AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! इमरान खान यांचा मृत्यू की जिवंत? बहिणीला अडियाल तुरुंगात काय दिसलं? जे सांगितलं त्याने…

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांची अडियाल तुरुंगात हत्या झाल्याचे म्हटले जात आहे. आता त्यांच्या बहिणीने तुरुंगात जाऊन भेट घेतली आहे.

मोठी बातमी! इमरान खान यांचा मृत्यू की जिवंत? बहिणीला अडियाल तुरुंगात काय दिसलं? जे सांगितलं त्याने...
Imran Khan sisterImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Dec 02, 2025 | 7:00 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान हे अडियाल तुरुंगात आहेत. त्यानंतर शहबाज सरकाराने त्यांना कोणालाही भेटण्याची परवानगी दिली नव्हती. आता एक ते दीड महिन्यांपासून इमरान खान जिवंत आहेत की त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं आहे? याबाबत माहिती समोर आली नव्हती. आता इमरान खान यांची बहिण अडियाल तुरुंगात जाऊन भावाची भेट घेऊन आली आहे.

बहिणीला तुरुंगात काय दिसले?

इमरान खान यांची बहिण उज्मा खातून यांनी रावलपिंडीच्या अडियाला जेलमध्ये त्यांची भेट घेतली. सुमारे 20 मिनिटांच्या भेटीनंतर त्या जेलबाहेर आल्या आणि इमरान यांच्या स्थितीबद्दल माहिती देऊ लागल्या. उज्मा यांनी सांगितले की, इमरान खान यांची प्रकृती ठिक आहे, पण त्यांना एकांतवासात (आयसोलेशन) ठेवण्यात आले आहे. जेलमध्ये त्यांना मानसिक त्रास दिला जात आहे. इमरान यांच्या प्रकृतीची शेवटची अधिकृत माहिती 4 नोव्हेंबर रोजी मिळाली होती, जेव्हा त्यांची दुसरी बहिण अलीमा खान त्यांना भेटल्या होत्या. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीबाबत विविध अफवा आणि तर्कवितर्क लावले जात होते.

जेलबाहेर हजारो समर्थकांची गर्दी

मंगळवारी इमरान खान यांची भेट घेण्यासाठी अडियाला जेलबाहेर हजारो पीटीआय समर्थक जमले होते. अनेक ठिकाणी पोलिस आणि समर्थकांमध्ये धक्काबुक्की आणि मारामारी झाली. समर्थक “इमरानला सोडा”, “इमरान खान झुकणार नाही” अशा घोषणा करत होते.

इमरान यांच्या बहिणींनी गेल्या आठवड्यात या प्रकरणी इस्लामाबाद हायकोर्टात धाव घेतली होती. अलीमा खान यांच्या म्हणण्यानुसार, जेल प्रशासन कोर्टाच्या आदेशांचा अवमानना करत आहे. पीटीआय समर्थकांच्या विरोधाला पाहता इस्लामाबाद आणि रावलपिंडीत पुढील दोन आठवड्यांसाठी कलम १४४ लागू करण्यात आले आहे. आता जनतेपुढे शहबाज सरकार झुकले असल्याचे दिसत आहे. इमरान यांच्या बहिणाला त्यांना भेटण्याची परवानगी देण्यात आली.

पाकिस्तानात इमरान खानची भेट घेण्याबाबत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये गदारोळ सुरू होता. आतापर्यंत पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) च्या नेत्यांना इमरान खान यांना भेटू देत नव्हते. इमरान खानच्या बहिणी आणि मुलगे सातत्याने सरकारकडे त्यांच्या जिवंत असल्याचा पुरावा मागत असताना सरकाराने मात्र मौन बाळगले होते. आता अखेर त्यांना भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे.

दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.