व्हिएतनामचे एक लाख रुपये भारतात किती होतात ?, रक्कम ऐकून बसेल धक्का
तुम्हाला माहिती आहे की व्हिएतनाम येथे एक लाख कमावले तर ते भारतात किती होतात.ऐकायला ही रक्कम मोठी वाटत असली तर भारतात त्याचे किती होतात हे ऐकले तर तुम्हाला धक्का बसेल...

व्हिएतनामची राजधानी हनोई सोमवारी जबरदस्त उलाढाल पाहायला मिळाली आहे. येथे १५ व्या नॅशनल असेंबलीचे १० वे सत्र सुरु आहे. जी २०२१ पासून ते २०२६ पर्यंतच्या कार्यकाळाची शेवटची बैठक आहे. यावेळी खासदारांच्या अजेंड्यात ५३ विधेयके आणि प्रस्ताव आहेत. हा एक प्रकारचा विक्रम आहे. कारण या आधी अधीच एवढ्या संख्येत विधेयके पास झाली नव्हती. संसदेचे चेअरमन त्रान थान मान यांनी यास ऐतिहासिक सांगत हे सत्र व्हिएतनामच्या विकासाची दिशा ठरवेल असे म्हटले आहे. व्हिएतनाम येथे जर १ लाख महिना कमाई केली तर भारतात त्याचे किती रुपये होतील हे पाहूयात..
व्हिएतनामचे एक लाख रुपये भारतात किती होतात ?
जर एखाद्या व्यक्तीने व्हिएतनाममध्ये १,००,००० व्हिएतनामी डोंग (VND) दर महिना कमावले तर ही रक्कम ऐकायला जर मोठी वाटत असली तरी तिचे मुल्य भारतीय चलन रुपयात कमी आहे. सध्या विनीमय दरानुसार १०,००० व्हिएतनामी डोंगची किंमत सुमारे ३३.४१ भारतीय रुपये होते. म्हणजे एक लाख व्हिएतनामी डोंगचे मुल्य सुमारे ३३४ रुपयांच्या समान आहे. यात भारतात तुम्ही चांगल्यात हॉटेलात जेऊ शकत नाही !
व्हिएतनामी डोंगची किंमत
व्हिएतनामी डोंग जगातील त्या चलनापैकी एक आहे ज्यांचे मुल्य आंतरराष्ट्रीय पातळीवर खूपच कमी आहे.याचे कारण व्हिएतनामची आर्थिक संरचना, सरासरी उत्पन्नाचा स्तर आणि चलन पुरवठ्याचे संतुलन. मात्र येथे राहाणीमानाचा खर्च भारताच्या तुलनेत खूपच कमी आहे. त्यामुळे स्थानिक लोकांच्या दृष्टीने ही रक्कम तुलनात्मकदृष्ट्या अधिक उपयोगी ठरु शकते.
भारत आणि व्हिएतनाम सरासरी मासिक वेतन
जर तुलना करायची झाली तर भारतात सरासरी मासिक वेतन सुमारे १८,००० ते २५,००० रुपयांच्या दरम्यान आहे. तर व्हिएतनाम येथे सरासरी वेतन सुमारे ७ ते १० मिलियन VND म्हणजे सुमारे २०,००० ते २७,००० रुपयांच्या बरोबर होते. याचा अर्थ दोन्ही देशांची पर्चेजिंग पॉवर जवळपास सारखी आहे. परंतू चलनाचे मुल्य मात्र वेगवेगळे आहे.
डॉलरच्या तुलनेत दोन्ही चलनाचे मुल्य कमी
चलन विनिमय दर सतत बदलत असतो.तो अनेक घटकांवर अवलंबून असतो. उदा. विदेशी व्यापार संतुलन, महागाई दर, व्याज दर आणि आर्थिक स्थिरता. भारतीय रुपये आणि व्हिएतनामी डोंग दोन्ही आशियाई चलन आहेत. ज्याचे मुल्य डॉलरच्या तुलनेत खूपच कमी आहे. तरीही भारताच्या अर्थव्यवस्थेचा आकार आणि जागतिक स्थिती अधिक मजबूत मानली जाते.जर कोणी भारतीय व्हिएतनामला पर्यटनासाठी जात असेल तर त्याला कमी किंमतीमुळे खूपच स्वस्तात पडेल. खाणे-पिणे, कपडे आणि निवास यांच्या किंमती भारतापेक्षा येथे २० ते ३० टक्के कमी आहेत. त्यामुळे व्हिएतनामी डोंग जर स्वस्त वाटत असले तर स्थानिक पातळीवर त्याचे महत्व वेगळे आहे.
