मस्करी नाही, वास्तव… फक्त 100 रुपयात घर, तुम्हीही करू शकता अर्ज, बोला घेताय का?
स्वतःच्या हक्काच्या घराचं तुमचं स्वप्न देखील होईल पूर्ण... फक्त 100 रुपयांत आलिशान घर होऊल तुसचं, कसा कराल अर्ज, काय असतील अटी? एकदा नक्की घ्या जाणून...

Affordable House: स्वतःच्या हक्काचं घर असाव असं प्रत्येकाला वाटतं. पण घरांच्या वाढत्या किंमती पाहिल्यानंतर थक्क व्हायला होतं. पण 100 रुपयांत घर विकत घेता आलं तर? हो.. तर तुम्हाला 100 रुपयांत घर विकत घेता येईल, ते सुद्धा मुंबईत नाही तर, परदेशात… आता 100 रुपयांत परदेशात घर घेणं शक्त आहे . तेही एका शांत, सुंदर आणि ऐतिहासिक शहरात… जगात असा एक देश आहे जिथे तुम्हाला फक्त 1000 रुपयांत घर मिळू शकतं. त्या देशाचं नाव फ्रान्स आहे. हो, तुम्ही ते अगदी बरोबर वाचत आहात.
फ्रान्समध्ये अम्ब्रेट नावाचं एक छोटं शहर आहे, जे त्याच्या सांस्कृतिक वारशासाठी आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखलं जातं. आता फ्रान्स जगभरातील लोकांना या शहरात घर खरेदी करण्यासाठी एक अतिशय अनोखी ऑफर देत आहे. येथील नगरपालिकेने फक्त 1 युरो (फक्त 100 रुपये) मध्ये घरं देण्याची योजना आणली आहे. पण या सुवर्णसंधीशी काही अटी आणि जबाबदाऱ्या जोडल्या आहेत, ज्या समजून घेणं महत्त्वाचं आहे.
योजनेचा हेतू…
– रिकाम्या घरांचे दुहेरी वापरात रूपांतर करणं….
– स्थानिक शाळा, दुकाने आणि इतर सार्वजनिक संस्थांचे पुनरुज्जीवन करणं…
– आर्थिक विकासाला चालना देणं, नवीन रहिवाशांना आकर्षित करणं
– या उपक्रमाचे परिणाम आता दिसून येत आहेत. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे.
ऑफरसाठी अटी…
ऑफर ऐकण्यासाठी प्रचंड आकर्षित करणारी आहे. पण यासोबत काही जबाबदाऱ्या आणि अटी देखील आहे. या घराचं नूतनीकरण करणं आवश्यक आहे. घराची बाह्य आणि अंतर्गत रचना पूर्णपणे दुरुस्त करावी लागेल आणि आधुनिक राहणीमानानुसार बनवावी लागेल. घरात तुम्हाला कमीत कमी 3 वर्ष तरी राहावं लागले. नूतनीकरणाचं काम एका विशिष्ट वेळेत पूर्ण केलं पाहिजे आणि ते स्थानिक इमारत संहिता आणि नियमांनुसार असलं पाहिजे.
नूतनीकरणाचा खर्च..
फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार, घराचं नूतनीकरण करण्यासाठी सुमारे 20 युरो ते 50 हजार युरो (सुमारे 18-45 लाख रुपये) खर्च येऊ शकतो. हा खर्च घराच्या स्थितीवर आणि दुरुस्तीच्या स्वरूपावर अवलंबून असेल.
कुठे मिळणार घर?
हे घर खरेदी करण्यासाठी फ्रेंच नागरिक तसेच परदेशी नागरिक अर्ज करू शकतात. यासाठी फ्रेंच भाषेचं ज्ञान आवश्यक नाही, परंतु ते स्थानिक संवादासाठी उपयुक्त ठरू शकते. अम्बर्टच्या टाऊन हॉलमधून अर्ज करता येतो. ही योजना अधिक व्यावहारिक करण्यासाठी, स्थानिक प्रशासन कमी व्याजदराने कर्ज आणि नूतनीकरण अनुदानाची सुविधा देखील प्रदान करत आहे. यामुळे आर्थिक भार कमी होईल आणि खरेदीदार चांगल्या दर्जाची घरे बांधू शकतील.
