यावेळी फेसबुकनं म्हटलं, “ट्रम्प यांच्याकडून दंगलखोरांना तुम्ही माझ्यासाठी खास आहात, माझं तुमच्यावर प्रेम आहे (We love you. You’re very special) असं म्हणणं, त्यांना खरा देशभक्त म्हणणं आणि या दिवसाला इतिहासात लक्षात ठेवलं जाईल असं सांगणं फेसबुकच्या नियमांविरोधात आहे.”

“ट्रम्प यांना सेवेचा उपयोग करु देणं मोठा धोका”

फेसबुकच्या उच्च स्तरीय मंडळाने देखील मागील महिन्यात डोनाल्ड ट्रम्प यांच्या फेसबुक अकाऊंटचं निलंबन कायम ठेवलं होतं. याशिवाय कंपनीला ट्रम्प यांच्यावर योग्य कारवाई करण्यात अपयशी ठरल्याचंही मंडळाने नमूद केलं. ट्रम्प यांचं अकाऊंट बॅन करताना फेसबुकचे प्रमुख मार्क जुकरबर्गने एका पोस्टमध्ये म्हटलं होतं, ‘या क्षणी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आमची सेवा वापरू देणं मोठा धोका आहे.’

ट्रम्प यांच्यावरील बंदीचा निर्णय बोर्डाकडून

यानंतर फेसबुकने हे प्रकरण कंपनीच्या बोर्डाकडे सोपवलं होतं. यात वकील, मानवाधिकार कार्यकर्ते आणि अकॅडमिक्स यांचा समावेश आहे. या बोर्डाला ट्रम्प यांच्यावरील बंदी हटवायची की कायम ठेवायची यावर निर्णय घ्यायचा होता. बोर्डाने म्हटलं, ‘फेसबुकसाठी अनिश्चितकाळापर्यंत निलंबन करणं योग्य ठरणार नाही.’

बोर्डाकडून 6 महिन्यांचा कालावधी

बोर्डाने (Facebook Inc’s Oversight Board) म्हटलं, “फेसबुकजवळ 7 जानेवारीला केलेल्या कारवाईविरोधात चौकशी करुन नवा दंड ठरवण्यासाठी 6 महिन्यांचा वेळ आहे. त्यात नियमांच्या उल्लंघनाचं गांभीर्य आणि भविष्यात होणारं नुकसान या दोघांचाही विचार व्हावा.” यानंतरच फेसबुकने 2 वर्षांसाठी ट्रम्प यांचं अकाऊंट निलंबित करण्याची घोषणा केली आहे.

हेही वाचा :

केवळ अधिकाऱ्यांच्या नेमणुकीने प्रश्न सुटणार नाहीत, सरकारी नियमांचे पालन करावेच लागेल; हायकोर्टाने Twitter ला सुनावलं

केंद्र सरकारच्या नव्या आयटी नियमांना Twitter कडून विरोध सुरुच, Facebook-Google ची माघार

Twitter कडून जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीवर अटी लादण्याचा प्रयत्न; केंद्र सरकारचा पलटवार

व्हिडीओ पाहा :

Facebook big suspension action on Donald Trump fb account over U.S. Capitol riots

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.