मोठी बातमी! रशियामध्ये भारतीय सैन्य, युरोपियन युनियनची पोटदुखी, भारताने दिले थेट उत्तर, अमेरिकेसह…
Japad 2025 war studies : अमेरिकेने लावलेल्या टॅरिफनंतर रशिया हा भारतासोबत खंबीरपणे उभा राहिला. हेच नाही तर टॅरिफमुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी त्यांनी स्वत:ची बाजारपेठेत पूर्णपणे खुली करून आम्ही मोठ्या संख्येने भारतीय वस्तूंची स्वागत करू असे स्पष्ट केले.

टॅरिफच्या मुद्द्यावरून भारत आणि अमेरिकेतील अनेक वर्षांचे चांगले संबंध तणावात आहेत. अमेरिकेचे स्पष्ट म्हणणे आहे की, भारताने रशियाकडून तेल खरेदी पूर्णपणे बंद करावी. मात्र, भारताने अमेरिकेच्या अटी 50 टक्के टॅरिफ लावल्यानंतरही मान्य केल्या नाहीत. दुसरीकडे भारताबद्दल धक्कादायक विधाने अमेरिकेकडून केली जात आहेत. हेच नाही तर रशियाचे कपडे धुण्याचे मशिन, टॅरिफचा महाराजा असे बरेच काही अमेरिकेने म्हटले. भारत आणि रशियातील मैत्री अमेरिकेसाठी आणि स्पेशली डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी पोटदुखीचा विषय ठरलाय. त्यामध्येच युद्ध अभ्यासाठी भारताची तुकडी रशियात पोहोचल्याने खळबळ उडाली.
रशिया आयोजित बहुपक्षीय सैन्य अभ्यास ‘जापद 2025’ मध्ये भारत सहभागी झाल्यानंतर युरोपियन युनियनने चिंता व्यक्त केली. आता त्यावर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने थेट आरसा दाखवण्याचे काम केले. मंत्रालयाचे प्रवक्ते रंधीर जयस्वाल यांनी म्हटले की, भारतासोबत अजून बऱ्याच देशांनी या सैन्य अभ्यासात सहभाग घेतला. हेच नाही तर स्वत: अमेरिका देखील यात सहभागी आहे. तुर्की, जर्मनी असे नाटो देशही पर्यवेक्षक म्हणून या सैन्य अभ्यासात प्रत्यक्षात सहभाही आहेतच की.
भारतीय सैन्याची एक तुकडी या अभ्यासात सहभागी झाली. भारतीय लष्कराची एक तुकडी 65 जवानांसह रशिया येथील युद्धा अभ्यासासाठी गेली. मात्र, यानंतर अनेक देशांना ते पचले नाही. रशियाच्या रिपोर्टनुसार, फक्त भाारतच नाही तर 23 देश पर्यवेक्षक म्हणून या जापद 2025 युद्ध अभ्यासाठी सहभागी झाले. बेलारूसच्या म्हणण्यानुसार, अजरबैजान, भारत, चीन, हंगरी, क्यूबा, इंडोनेशिया, इराण. पेरू, कजाकिस्तान, रशिया, सूडान, सर्बिया, तुर्डिये, तुर्कमेनिस्तान, वियतनाम, अमेरिका, जाब्मिया, जिम्बाब्बेसारखे देश या युद्धा अभ्यासा सहभागी झाली.
भारताने स्पष्ट केले की, आमचे रक्षा संबंध आणि सैन्य अभ्यास अनेक देशांसोबत होतात. राहिला तेल खरेदीचा प्रश्न तर आम्ही यावर वारंवार सांगितले की, यामागे कारण नेमके काय आणि भारताची रणनीती काय आहे. फक्त भारतच नाही तर या सैन्य अभ्यासात चीन देखील सहभागी झाला आहे. मात्र, चिंता व्यक्त केली ती म्हणजे फक्त आणि फक्त भारताबद्दलच.
