AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवरा आणि बायकोची विमानातच जुंपली, करावे लागले इमर्जन्सी लॅंडीग…

नवरा आणि बायकोने सार्वजनिकरित्या भांडणे म्हणजे इतरांना मनोरंजनाचा मोफत खजाना असतो. परंतू हेच भांडण जर हजारो फूट उंचीवरील विमानात झाले तर काय परिस्थिती ओढवते याचे हे निदर्शक आहे....

नवरा आणि बायकोची विमानातच जुंपली, करावे लागले इमर्जन्सी लॅंडीग...
fight between wife and husband in plane Image Credit source: TV9MARATHI
| Updated on: Aug 01, 2024 | 2:30 PM
Share

पती आणि पत्नी याचं नातं वेगळच असते. संसार म्हटला की भांड्याला भांड लागतच असेही म्हटले जाते. पती आणि पत्नी सोशली त्याचं नात किती चागलं आहे हे भासवित असले तरी काही ना काही कुरबुरी आणि आदळ आपट घरोघरी सुरुच असते. अनेक जोडपी भररस्त्यात भांडताना दिसतात. काल परवा उत्तर प्रदेशातील व्हायरल झालेल्या एका व्हिडीओ तर पत्नीने पतीचे कॉलर पकडून त्यांना चांगलेच कानफटवल्याच्या व्हिडीओने सोशल मिडीयात हंगामा झाला होता. बाहेर नवरे फुशारक्या मारीत असल्या तरी घरी आल्यावर बायको समोर त्याचं काही चालत नाही अगदी वाघाचं मांजर झालेलं असते. असाच एक मेलोड्रामा विमान उडत असताना घडला आहे.

पती आणि पत्नी यांच्यात अचानक विमानात भांडण सुरु झाले. हे भांडण इतके वाढले की विमानाची इमर्जन्सी लँडींग करण्याची वेळ आली. डेली स्टारच्या वृत्तानूसार अलिकडेच घडलेल्या या घटनेत डबलिन येथून टेकऑफ घेतलेल्या विमानात नवरा आणि बायकोचे भांडण सुरु झाले. हे भांडण इतके विकोपाला गेले की विमानाला रिर्टन यावे लागले. याचा फटका त्या संबंधित कुटुंबासह विमानातील अन्य प्रवाशांनाही बसला.

डबलिनहून फ्लाईट EI738 ने सायंकाळी 7.15 वाजता उड्डाण घेतले. एक तासानंतर क्रने इमर्जन्सीची लँडींगची घोषणा केली. कारण या जोडप्याची हाणामारी इतकी मोठी झाली की त्यांना शांत करण्याचे क्रचे सगळे प्रयत्न व्यर्थ ठरले. दोघेही एकमेकांना लाथा बुक्क्या घालू लागले इतपर्यंत ही मारामारी झाली. जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जात आहे हे लक्षात येताच विमानाने कंट्रोल रुमला माहिती दिली. आणि नाईलाजाने अखेर नॅनटेस एअरपोर्टवर या विमानाची इमर्जन्सी लँडींग करण्यात आली.

अखेर दोन तासांच्या विलंबाने उड्डाण

या नवरा – बायकोच्या भांडणात या नवऱ्याने बायकोला चेहऱ्यावर जोरदार ठोसा मारल्याने ती गंभीर जखमी झाली. त्यानंतर तिचे प्राण वाचविण्यासाठी विमानाची इमर्जन्सी लँडींग झाली. या नवरोबाला पोलिसांना लागलीच अटक केली. अखेर दोन तासांच्या विलंबानंतर हे विमानाने पुन्हा उड्डाण घेतले आणि ते आपल्या गंतव्य स्थानी म्हणजे पाल्मा डी मलोरका एअर पोर्टवर पोहचले. विमानातील प्रवाशांनी या प्रकारानंतर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. या अशा प्रकाराचा इतरांना नाहक त्रास झाल्याने ते नाराज झाले. सोशल मिडीयावर देखील अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.