UNSC | भारत संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य, 184 देशांचा पाठिंबा, पाकिस्तानचा तीळपापड

अस्थायी सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी किमान 128 मतांची आवश्यकता असते. परंतु 192 पैकी 184 देशांनी भारताला भरभक्कम पाठिंबा दिला (India elected as non-permanent member of the United Nations Security Council UNSC)

UNSC | भारत संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य, 184 देशांचा पाठिंबा, पाकिस्तानचा तीळपापड

नवी दिल्ली : भारताला संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचे (UNSC) अस्थायी सदस्यत्व बहाल करण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सदस्य देशांनी भारताला बहुमताने मंजुरी दिल्याने आशिया कालखंडातून भारत बिनविरोध निवडून आला. याबद्दल अमेरिकेकडून जोरदार स्वागत करण्यात आले, तर पाकिस्तान मात्र चवताळल्याचे पाहायला मिळाले. (India elected as non-permanent member of the United Nations Security Council UNSC)

अस्थायी सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी किमान 128 मतांची आवश्यकता असते. परंतु 192 पैकी 184 देशांनी भारताला भरभक्कम पाठिंबा दिल्यामुळे भारताची वाट सोपी झाली. 2021-22 या कालावधीसाठी अस्थायी सदस्य म्हणून भारताची निवड झाली आहे.

भारत हा आशिया कालखंडातून एकमेव उमेदवार होता. भारताने याआधी 2011-2012 कालावधीत अखेरचे सदस्यत्व भूषवले होते. भारत आठव्यांदा संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य म्हणून निवडून आला आहे. यापूर्वी 1950-1951, 1967-1968, 1972-1973, 1977-1978, 1984-1985, 1991-1992 आणि 2011-2012 या कार्यकाळात भारताने सेवा बजावली होती.

हेही वाचा : चीनने भारतीय वाघांना डिवचलं, भारत-चीन वादावर आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या प्रतिक्रिया

193 सदस्यीय संयुक्त राष्ट्रसंघाच्या 75 व्या सत्रासाठी अध्यक्ष, सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्य तसेच आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या सदस्यांसाठी निवडणुका झाल्या. भारतासह नॉर्वे, मेक्सिको आणि आयर्लंड यांनाही यूएनएससीमध्ये स्थान मिळालं.

कशी होते निवड प्रक्रिया?

दरवर्षी संयुक्त राष्ट्र महासभा दोन वर्षांच्या मुदतीसाठी एकूण 10 अस्थायी सदस्यांपैकी पाच जणांची निवड करते. अस्थायी सदस्यांच्या या 10 जागा विभागीय क्षेत्राच्या आधारावर विभागल्या गेल्या आहेत. यापैकी पाच जागा आफ्रिकन आणि आशियाई देशांना, दोन लॅटिन अमेरिकन आणि कॅरिबियन देशांना, दोन पश्चिम युरोपियन देशांना तर एक जागा पूर्व युरोपियन देशांना वाटल्या गेल्या आहेत. मतदानाद्वारे अस्थायी सदस्यांची निवड केली जाते.

अमेरिकेकडून जोरदार स्वागत

भारताला संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य म्हणून निवडल्याबद्दल अमेरिकेने जोरदार स्वागत केले. अमेरिकेने ट्वीट करुन म्हटले आहे की “संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताच्या विजयाबद्दल आम्ही त्यांचे अभिनंदन करतो. आम्ही आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा प्रश्नांवर एकत्र काम करण्यास उत्सुक आहोत.”

पाकिस्तानचा तीळपापड

भारत निवडून येण्यापूर्वीच पाकिस्तानचा तीळपापड होत असल्याचे उघडकीस आले होते. भारत यूएनएससीचा सदस्य झाल्यावर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचे अधिकृत वक्तव्य समोर आले. शाह मेहमूद कुरेशी म्हणाले की, “या व्यासपीठावरुन उपस्थित होणारे प्रस्ताव भारताने नेहमीच नाकारले आहेत. विशेषत: काश्मीरसारखे मुद्दे. काश्मिरींना त्यांचे हक्क दिले गेले नाहीत आणि त्यांची दडपशाही होत राहिली. भारत तात्पुरता सदस्य झाल्याने आभाळ फाटणार नाही, पाकिस्तानदेखील सात वेळा अस्थायी सदस्य झाला आहे.” अशा शब्दात पाकने स्वतःची पाठ थोपटली. (India elected as non-permanent member of the United Nations Security Council UNSC)

हेही वाचा : गलवान आमचंच, भारताने रुळावर यावं, चीनची गुर्मी कायम

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *