AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑपरेशन सिंदूरच्या जखमा भरण्यासाठी पाकिस्तान चीनच्या दारात, हवाई ताकद वाढवण्यासाठी मागितले हे विमान

‘ऑपरेशन सिंदूर’ मध्ये तोंडावर आपटल्याने पाकिस्तानने आता आपले हवाई दल आणखीन मजबूत करण्याची तयारी सुरु केली आहे. पाकिस्तान आता चीनकडून KJ-500 AWACS सारखे विमान खरेदी करण्याची तयारी करीत आहे. काय आहे या विमानाचे वैशिष्ट्ये ?

ऑपरेशन सिंदूरच्या जखमा भरण्यासाठी पाकिस्तान चीनच्या दारात, हवाई ताकद वाढवण्यासाठी मागितले हे विमान
KJ-500 AWACS
| Updated on: Apr 11, 2026 | 7:08 PM
Share

भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ ने दिलेल्या जखमा पाकिस्तान अजूनही विसरलेल्या नाही. या युद्धाला एक वर्षे झाले तरी पाकिस्तान अजूनही शांत बसलेला नाही. आता पाकिस्तान या जखमांवर फुंकर मारण्यासाठी चीनकडे आशाळभूतपणे पाहात आहे. पाकिस्तान आता त्यांच्या हवाई दलाला मजबूत करण्याच्या मागे लागला आहे. पाकिस्तान चीनकडून KJ-500 AWACS (  एअरबोर्न वार्निंग एण्ड कंट्रोल सिस्टम ) हे रडार यंत्रणा असलेले विमान खरेदी करण्याच्या विचारात आहे.

वास्तविक ऑपरेशन सिंदुरमध्ये भारतीय वायू सेनेने पाकिस्तानचे एक महत्वाचे Saab 2000 Erieye AWACS विमान टार्गेट केले होते. या घटनेने पाकिस्तानची हवाई टेहळणी आणि कमांड सिस्टीमची कमजोरीला उघडे पाडले होते.

चीनचे विमान का आहे खास?

आता पाकिस्तान या कमतरतेला पूर्ण करण्यासाठी चीनच्या अत्याधुनिक KJ-500 विमान त्यांच्या वायू सेनेत समाविष्ठ करु इच्छीत आहे. KJ-500 हे एक आधुनिक AWACS (Airborne Warning and Control System) विमान आहे. त्यास ‘फ्लाईंग रडार’ म्हणून ओळखले जाते. हे विमान ३६० डिग्रीत टेहळणी करण्यास सक्षम आहे आणि शत्रूची फायटर जेट, मिसाईल आणि ड्रोनला खूप दूर अंतरावरुन अचूक ओळखते.KJ-500 ची सर्वात मोठी खासियत म्हणजे याचे अत्याधुनिक रडार यंत्रणा आणि नेटवर्क-सेंट्रिक वॉरफेअर क्षमता आहे. हे विमान केवळ टेहळणीच नाही तर लढाऊ विमानांना आणि मिसाईल सिस्टीम एकत्र जोडून चांगल्या वॉर मॅनेजमेंटमध्ये मदत करते. यामुळे पाकिस्तानी वायू सेनेला भविष्यात वेगवान आणि अचूक निर्णय घेण्यास मदत मिळू शकते.

काय होणार परिणाम ?

पाकिस्तानी माध्यमातील वृत्तानुसार AWACS विमानासंदर्भात चीन आणि पाकिस्तानच्या अधिकाऱ्यात दरम्यान औपचारिक चर्चा जून २०२५ मध्ये सुरु झाली होती. तसेच सध्याच्या काळात पाकिस्तानजवळ स्वीडनची Saab 2000 Erieye सारखे विमान आहे. ज्यांची क्षमता मर्यादित मानली जाते. या विमानात ३६० डिग्री कव्हरेज नसते आणि काही भागात ‘ब्लाईंड स्पॉट’ देखील रहातो. संरक्षण तज्ज्ञांच्या मते जर पाकिस्तानने KJ-500 या विमानाला त्यांच्या ताफ्यात समाविष्ठ केले तर यामुळे भारत-पाकिस्तानातील हवाई संतुलनावर परिणाम होऊ शकतो. मात्र, भारतीय वायूसेना आधीच आधीच आधुनिक सिस्टीम आणि मजबूत एअर डिफेन्स नेटवर्कने सुसज्ज आहे. ज्यामुळे ऑपरेशन सिंदुरमध्ये भारताने आपली शक्ती सिद्ध केली आहे.

Follow Us
राष्ट्रवादीचं विलिनीकरण?; सुप्रिया सुळेंनी उघड केली इनसाईड स्टोरी...
राष्ट्रवादीचं विलिनीकरण?; सुप्रिया सुळेंनी उघड केली इनसाईड स्टोरी, म्हणाल्या...
हो... कदरूपणा आहे! राऊतांचं शिंदेंना चोख प्रत्युत्तर; म्हणाले...
हो... कदरूपणा आहे! राऊतांचं शिंदेंना चोख प्रत्युत्तर; म्हणाले, बाळासाहेबांच्या शिवसेनेवर दरोडा...
रमेश म्हात्रेंच्या भवितव्याचा आज फैसला होणार?; दोन दिवस रुग्णालयात...
Ramesh Mhatre Case | दोन दिवस रुग्णालयात उपचार...आता थेट कोर्टात!; रमेश म्हात्रेंच्या भवितव्याचा आज फैसला होणार?
ठाकरेंचे 12 नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात?; ऑपरेशन टायगर पुन्हा...
मोठी घडामोड! ऑपरेशन टायगर पुन्हा अ‍ॅक्टिव्ह; ठाकरेंचे 12 नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात?
विनोद तावडेंनी जयंत पाटलांनंतर आणखी एका नेत्याची घेतली भेट, पवारांच्या
Big Breaking | विनोद तावडेंनी जयंत पाटलांनंतर आणखी एका नेत्याची घेतली भेट, पवारांच्या राष्ट्रवादीत चाललंय तरी काय?
उद्धव ठाकरेंचा कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा? थेट सोनम वांगचूक यांना
उद्धव ठाकरेंचा कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा? थेट सोनम वांगचूक यांना फोन केला अन्...
भाजपसोबत जाणाच्या विचारात असलेल्यांना ठाकरेंचा सवाल; दानपेटीची चोरी...
Aaditya Thackeray | दानपेटीची चोरी करणाऱ्यांसोबत जाणार का? भाजपसोबत जाणाच्या विचारात असलेल्यांना आदित्य ठाकरेंचा सवाल
भक्तीचा महासंगम! ज्ञानोबा-तुकाराम पालखीचे आगमन; वारकरी-धारकरी एकत्र
Pune | पुण्यात आज भक्तीचा महासंगम! ज्ञानोबा-तुकाराम पालखीचे आगमन; वारकरी-धारकरी एकत्र
मोठी बातमी! पवारांच्या पक्षाचं सुद्धा ठाकरेंसारखंच... बड्या नेत्याच्या
मोठी बातमी! पवारांच्या पक्षाचं सुद्धा ठाकरेंसारखंच... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर..
राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात मुख्यमंत्र्यांसह...