Gen Z Protest: 22 मृत्यू, लूटमार आणि जाळपोळ…तरुणांच्या ताकदीने आणखी एका देशात सत्तापालट
Gen Z Protest: नेपाळ, केनिया आणि मोरोक्कोनंतर आता आणखी एका देशात तरुणांच्या विरोधासमोर सरकारला झुकण्यास भाग पाडले आहे. येथील राष्ट्राध्यक्षाने Gen Zच्या आंदोलनानंतर सरकार बरखास्त केले आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये जगाने तरुणांचे आंदोलन पाहिले आहेत. या Gen Zच्या आंदोलनापुढे कोणतेही सरकार टिकलेले नाही. आपल्या शेजारील देश नेपाळमध्ये प्रचंड गोंधळानंतर सत्ता बदल झाला. तसेत इतर काही देशांमध्येही असेच काही घडले आहे. आता जगातील आणखी एका देशामध्ये Gen Zनीं केलेल्या आंदोलनापुढे सरकारला नमते घ्यावे लागले आहे. कारण या तरुणांच्या ताकदीपुढे कोणीही टिकणे शक्य नाही. नेमकं कोणत्या देशात हे आंदोलन झाले आहे? तेथील परिस्थिती काय आहे? चला जाणून घेऊया…
सध्या Gen Z Protest हे आफ्रिकेमध्ये सुरू आहे. आफ्रिकेच्या पूर्व किनारपट्टीवर असलेल्या मादागास्कर या बेटवरील देशातील तरुण आणि विद्यार्थी सरकराचा तीव्र निषेध करत आहेत. त्यांच्या ताकदीसमोर राष्ट्राध्यक्षांनी सरकार बरखास्त केले आहे. राष्ट्राध्यक्ष अँड्री राजोइलिना यांनी सोमवारी जाहीर केले की त्यांनी सरकार बरखास्त केले आहे. हे पाऊल राजधानी अँटानानारिवो आणि इतर भागांमध्ये वीज-पाण्याची कमतरता, महागाई आणि मूलभूत सुविधांच्या अभावाला कंटाळून उचलले पाऊल आहे. हे संपूर्ण आंदोलन विद्यार्थी आणि तरुणांनी केले आहे. सुरुवातीला प्रदर्शने शांततापूर्ण होती, परंतु नंतर त्यांना हिंसक वळण आले.
वाचा: नणंदेसोबत बायकोचे रोमँटिक चॅट, नवऱ्याला समजताच… 7 वर्षांचे नात्यात नको ते घडलं
आंदोलनामध्ये 22 जणांचा मृत्यू
संयुक्त राष्ट्रांच्या मते, आंदोलनामध्ये किमान 22 जणांचा मृत्यू झाला आणि 100 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. राजधानीतील परिस्थिती इतकी बिघडली की काही वेळातच सुपरमार्केट, दुकाने आणि बँकांमध्ये लूटमार सुरू झाली. नेपाळप्रमाणेच येथेही आंदोलकांनी अनेक राजकारण्यांच्या घरांवर हल्ले केले. जेव्हा पोलिसांनी जमावाला नियंत्रित करण्यासाठी अश्रुधूर आणि रबरच्या गोळ्यांचा वापर केला, तेव्हा परिस्थिती आणखी चिघळली.
अखेर सरकार कोसळले
या हिंसाचाराने त्रस्त होऊन राष्ट्राध्यक्ष राजोइलिना यांनी अखेर हार मानली आणि जनतेचा राग स्वीकारला. त्यांनी आपल्या टेलिव्हिजन संदेशात सरकारच्या अपयशाबद्दल माफी मागितली आणि नुकसान झालेल्या व्यावसायिकांना मदत करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी तरुणांशी संवादाद्वारे परिस्थितीवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला.
Gen Z Protest का केले आंदोलन?
असे मानले जात होते की Gen Z Protestचा जमाव रस्त्यावर व्यवस्थांबद्दलच्या असंतोषामुळे रस्त्यावर उतरला. परंतु तज्ज्ञांचे मत काही वेगळे आहे. त्यांचे म्हणणे आहे की हा विरोध फक्त वीज-पाण्याच्या कमतरतेमुळे किंवा महागाईमुळे नाही, तर गेल्या अनेक वर्षांच्या दुरवस्थेचा परिणाम आहे. मादागास्कर हा आधीपासूनच आफ्रिकेतील सर्वात गरीब देशांपैकी एक मानला जातो, जिथे 2022 च्या जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार सुमारे 75 टक्के लोकसंख्या दारिद्र्यरेषेखालील जीवन जगत आहे.
