Iran Israel युद्ध थांबल्यानंतर चीनकडून नको ते काम, आगीत अजून तेल ओतण्याची कृती
Iran Israel : इराण-इस्रायलमध्ये युद्धविराम झाला आहे. सध्या दोन्ही आघाड्यांवर शांतता आहे. पण चीनकडून आगीत तेल ओतण्याच काम सुरु आहे. मागच्या महिन्यात दोन्ही देशांमध्ये 12 दिवस भीषण युद्ध चाललं.

मागच्या महिन्यात इराण-इस्रायलमध्ये 12 दिवस भीषण युद्ध चाललं. या युद्धात दोन्ही बाजूला मोठं नुकसान झालं. त्यामुळे दोन्ही देशांनी 24 जूनला सीजफायर केलं. आता पुन्हा दोन्ही देशांमध्ये युद्धा होणार नाही, हे अजिबात ठामपणे सांगता येणार नाही. दोन्ही देशांना याची पूर्ण कल्पना आहे. दोन्ही देशांनी आतापासून पुढच्या युद्धाची तयारी सुरु केली आहे. अमेरिकेतून अनेक कार्गो प्लेन्स इस्रायलला पाठवण्यात आली आहेत. इराण सुद्धा एकटा नाहीय, अन्य सहकारी देश ताकद वाढवण्यासाठी इराणची मदत करतायत. इराणची अणवस्त्र क्षमता संपवणं आणि त्या देशात सत्ता बदल ही इस्रायलची युद्ध सुरु करताना दोन मोठी उद्दिष्टय होती. त्यात इराणची अणूबॉम्ब बनवण्याची क्षमता कमी करण्यात इस्रायलला यश आलं. इराणचा अणवस्त्र कार्यक्रम काहीवर्ष मागे गेला. पण सत्ता बदलाच्या दुसऱ्या उद्दिष्टात इस्रायलला यश मिळालं नाही.
24 जूनला इराण-इस्रायलमध्ये युद्धविराम झाला. त्यानंतर चीनकडून इराणला जमिनीवरुन हवेत मारा करणाऱ्या मिसाइल्सच्या बॅटऱ्या देण्यात आल्या आहेत. एका अरब अधिकाऱ्याने गोपनीय सूत्राच्या हवाल्याने मेहर न्यूजकडे हा दावा केला आहे.
हजारो मिसाइल्स डागली
12 दिवसाच्या या युद्धात इराणने इस्रायलवर हजारो मिसाइल्स डागली. त्यामुळे इराणच्या मिसाइल साठ्यात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. चीनने दिलेल्या मिसाइल्स बॅटरीमुळे ही घट भरुन काढायला इराणला भरपूर मदत होणार आहे. चीनकडून इराणला किती मिसाइल बॅटऱ्या मिळाल्यात त्याची माहिती नाहीय. इस्रायलने इराणवर अचूक हल्ले केले. इराणला तसे अचूक हल्ले करता आले नाहीत. पण या मिसाइल्सच्या बळावर इस्रायली शहरांच मोठ्या प्रमाणात नुकसान केलं.
रेकॉर्ड तेलाची आयात
चीनला तेल देऊन इराण या मिसाइल बॅटऱ्यांची किंमत चुकवतोय. चीन इराणचा सर्वात मोठा तेल आयातदार देश आहे. इराणमधून जवळपास 90 टक्के कच्चं तेल आणि कंडेनसेटची बीजिंगला निर्यात होते. अमेरिकेचे मोठ्या प्रमाणात निर्बंध असूनही चीन अनेक वर्षांपासून इराणकडून रेकॉर्ड प्रमाणात तेल आयात करत आहे. कच्चा तेलाचे स्त्रोत लपवण्यासाठी मलेशिया सारख्या देशांचा ट्रांसशिपमेंट केंद्र रुपात वापर केला.
