Imran Khan : तर एकही खासदार जिवंत राहणार नाही, एक एकाचा मुडदा… इमरान खान यांच्या बहिणीची धमकी
Imran Khan : पाकिस्तानची संपूर्ण जनता एकसाथ उभी आहे, असं इम्रान खान यांची बहीण नौरीन नियाजी म्हणाल्या. इम्रान खान यांना कोणी हातही लावता कामा नये, असं झालं तर... काय म्हणाल्या त्या ?

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) चे प्रमुख इम्रान खान (Imran Khan) यांच्याबद्दल अनेक अटकळी बांधल्या जात आहेत. त्यांचं निधन झाल्या दावा करण्यात आला या दाव्यामुळे पाकिस्तामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. त्यानंतर इमरान खान यांचा पक्ष असलेल्या पीटीआय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तानात जोरदार आंदोलनाला सुरुवात केली. अखेर इम्रान खान हे सुरक्षित आहेत, असं सांगण्यात आलं. मात्र याचदरम्यान आता इम्रान खान यांची बहीण नौरीन नियाजी यांनी एक मोठं विधान केलं आहे.
पाकिस्तानातील संपूर्ण जनता त्यांच्यासोबत आहे. इम्रान खान यांना हात लावू नये. जर असं झालं तर असे करणारे लोक वाचणार नाहीत असा इशाराच नौरीन नियाझी यांनी दिला. जोपर्यंत कोणी स्वतः पाहत नाही आणि इम्रान खान हे सुरक्षित आहे, हे सांगत नाही तोपर्यंत आपण कसा विश्वास ठेवायचा, (ते सुरक्षित आहेत) खात्री कशी होणार? असा सवाल त्यांनी विचारला. त्यांना एकाकी ठेवण्यात आले आहे, जी एक मोठी समस्या आहे, असंही त्या म्हणाल्या.
जर इम्रान खान यांच्या जीवाला काही धोका झाला तर…
या लोकांना काय हवं ते कळत नाहीये. इम्रान खान त्याच्या खटल्यांमधून निर्दोष सुटले आहेत. पण या लोकांना त्यांच्यासोबत नक्की काय करायचं तेच मला समजत नाहीये, असं त्या म्हणाल्या. “मला माहित नाही की लाल चौधरी कोण आहे. जर इम्रान खान ठीक आहे, तर ते आम्हाला त्याला भेटू का देत नाहीत?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ‘ ते व्हीव्हीआयपींचा उल्लेख करत आहेत. इम्रान खान नेहमीच सामान्य माणसासारखे जगले. जर त्यांनी इम्रान खानला मारण्याचा विचार केला तर इथे बसलेले सर्व सिनेटरही मारले जातील, कोणीही वाचणार नाही’, अशी धमकीच त्यांनी दिली.
इम्रान खानच्या मृत्यूची बातमी कळताच पोहोचल्या अलिमा खानम
माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या निधनाची बातमी पाकिस्तानात पसरताच त्यांची बहीण अलिमा खानुम आणि खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री सोहेल आफ्रिदी गुरुवारी (27 नोव्हेंबर २०२५) इम्रान खान यांना भेटण्यासाठी आदियाला तुरुंगात पोहोचले. पण जेल प्रशासनाने त्यांना भेटू दिलं नाही. त्यानंतर अलिमा खानम, मुख्यमंत्री सोहेल आफ्रिदी आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) च्या कार्यकर्त्यांनी तुरुंगाबाहेर धरणे आंदोलन केले. अखेर शुकि्रवारी हे आंदोलन संपलं. दबाव वाढल्यानं अखेर जेल प्रशासनाकडूनच स्पष्टीकरण देण्यात आलं आहे, इमरान खान हे सुरक्षित आहेत, त्यांना कुठेही दुसरीकडे हलवण्यात आलं नाही, असं जेल प्रशासनाने सांगितलं.
