स्नेक वाईन ते सोन्याच्या मुलाम्याची सिगारेट्स, हुकूमशाह किम जोंग उन यांचे हैराण करणारे शौक
उत्तर कोरियाची जनता उपाशी असताना त्यांचे हुकमशाह किम जोंग उन करोडो डॉलरची महागडे मद्य, मीट,सिगारेट आणि कॉफीवर पैसा खर्च करतात त्यांच्या लाईफस्टाईनने सर्वांना आश्चर्यात टाकले आहे.

उत्तर कोरियाची जनता एकीकडे उपाशी झोपत आहे आणि गरीबीचा सामना करीत आहे. तर दुसरीकडे देशाचे सुप्रीम लीडर किम जोंग उन शाही थाटाचे जीवन जगत आहेत. त्यांच्या शाही जीवनाचे किस्से नेहमीच चर्चेत असतात. त्यात महागडे मद्य, स्पेशल सिगारेट आणि परदेशातून मागवलेले मीटचा समावेश आहे. किम जोंग उन त्यांच्या चिलखती रेल्वेने प्रवास करतात आणि त्यांचे शौक ही जगावेगळे आहेत.
किम जोंग उन महागड्या मद्याचा शौक
ब्रिटनच्या एक संरक्षण तज्ज्ञाच्या हवाल्याने डेली स्टारने दिलेल्या वृत्तानुसार किम जोंग यांनी ब्लॅक लेबल स्कॉच व्हीस्की आणि हेनेसी ब्रँडी खूप पसंत आहे. या मद्याच्या एका बॉटलीची किंमतच 7,000 डॉलर पर्यंत असते. वृत्तानुसार किम दरवर्षी सुमारे 30 दशलक्ष डॉलर पैसा केवळ उच्च प्रतीचे मद्य आयात करण्यावर खर्च करतात.
विदेशी पदार्थांचे शौकीन
खाणे- पिण्याचे शौकीन असलेले किम जोंग उन एखाद्या सेलिब्रिटीहून कमी नाहीत. त्यांना इटली पर्मा हॅम आणि स्विस एममेंटल चीज खास आवडते. किम यांच्या माजी सुशी शेफ यांनी दावा केला होता की किम आणि त्यांचे पिताश्री नेहमीच जगातले महागडे कोबे स्टेक आणि क्रिस्टल शॅपेंनसोबत डीनर करायचे. जंक फूडचा देखील त्यांना खूप आवडते.1997 मध्ये इटलीतून एका शेफला केवळ त्यांच्या कुटुंबासाठी पिझ्झा बनवण्यासाठी बोलावले होते. एवढेच नाही तर किम जोंग उन यांना ब्राझीलची कॉफी खूपच पसंद आहे.ज्यावर ते वर्षाला सुमारे 9,67,000 डॉलर पेक्षा अधिक खर्च करतात.
सिगारेट आणि स्नेक वाईनचे व्यसन
किम जोंग उन यवेस सेंट लॉरेंटची ब्लॅक सिगारेट्स पितात. ही सिगारेट सोन्याच्या पातळथरात लपेटलेली असते. साल 2014 मधील मेट्रोच्या एका वृत्तात दावा केला होता की किम नियमितपणे स्नेक वाईन पितात. ही वाईन पुरुषांनी लैंगिक ताकद वाढवते असे म्हटले जाते. दक्षिण कोरियाची गुप्तहेर संस्थेच्या रिपोर्टनुसार उत्तर कोरियाचे हुकूमशहा केवळ मद्य आणि सिगारेट्चे शौकीन नाहीत तर त्यांचे वजनही 136 किलोपर्यंत पोहचलेले आहे.
