AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Covid सारखं पुढचं संकट, थेट हिमनगांतून उगम, नव्या संशोधनाबद्दल वाचलं का?

सगळा अभ्यास केल्यानंतर शास्त्रज्ञांनी काढलेला निष्कर्ष धक्कादायक आहे. या विषाणू संसर्गाचा वेग प्रचंड आहे.

Covid सारखं पुढचं संकट, थेट हिमनगांतून उगम, नव्या संशोधनाबद्दल वाचलं का?
वितळणाऱ्या हिमनगांमुळे असे असंख्य विषाणू समुद्रात पसरण्याची भीतीImage Credit source: social media
| Updated on: Oct 20, 2022 | 12:19 PM
Share

कोरोना महामारीनं (Corona Pandemic) जगाचं कंबरडं मोडलं. अजूनही नव-नवीन व्हेरिएंट (New Variant) आरोग्य व्यवस्थेची झोप उडवत आहेत. अशातच आणखी एक बातमी समोर आली आहे. आधीचा कोरोना विषाणू वटवाघळाकडून आला, चीनकडून आला असं म्हटलं जात होतं. पण आगामी संकट अर्थात आगामी महामारी थेट वितळणाऱ्या हिमनगांपासून (Melting Glaciers ) येणार असल्याचं म्हटलं जातंय. जागतिक तापमान वाढीमुळे मोठ-मोठे हिमनग वितळत आहेत. या हिमशिखरांखाली असंख्य वर्षांपासून अनेक जीवाणू आणि विषाणू दबलेले आहेत.

Glacier

हिमनग वितळल्याने त्याचे पाणी समुद्रात मिसळतेय. यामुळे आधी सागरी जीवांना संसर्ग होईल आणि त्यानंतर पक्षी, इतर प्राण्यांना संसर्ग होईल. अखेरीस माणसांपर्यंत या विषाणूची बाधा पोहोचेल, असं नव्या संशोधनात म्हटलंय.

आर्कटिक सर्कलमधील उत्तरेकडील लेक हेजेनचा नुकताच अभ्यास करण्यात आला. वैज्ञानिकांनी येथील माती आणि इतर घटकांची तपासणी केली. तेथून काही डीएनए, आरएनए घेतले. त्यांचं सिक्वेन्सिंग केलं. कंप्यूटर अल्गोरिदमच्या मदतीने ते नेमके कशाचे डीएनए आहेत, हे शोधलं..

हा सगळा अभ्यास केल्यानंतर शास्त्रज्ञांनी काढलेला निष्कर्ष धक्कादायक आहे. या विषाणू संसर्गाचा वेग प्रचंड आहे.

प्रोसिडिंग्स ऑफ द रॉयल सोसायटी बी मध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, हिमनग जसजसे वितळत जातील, तसा हे विषाणू पसरण्याचा धोका वाढत जाईल. जागतिक तापमान वाढ, हेच यामागील प्रमुख कारण आहे.

विषाणूंचा इतिहास पाहिल्यास, इतरांच्या शरीरात विकसित होण्याचा त्यांचा स्वभाव असतो. मग वनस्पती, माणसं असो वा प्राणी. हे विषाणू परस्परांमध्येही पसरू शकतात. सध्या मोठ्या प्रमाणावर हिमनग वितळत असल्याने असे प्राचीन विषाणू आणि जीवाणू पसरल्याने महामारी येऊ शकते, अशी भीती वैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे.

हवामान बदलामुळे आर्कटिकचे मायक्रोबायोस्फेर बदलेल. हे सर्व बॅक्टेरिया आणि व्हायरस बाहेर पडून नवे शरीर किंवा नवे होस्ट शोधतील. जेणेकरून ते जिवंत राहू शकतील. कोरोना व्हायरसने ज्या प्रमाणे माणसांच्या शरीरात शिरकाव केला, अगदी त्याचप्रमाणे.

चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...