AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Inquiry against former prime minister Imran Khan : माजी पंतप्रधान इमरान खान यांच्या अडचणी वाढणार? ‘त्या’ नेकलसवरून होणार चौकशी

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये गेल्या महिन्याभरात राकीय नाट्य रंगल्यानंतर पंतप्रधान इमरान खान (Imran Khan) यांना माजी व्हावं लागलं आहे. दरम्यान त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत देशातील जनतेला पुन्हा निवडणूकांसाठी तयार रहा असे म्हटले होते. यानंतर त्यांची काळजीवाहू पंतप्रधान म्हणून नेमणूक करण्यात आली होती. आता पाकिस्तानच्या (Pakistan) राजकारणाच्या पुलाखालून बरेच पाणी गेले आहे. आता पाकिस्तानचे नवे पंतप्रधान […]

Inquiry against former prime minister Imran Khan : माजी पंतप्रधान इमरान खान यांच्या अडचणी वाढणार? 'त्या' नेकलसवरून होणार चौकशी
माजी पंतप्रधान इमरान खानImage Credit source: TV9
| Updated on: Apr 14, 2022 | 12:45 PM
Share

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये गेल्या महिन्याभरात राकीय नाट्य रंगल्यानंतर पंतप्रधान इमरान खान (Imran Khan) यांना माजी व्हावं लागलं आहे. दरम्यान त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत देशातील जनतेला पुन्हा निवडणूकांसाठी तयार रहा असे म्हटले होते. यानंतर त्यांची काळजीवाहू पंतप्रधान म्हणून नेमणूक करण्यात आली होती. आता पाकिस्तानच्या (Pakistan) राजकारणाच्या पुलाखालून बरेच पाणी गेले आहे. आता पाकिस्तानचे नवे पंतप्रधान म्हणून मुस्लिम लीगचे नवाज (President of the Muslim League Shahnaz Sharif) यांनी आपला पदभार स्वीकारला आहे. यानंतर मात्र माजी पंतप्रधान इमरान खान यांच्या अडचणी वाढ होताना दिसत आहेत. त्यांच्या मागे आता चौकशीचा ससेमिरा लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता चौकशीचे प्रकरण दुसरेच असून एका नेकलसवरून माजी पंतप्रधान इमरान खान यांची चौकशी होणार आहे. याप्रकरणी असे म्हटले जात आहे की, इमरान खान हे पंतप्रधान असताना त्यांनी 18 कोटी किमतींचा नेकलस (Necklace) विकला. तो त्यांना गिफ्टमध्ये मिळाला होता. जो नियमानुसार त्यांना तो सरकारी तिजोरीत जमा करायाला हवा होता. मात्र माजी पंतप्रधान इमरान खान यांनी तसे न करता तो विकला. यामुळे त्यांची चौकशी होत आहे.

येथील एका दैनिकाच्या रिपोर्टनुसार, माजी पंतप्रधान इमरान खान यांची चौकशी 18 कोटी किमतींचा नेकलस विकल्याप्रकरणी होत आहे. जो त्यांना सरकारी तिजोरीत जमा करायचा होता. मात्र त्यांनी तो आपल्या विशेष सहाय्यक जुल्फिकार बुखारी यांच्याकडे दिला होता. तर बुखारी यांनी तो लाहोर येथील एका सराफ व्यापाऱ्याला तो 18 कोटीत विकला. हे प्रकरण समोर येताच इमरान खान यांच्यावर टीका होत आहे.

काय आहे नियम

येथील एका दैनिकाच्या रिपोर्टनुसार, चौकशी करणाऱ्या FIA ने माजी पंतप्रधान इमरान खान यांची चौकशी सुरू केली आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, एखाद्या व्यक्तिने सरकारी पदावर असताना मिळालेले गिफ्ट अर्ध्या किमतीत घेऊन ते आपल्याकडे ठेऊ शकते. मात्र असे न करता इमरान खान यांनी फक्त काहीच रक्कम सरकारी तिजोरीत जमा केली. पण कायद्याप्रमाणे सरकारी पदावर असणाऱ्या व्यक्तिने मिळालेले गिफ्ट हे सरकारी तिजोरीत जमा करायाचे असते. आणि जर ते आपल्याकडे ठेवायचे असेल तर त्याची अर्धी किंमत मोजावी लागते. तसे न केल्यास तो गुन्हा ठरतो. आता प्रकरणामुळे माजी पंतप्रधान इमरान खान यांची प्रतीमा खराब झाली आहे.

