500 टक्के टॅरिफच्या वादात भारताचा अमेरिकेला थेट मोठा धक्का, भारतासोबत पंगा घेणे महागात, हजारो कोटींचे…
डोनाल्ड ट्रम्प यांनी वेनेजुएलावर मोठा हल्ला करत त्यांच्या तेलावर नियंत्रण मिळवले. मात्र, आता अमेरिकेला भारताने मोठा इंजा दाखवला. भारताने जगाला आपली ताकद दाखवली आहे. ज्यामुळे भारत आणि अमेरिका संबंध अधिक तणावात येऊ शकतात.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंतर लष्कराने वेनेजुएलावर मोठा हल्ला केला. या हल्ल्यात थेट वेनेजुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांना अटक करण्यात आली. अमेरिकेने हल्ला केला, त्यावेळी निकोलस मादुरो त्यांच्या बेडरूममध्ये पत्नीसोबत होते. मादुरो यांच्यासोबत त्यांच्या पत्नीलाही अटक करून अमेरिकेत आणले गेले. या अटकेदरम्यानचे काही धक्कादायक फोटो आणि व्हिडीओ पुढे आली आणि संपूर्ण जगाची झोप उडाली. एखाद्या देशावर थेट हल्ला करून अमेरिका त्यांच्या अध्यक्षाला अटक करू शकते, असा साधा विचारही कोणी केला नव्हता. आता वेनेजुएलाच्या तेलावर पूर्ण नियंत्रण अमेरिकेचे आहे. वेनेजुएलामधून अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याचा आरोप सातत्याने करण्यात आला. मात्र, अमेरिकेचा खरा डोळा तर वेनेजुएलाच्या तेलावर असल्याचे स्पष्ट झाले. वेनेजुएलावर अमेरिकेने केलेल्या हल्ल्याची निंदा अख्ख्या जगाने केली.
वेनेजुएलाचा तेलावर आता पूर्णपणे अमेरिकेचे नियंत्रण आहे. भारताने रशियाकडून तेल खरेदी करू नये, याकरिता भारतावर मोठा दबाब अमेरिकेचा होता. हेच नाही तर भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद करावी नाही तर आम्ही 500 टक्के टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेने दिसली. भारत, चीन आणि ब्राझील हे देखील रशियाच्या तेलाच्या मुख्य ग्राहक आहे. आता अमेरिका जगभरात वेनेजुएलाचे तेल विकणार आहे.
भारताने वेनेजुएलाचे तेल खरेदी करावे, याकरिता दबाव आहे. जर भारताने वेनेजुएलाचे तेल खरेदी केले तर रशियाचे तेल खरेदी करणे शक्य नाही. अमेरिकेतील एका बड्या अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही भारताला तेल विकू शकतो. भारतात कच्च्या तेलाची प्रचंड मागणी आहे. मात्र, आता नुकताच भारताच्या परराष्ट्र मंत्रालय मंत्रालयाने अमेरिकेच्या विधानावर भाष्य करत स्पष्ट म्हटले की, आम्हाला जिकडून तेल घेणे परवडेल तिकडून आम्ही तेलाची खरेदी करू.
भारताचे हे विधान म्हणजे अमेरिकेसाठी अत्यंत मोठा धक्का म्हणावा लागेल. भारत वेनेजुएलाचे तेल सहजपणे आमच्याकडून खरेदी करेल, असे अमेरिका वाटत असतानाच भारताने हा मोठा धक्का दिला. काही दिवसांपूर्वीच पुतिन हे भारत दाैऱ्यावर आले होते, यादरम्यान त्यांनी भारतासोबत काही महत्वाचे करार केले. यामुळे वेनेजुएलाच्या तेलासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये रशियाला भारत धोका देणार नसल्याचे जवळपास स्पष्टच आहे.
