6000 रुपयांचे चिकन खाऊन बकरीद साजरी करताहेत गाझाचे मुसलमान
गाझाच्या लोक युद्ध, विस्थापन, बेरोजगारी आणि महंगाई सारख्या अनेक स्तरांवर संघर्ष करत आहेत. अशात सणाचा उत्साहावर विरझण पडले आहे. 6,111 रुपए प्रति किलो चिकन खाऊन बकरीद साजरी करणे मजबूरी आहे. आणि राजकारण आणि मानवीय संकटाच्या कडव्या सत्याचा सामना करावे लागत आहे.

इस्रायलने केलेल्या हल्ल्यानंतर गाझापट्टीत युद्धाने बकरीदच्या आनंदावर विरझण पडले आहे. येथे सर्वसामान्यावर आर्थिक बोजा वाढला असून वडिलांनी मुलाला २७०० रुपयांचा पार्लेजी बिस्कीटाचा पुडा दिल्याचा व्हिडीओ चर्चेत असतानाच आता चिकन खाऊन सण साजरा करण्याची नौबत तेथील मुसलमानांवर आली आहे.या चिकनची किंमत २५० शेकेल प्रति किलोग्रॅम इतकी आहे. म्हणजे सुमारे ६,१४३ रुपये किलोग्रॅम इतकी महाग झाली आहे.
स्थानीय बातम्यांनुसार, गाझाच्या सेंट्रल बाजारात देइर अल-बलाह मध्ये पहिल्यांदाच चिकन ब्रेस्ट ( छातीचा भाग ) पोहचले आहे. युद्धाआधी मांस सहज मिळत होते. परंतू आता ते इतके महाग झाले आहे की केवळ काही लोकांनाच ते खरेदी करता येत आहे. चिकन ब्रेस्टची किंमत आता $32.44 प्रति पाऊंड म्हटली जात आहे. म्हणजे 6,111 रुपए प्रति किलो झाली आहे. जी युद्धापूर्वीच्या किंमती पेक्षा कितीतरी पट जास्त आहे.
अरब संघटनांनी लावले आरोप
गाझातील काही अरब संघटनांनी या संपूर्ण प्रकरणात इस्रायलवर गंभीर आरोप केले आहेत. संघटनांचे म्हणणे आहे की इस्रायल मानवीय सहायता थांबवून त्यास गाझाच्या व्यापाऱ्यांना पाठवत आहे. जेथे व्यापारी महागात या वस्तूंना विकत आहेत. त्यांनी काही फोटोही जाहीर केले आहेत. ज्यात दावा केला आहे की हे चिकन इस्रायलवरुन आले आहे. आणि जेरुसेलम रब्बीनटच्या कोषेर (यहूदी धार्मिक अनुमती)मुहर वाले आहेत. या संघटनांनी आरोप केला आहे की हे चिकन भूकेने तडपडणाऱ्या विस्थापितांना ११० अमेरिकी डॉलरमध्ये विकले जात आहे.
प्रोटीनच्या कमतरता
जनावरांच्या मांसापासून मिळणारे प्रोटीनची कमी झाल्याने आरोग्य संकटात सापडले आहे. सुरक्षा संकटाने पुरवठा व्यवस्था बाधित झाली आहे. त्यामुळे गाझात मांस आणि अन्य खाद्यसाम्रगीची किंमते आवाक्याबाहेर गेल्या आहेत. बकरीद सारख्या धार्मिक सणाला देखील बहुतांशी कुटुंबे बकरी किंवा दुम्बा देखील खरेदी करु शकत नाहीत. त्यामुळे त्यांना नाईलाजाने चिकन खरेदी करावे लागत आहेत.
अशा पद्धतीने मदत केली आहे..
असे असले तरी, दूसरीकडे गाझा ह्यूमैनिटेरियन फंड (GHF) च्या वतीने गाझात मदत पुरविली जात आहेत. तीन वितरण केंद्राच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे 11.57 लाख फूड पोर्शन वाटले जात आहेत. या शिवाय नव्या योजनेंतर्गत उत्तरी गाझातील लोकांकडे आतापर्यंत 10,560 फूड बॉक्स पोहचवेले गेले आहे. त्यात एकूण सुमारे 6 लाख भोजनाची खुराकचा समावेश आहे. परंतू ही मदतही मागणीच्या तुलनेने कमी आहे.
सणाचा उत्साहावर विरझण
गाझाच्या लोक युद्ध, विस्थापन, बेरोजगारी आणि महागाई सारख्या अनेक स्तरांवर संघर्ष करत आहेत. अशा हालतमध्ये सणाचा उत्साहावर विरझण पडले आहे. 6,111 रुपये प्रति किलो चिकन खाऊन बकरीद साजरी करणे मजबूरी आहे. आणि राजकारण आणि मानवीय संकटाच्या कडव्या सत्याचा सामना करावे लागत आहे.