AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हर फिक्र को धुएं में उड़ाता… 14 वर्षांत 4500 सिगारेट्स फुंकले, ऑफिस टाईममध्ये ब्रेकवर ब्रेक; आता भरावे लागणार 9 लाख रुपये !

जपानमधील ओसाका येथे एका सरकारी कर्मचाऱ्याला प्रशासनाने चांगलाच दणका दिला आहे. त्याला 9 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. पण तो का, याचे कारण तुम्हाला कळले तर आश्चर्यचकित व्हाल !

हर फिक्र को धुएं में उड़ाता... 14 वर्षांत 4500 सिगारेट्स फुंकले, ऑफिस टाईममध्ये ब्रेकवर ब्रेक; आता भरावे लागणार 9 लाख रुपये !
Image Credit source: freepik
| Updated on: Mar 31, 2023 | 9:25 AM
Share

ओसाका : cigarette smoking is injurious to health….हे वाक्य आपण प्रत्येकानेच शेकडो वेळा ऐकलं असेल. सिगारेटच्या (cigarette) पाकिटावरही हा इशारा अगदी नीट लिहीलेला असतो, पण स्मोकर्स काही त्याकडे लक्ष देत नाहीत आणि सिगैरेट ओढून शरीराचे नुकसान करून घेत राहतात. काही लोक कधी-कधी सिगरेट पितात, मात्र काही जण तर चेन स्मोकर्स (smokers) असतात, जे एकामागोमाग एक धडाधड सिगारेट्स ओढतच असतात. त्याशिवाय त्यांना चैनच पडत नाही. थोडक्यात त्यांना सिगरेटचे व्यसनच लागलेले असते. मात्र काही वेळा हे व्यसन इतक लागते की बऱ्याच वेळेस लोकं ऑफीसचं काम (office work) सोडून सिगारेट प्यायला पळतात.

बर्‍याच कार्यालयांमध्ये हे सामान्य आहे, परंतु अनेक कंपन्या सिगारेटसाठी अधिक ब्रेक घेणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. जपानमधील एका व्यक्तीच्या बाबतीत असेच घडले आहे, त्याने 14 वर्षात कामादरम्यान ब्रेक घेऊन 4500 पेक्षा जास्त सिगारेट्स ओढल्या. मात्र त्याची ही सवय त्याला भलतीच महागात पडली असून त्यासाठी त्याला आता दंड भरावा लागणार आहे. कंपनीने त्याला असा झटका दिला की आता तो कामाच्या दरम्यान सिगारेट ओढायला क्वचितच उठेल.

नक्की काय आहे हे प्रकरण ?

ऑडिटी सेंट्रल न्यूज वेबसाइटच्या वृत्तानुसार, जपानमधील ओसाका येथील एका सरकारी कर्मचाऱ्याला प्रशासनाने पकडले आहे. असे घडले की सिगारेट ब्रेकसाठी दंड ठोठावलेल्या व्यक्तीची गणना केली गेली तेव्हा सर्वजण आश्चर्यचकित झाले. वास्तविक, त्या व्यक्तीने 14 वर्षांत 4512 वेळा सिगारेट ओढली, तीही ऑफिसच्या वेळेतच! प्रत्येक वेळी तो सिगारेट ओढण्यासाठी ऑफीसमधून बाहेर जात असे. अशा प्रकारे त्याने 4500 वेळा सिगारेटचे ब्रेक घेतले. अशा परिस्थितीत त्याच्यावर कडक कारवाई करण्यात आली.

ऑफीसच्या कामादरम्यान 4512 वेळा ओढली सिगारेट

ओसाकामध्ये कामावर असताना धूम्रपान करणे बेकायदेशीर आहे. याचा फटका या 61 वर्षीय व्यक्तीला सहन करावा लागला आहे. गेल्या 14 वर्षात त्यांनी 4512 वेळा सिगारेट ओढली. तो डायरेक्टर लेव्हलचा कर्मचारी आहे. कामाच्या दरम्यान अनेक सिगारेट ओढत असताना त्यांनी कामाच्या वेळेपैकी 355 तास 19 मिनिटे ब्रेक घेतला. म्हणजेच नोकरीवर असताना त्याने इतके तास कमी काम केले. त्यामुळे त्यांना दंड ठोठावण्यात आला आहे.

6 महिने पगारातून कापले जाणार पैसे

यामुळे आता त्या व्यक्तीला संपूर्ण 11 हजार डॉलर म्हणजेच जवळपास 9 लाख रुपये दंड भरावा लागणार आहे. अहवालानुसार, ओसाका प्रीफेक्चरल गव्हर्नमेंटमध्ये काम करणारी व्यक्ती आणि त्याच्या दोन साथीदारांना शिक्षा झाली आहे. विभागाच्या एचआर टीमला अनेक निनावी तक्रारी प्राप्त झाल्या ज्यात त्याच्या सिगारेट ओढण्याच्या सवयीवर प्रश्न उपस्थित केले गेले. त्या व्यक्तीला पगाराचे 9 लाख रुपये परत करायचे आहेत आणि पुढील 6 महिन्यांसाठी त्याच्या पगारातून 10 टक्के रक्कम कापली जाईल.

वृत्तानुसार, त्या व्यक्तीने लोकल पब्लिक सर्व्हिस कायद्याचे उल्लंघन केले आहे. ओसाकामध्ये सिगारेट ओढण्याबाबत कडक नियम आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांना कामाच्या दरम्यान सिगारेट ओढता येणार नाही, असा नियम 2019 मध्ये तयार करण्यात आला होता.

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.