AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणपेक्षाही हे दोन देश जास्त हादरले; सैन्य अलर्ट मोडवर, नागरिक पाहातायेत रात्र होण्याची वाट

अमेरिकेनं इराणच्या अणू तळांवर हल्ला केला, अमेरिकेनं उचलेलल्या या पावलामुळे आता मध्यपूर्वेमधील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. याचा मोठा फटाका हा तेथील लहान मोठ्या देशांना बसू शकतो.

अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणपेक्षाही हे दोन देश जास्त हादरले; सैन्य अलर्ट मोडवर, नागरिक पाहातायेत रात्र होण्याची वाट
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 22, 2025 | 6:39 PM
Share

इराण आणि इस्त्रायलमध्ये भीषण युद्ध सुरू आहे, मध्यपूर्वेमधील तणाव आता शिगेला पोहोचला आहे. त्यातच अमेरिकेकडून इराणच्या अणू तळांवर हल्ला करण्यात आल्यानं वातावरण अधिकच तापलं आहे. आखाती मुस्लिम देशांकडून अमेरिकेच्या या हल्ल्याचा निषेध करण्यात आला आहे, अमेरिकेनं अंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन केल्याचं या देशांनी म्हटलं आहे. दुसरीकडे मात्र अमेरिकेच्या या हल्ल्यानंतर बहरीन आणि कुवेत हे दोन देश प्रचंड अस्वस्थ झाले आहेत. येथील सैन्य आणि सरकार अलर्ट मोडवर आहे. येथील सरकार आता रात्र केव्हा होते याची प्रतिक्षा करत आहे. या दोन्ही देशांच्या गुप्तचर संस्था अमेरिकेच्या संपर्कात असून, येथील नागरिकांना सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर अनेक सूचना देण्यात आल्या आहेत.

बहरीननं आपल्या नागरिकांना मुख्य रस्त्यावर न येण्याचा इशारा दिला आहे, ज्या ठिकाणी सैन्य तळ आहेत, अशा परिसरामध्ये जाण्याचं टाळा असं येथील सरकारने नागरिकांना म्हटलं आहे. दुसरीकडे कुवेतनं देखील अमेरिकेनं इराणवर केलेल्या या हल्ल्यानंतर आपल्या नागरिकांना सूचना दिल्या आहेत. मंत्र्यांना बंकरमध्ये लपण्यास सांगण्यात आलं आहे. दिवसा घराच्या बाहेर पडू नका, काही काम असेल तर रात्रीच्यावेळी बाहेर पडा, अशा सूचना कुवेतनं तेथील नागरिकांना दिल्या आहेत.

तुर्कीनं काय म्हटलं

तुर्की हा पाकिस्तानचं मित्र राष्ट्र आहे, सोबतच इराण देखील तुर्कीला आपला मित्र मानतो. अमेरिकेनं इराणवर हल्ला केल्यानंतर आता तुर्कीची यावर पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे, अमेरिकेच्या अशा हल्ल्यांमुळे हे युद्ध जागतिक स्तरावर भडकू शकतं, त्यामुळे असे हल्ले टाळले गेले पाहिजेत, या युद्धावर केवळ चर्चेच्या माध्यमातूनच तोडगा निघायला हवा असं तुर्कीने म्हटलं आहे.

रशियाचा मोठा दावा 

दरम्यान अमेरिकेनं इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर रशियाकडून मोठा दावा करण्यात आला आहे, अनेक देश इराणला आपली अण्वस्त्र देण्यास तयार आहेत, त्यामुळे अमेरिकेचा हा हल्ला व्यर्थ गेल्याचं रशियानं म्हटलं आहे. रशियाचा हा दावा जगाची चिंता वाढवणारा आहे. मात्र रशियानं अद्याप कोणत्याही देशाचं नाव घेतलेलं नाहीये.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.