भारत विसरणार नाही…यूएनमध्ये पाकिस्तानला पाडले तोंडावर, भारताने दिली थेट यादीच
पहलगाम हल्ल्यानंतर भारतीयांमध्ये प्रचंड रोष बघायला मिळाला. काहीही झाले तरीही या हल्ल्याचा बदला घ्या अशी भावना नागरिकांमध्ये होती. भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला. आता भारताने परत एकदा पाकिस्तानला तोंडावर पाडले आहे.

मागील काही दिवसांपासून टॅरिफच्या मुद्द्यावरून भारत आणि अमेरिकेतील संबंध ताणले आहेत. मात्र, भारत आणि अमेरिकेत तणाव सुरू असताना पाकिस्तानने अमेरिकेसोबत जवळीकता साधत काही महत्वाचे करार करून घेतले. पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी पहलगामवर मोठा दहशतवादी हल्ला केला. या हल्ल्यात फक्त हिंदू पर्यटकांना टार्गेट करण्यात आले. भारताने ऑपरेशन सिंदूरच्या मदतीने जोरदार उत्तर पाकिस्तानला देत दहशतवादाचे कंबरडे मोडले. मात्र, भारत आणि पाकिस्तानमध्ये काही दिवसांपूर्वीच युद्धाची गंभीर स्थिती निर्माण झाली.
संयुक्त राष्ट्र मंचावर भारताचा पाकिस्तान विरोधात संताप
आता परत एकदा संयुक्त राष्ट्र मंचावर भारताने पाकिस्तानला जोरदार खडेबोल सुनावले आहेत. भारताने स्पष्ट सांगितले की, दहशतवादाच्या प्रायोजकांकडून धडे घेण्याची अजिबात गरज नाही. मानवाधिकार परिषदेच्या मिटिंगमध्ये भारताने पहलगाम हल्ल्यापासून ते मुंबई हल्ल्यापर्यंत पूर्ण यादीच वाचून दाखवली. भारताचे स्थायी मिशन काऊंसलर क्षितीज त्यागी यांनी मानवाधिकार परिषदेच्या 60 व्या सत्रात पाकिस्तानची चांगलीच कानउघडणी केलीये.
भारत विसरला नसल्याचे सांगून थेट सुनावले खडेबोल
क्षितीज त्यागी यांनी म्हटले की, आम्ही त्या देशाला उत्तर देण्यासाठी परत एकदा तयार आहोत. त्यांनी ठणकावून सांगितले की, भारत 9\11 ला विसरला नाहीये. यावेळी त्यांनी ओसामा बिन लादेनबद्दल बोलताना म्हटले की, पाकिस्तानमध्ये त्याला मारले गेले. उरी, पुलवामा, पठाणकोट, मुंबई याला भारत विसरला नाहीये. मुळात म्हणजे आम्हाला दहशतवाद्यांकडून कोणतेही धडे अजिबातच नाही पाहिजेत. भारताने आपला संताप या परिषदेमध्ये व्यक्त केला.
पहलगाम हल्ल्यानंतर लोकांमध्ये मोठा संताप
पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर संपूर्ण देश हादरला. लोकांमध्ये प्रचंड संताप दिसला. पहलगामच्या हल्ल्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसली. यावेळी दहशतवादी पर्यटकांना कशाप्रकारे मारत होते हे काही व्हिडीओमध्ये दिसत होते. भारताने पाकिस्तानच्या विरोधात थेट ऑपरेशन सिंदूर राबवले. मात्र, यादरम्यान युद्ध स्थिती निर्माण झाली. आता पाकिस्तान हा अमेरिकेला हाताला धरून भारताला त्रास देतान दिसतोय. मात्र, भारताने अमेरिकेच्या अटीही मान्य केल्या नाहीत.
