Elon Musk : एलन मस्क यांची डोनाल्ड ट्रम्प यांना सणसणीत चपराक, भारतीयांबद्दल प्रामाणिकपणे एक गोष्ट मान्य केली, त्यांच्यामुळेच…
Elon Musk : प्रसिद्ध उद्योगपती आणि टेस्लाचे CEO एलन मस्क यांनी भारतीयांबद्दल प्रामाणिकपणे एक गोष्ट मान्य केली आहे. अमेरिकेत येण्याचे मार्ग रोखणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी मोठी चपराक आहे. सध्या ट्रम्प यांची भूमिका, धोरणं टीकेचा विषय ठरली आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची H-1 B व्हिसा पॉलिसी तसच इमिग्रेशन धोरणासंदर्भातील भूमिका वादग्रस्त आहे. त्यांच्या या निर्णयाचा लाखो भारतीयांना फटका बसला आहे. सध्या हीच इमिग्रेशन पॉलिसी आणि जागतिक प्रतिभा (ग्लोबल टॅलेंट्) यांची जगभरात चर्चा आहे. या सगळ्या चर्चांमध्ये टेस्लाचे CEO एलन मस्क यांनी अमेरिकेतील भारतीय टॅलेंटच महत्व, योगदान मान्य केलय. कुशल भारतीयांमुळे अमेरिकेचा फायदा झाल्याच त्यांनी सांगितलं. एक इंटरव्यूमध्ये एलन मस्क इमिग्रेशन पॉलिसी आणि एंटरप्रेन्योरशिप बद्दल बोलले.
“अमेरिकेत येणाऱ्या प्रतिभावान भारतीयांमुळे अमेरिकेचा खूप फायदा झाला असं मला वाटतं. मला असं म्हणायचं आहे की, अमेरिका भारताच्या प्रतिभेचा सर्वात मोठा लाभार्थी आहे. भारतीय वंशाच्या अनेक व्यक्तींनी अमेरिकी अर्थव्यवस्थेत महत्वाच योगदान दिलं आहे. त्यामुळे विकास आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन मिळालं” असं मस्क म्हणाले. संतुलित इमिग्रेशन पॉलिसीच्या आवश्यकतेवर त्यांनी भर दिला. सीमा नियंत्रणात कमी पडल्याबद्दल त्यांनी बायडेन प्रशासनावर टीका केली.
बाहेरुन येणारे मूळ अमेरिकन्सच्या नोकऱ्या हिसकावतात यावर काय म्हणाले?
“बायडेन यांच्या कार्यकाळात मोकळ्या सीमा हानिकारक होत्या. कारण त्यामुळे गुन्हेगारी तत्वांना अमेरिकेत प्रवेश करण्याची खुली सूट मिळालेली” असं मस्क म्हणाले. सीमेवर तुमचं नियंत्रण पाहिजे. ते होत नसेल तर हास्यास्पद आहे असं त्यांनी सांगितलं. प्रतिभावान अप्रवासी मूळ नागरिकांच्या नोकऱ्या हिसकावत आहेत, या मुद्यावरही मस्क यांनी त्यांचं मत मांडलं. त्यांच्या मते प्रतिभावान लोकांची कमतरता आहे. कुशल अप्रवासी नोकऱ्या हिसकावण्याऐवजी रिकाम्या जागा भरत आहेत असं मस्क म्हणाले.
…तर, पैसा तुमच्याकडे येईल
एलन मस्क म्हणाले की, ‘प्रतिभावान लोकांची नेहमीच कमतरता असते’. मस्क यांनी नव्या उद्योजकांना कठोर मेहनत आणि अपयशासाठी तयार राहण्याचा सल्ला दिला. ‘मी माझ्या कंपनीत जगातील सर्व प्रतिभावंतांना आणण्याचा प्रयत्न करतोय’ असं ते म्हणाले. “जर कोणी समाजात योगदान देत असेल तर ती आनंदाची गोष्ट आहे. जितकं तुम्ही देता, त्यापेक्षा कमावण्याचं लक्ष्य ठेवा. समाजासाठी एक शुद्धा योगदान देणारे बना. हे आनंदाचा शोध घेण्यासारखं आहे. तुम्हाला आर्थिक दृष्ट्या मौल्यवान काही बनवायचं असेल, तर त्यामागे पळू नका. तुम्ही उपयोगी उत्पादनं आणि सेवा बनवा हे चांगलं राहिलं. तुम्ही असं केलं, तर स्वाभाविकपणे पैसा तुमच्याकडे येईल” असं मस्क यांनी सांगितलं.