रविवारी इमरान खान यांचे सरकार पडले. दरम्यान इमरान खान यांच्याविरोधात नॅशनल असेंबलीमध्ये अविश्वास ठरावर मतदान झाले. ज्यामध्ये इमरान खान यांच्या पदरात हार आली. आणि त्यांना पंतप्रधान पदावरून पाय उतार व्हावे लागले. त्यानंतर पाकिस्तानमध्ये मुस्लिम लीगचे अध्यक्ष शाहनाज शरिफ यांना पंतप्रधान बनवण्यात आले आहे. तर इमरान खान यांचे सरकार पडण्यामागे त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांची साथ सोडणे आहे. तर विशेषबाब म्हणजे इमरान खान हे पाकिस्तानच्या इतिहासातील पहिले असे पंतप्रधान आहेत ज्यांना अविश्वास ठरावामुळे पंतप्रधान पदावरून पाय उतार व्हावे लागले. तर इमरान खान हे पाकिस्तानच्या इतिहासातील पहिले असे पंतप्रधान आहेत ज्यांनी आपला कार्यकाळ पुर्ण केला आहे.

इतर बातम्या :

सातवीत असताना गरदोर, 14 व्या वर्षी बनली आई! आता स्वतःच मुलीला सांगितला गरोदर होण्यामागचा किस्सा

Pakistan : अखेर शाहबाज शरीफ पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी, देशाचे 23वे पंतप्रधान म्हणून शपथ, मोदींकडून अभिनंदन आणि दहशतवादावरून कानपिचक्या

Pakistan Political Crisis : हेलिकॉप्टर आलं आणि इम्रान खान यांचा गेम पलटला, बाजवांचा बळी देण्याचा प्रयत्न हुकला

6 पती-पत्नी निवडणुकीच्या रिंगणात, सांगली पालिकेच्या निवडणुकीची चर्चा!
6 पती-पत्नी निवडणुकीच्या रिंगणात, सांगली पालिकेच्या निवडणुकीची चर्चा!.
...त्याचाच राग उद्धव ठाकरे यांनी धरला अन्.. संतोष धुरी यांचा नवा आरोप
...त्याचाच राग उद्धव ठाकरे यांनी धरला अन्.. संतोष धुरी यांचा नवा आरोप.
लातूरमध्ये फडणवीसांचे डॅमेज कंट्रोल, देशमुखांच्या योगदानाला सलाम अन्..
लातूरमध्ये फडणवीसांचे डॅमेज कंट्रोल, देशमुखांच्या योगदानाला सलाम अन्...
उद्धव मामूंना खान, शेख चालतात, पण धुरी, देशपांडे नाही, साटम यांची टीका
उद्धव मामूंना खान, शेख चालतात, पण धुरी, देशपांडे नाही, साटम यांची टीका.
इकडे भाजप-काँग्रेसच्या युती, तिकडे सपकाळांचा मोठा निर्णय, नेत्याला थेट
इकडे भाजप-काँग्रेसच्या युती, तिकडे सपकाळांचा मोठा निर्णय, नेत्याला थेट.
जलील यांच्या कारवरील हल्ल्यामागे कोण? दोन मंत्र्यांची नाव आल्यानं खळबळ
जलील यांच्या कारवरील हल्ल्यामागे कोण? दोन मंत्र्यांची नाव आल्यानं खळबळ.
संभाजीनगरात MIM च्या सभेपूर्वीच जलील यांच्या गाडीवर हल्ला, घडलं काय?
संभाजीनगरात MIM च्या सभेपूर्वीच जलील यांच्या गाडीवर हल्ला, घडलं काय?.
ज्याची लाज वाटायला हवी त्यावर माज..चित्रा वाघ यांची ठाकरेंवर जहरी टीका
ज्याची लाज वाटायला हवी त्यावर माज..चित्रा वाघ यांची ठाकरेंवर जहरी टीका.
कांदिवलीतील बेकायदेशीर आरएमसी प्रकल्प बंद करावा, बसपाची मागणी
कांदिवलीतील बेकायदेशीर आरएमसी प्रकल्प बंद करावा, बसपाची मागणी.
बावनकुळेंच्या भाषणादरम्यान घुसला भाजपचा बंडखोर, स्टेजवर आला अन्...
बावनकुळेंच्या भाषणादरम्यान घुसला भाजपचा बंडखोर, स्टेजवर आला अन्....