AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जग बघतच राहिले, भारताने करून दाखवले, होर्मुज खाडीत भारताचा मोठा दणका, थेट सरकारने..

इराण अमेरिका युद्धात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. कोणत्याही क्षणी इराणवर मोठा हल्ला होऊ शकतो, असे सांगितले जात आहे. हल्ल्याबाबत घडामोडींनाही वेग आला. त्यामध्येच आता भारताकडून जगाची झोप उडवणारा निर्णय घेण्यात आला.

जग बघतच राहिले, भारताने करून दाखवले, होर्मुज खाडीत भारताचा मोठा दणका, थेट सरकारने..
Strait of Hormuz
| Updated on: May 20, 2026 | 12:35 PM
Share

इराण आणि अमेरिका युद्धात संपूर्ण जग संकटात आहे. होर्मुज खाडी गेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून बंद आहे. अनेक देशांमध्ये कच्च्या तेलाचे संकट बघायला मिळतंय. भारतातही पेट्रोल आणि डिझेलच्या भावात मोठी वाढ झाली. चार वर्षापासून केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढवले नाही. मात्र, त्यानंतर आता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये वाढ करण्यात आली. पाच दिवसांमध्ये दोनदा या किमती वाढवण्यात आल्या. इराण आणि अमेरिका युद्धाचा भारताला थेटपणे फटका बसत आहे. जागतिक बाजारात तेलाच्या किमतीमध्ये वाढ होत आहे. तेलाच्या किमती जवळपास 50 टक्क्यांनी वाढल्या आहेत. भारताच्या शेजारी देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये सतत वाढ होतंय. एलपीजी गॅसची देखील मोठी समस्या आहे. यादरम्यानच भारताने मोठी कामगिरी केली. भारताने असे काही केले की, जगातील एकाही देशाला हे करता आले नाही.

भारताने असे काही केले की, पूर्ण जग फक्त पाहतच राहिले. भारताने थेट होर्मुज खाडीतून आपले जहाज पाठवले. इराण आणि अमेरिका यांच्या धमक्यांना भीक न घातला होर्मुज खाडीतून आपले जहाज पाठवले. होर्मुज खाडीत आता फक्त इराणच नाही तर अमेरिकेचीही नाकेबंदी आहे. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, सरकारी मालकीच्या शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे टँकर होर्मुझच्या सामुद्रधुनीतून पर्शियन आखाताकडे जाण्यासाठी निघाले.

भारतीय नौदल आणि तेल शुद्धीकरण कंपन्यांच्या मंजुरीची वाट पाहत आहेत. हे टँकर तेल गोळा करण्यासाठी मध्य पूर्वेतील तेल पुरवठादार देशांकडे प्रवास करणार आहेत. संबंधित सूत्रांच्या हवाल्याने ब्लूमबर्गने वृत्त दिले आहे की, इराण अमेरिका-इस्रायल संघर्ष सुरू झाल्यापासून हा अशाप्रकारचा पहिलाच निर्णय आहे. सरकारकडून अंतिम मंजुरी मिळताच भारतीय जहाजे होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या दिशेने प्रवास सुरू करतील.

होर्मुज खाडी बंद असताना भारताकडून मोठे निर्णय घेतले जात आहेत. हेच नाही तर काही जहाजही होर्मुज खाडीतून भारताचे जोडले जात आहेत. होर्मुज खाडीत भारतीय जहाज अजूनही मोठ्या प्रमाणात आहेत. भारतात कच्च्या तेलाची कोणतीही कमी होऊ नये, याकरिता भारताकडून मोठे निर्णय घेतले जात आहेत.

Follow Us
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला