पाकिस्तानी लष्कर हादरलं, भारताची थेट वाढली ताकद, जोधपूर सीमेवर..
पाकिस्तान आणि भारतातील संबंध तणावात आहेत. पाकड्यांकडून सातत्याने कुरापती सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर भारताकडून लष्कराची ताकद वाढवली जात आहे. ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने पाकड्यांना सळो की पळो करून सोडले होते.

भारतीय लष्कराची ताकद वाढवण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न केला जात आहे. रशियासोबत भारताने काही महत्वपूर्ण संरक्षण करार केली. त्यामध्येच अमेरिकेकडून खरेदी केलेल्या सहा अपाचे AH-64E अटॅक हेलिकॉप्टरपैकी शेवटचे तीन हेलिकॉप्टर लवकर भारतात दाखल होणार आहेत. या घातक तीन हेलिकॉप्टरमुळे भारतीय लष्कराची ताकद वाढणार आहे. हे हेलिकॉप्टर अत्याधुनिक असून रात्रीही ऑपरेशन करू शकते. या AH-64E अटॅक हेलिकॉप्टरमुळे आता पाकिस्तानही झोप उडाली. हे जगातील सर्वात प्रगत हल्ला करणारी हेलिकॉप्टर आहे. भारताने ही हेलिकॉप्टर जोधपूरमध्ये तैनात करण्याचा निर्णय घेतला. यामुळे पाकिस्तानसोबतच्या पश्चिमी सीमेवर भारताची ताकद अधिक वाढेल. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने जो हल्ला केला. त्या हल्ल्यामध्ये पाकिस्तान लष्कराचे कंबरडे मोडले.
भारताकडून 2020 मध्ये हा करार करण्यात आला होता. ज्याच्या माध्यमातून अमेरिकेने भारताला AH-64E अटॅक हेलिकॉप्टर दिली. जोधपूरला हे हेलिकॉप्टर पाठवण्यापूर्वी त्याची पूर्ण तपासणी केली जाईल. संपूर्ण ऑर्डर पूर्ण झाल्यावर, लष्कराची पहिली अपाचे स्क्वाड्रन पूर्णपणे कार्यान्वित होईल. भारताच्या लष्कराने या अटॅक हेलिकॉप्टरचे प्रशिक्षण अमेरिकेत जाऊन अगोदरच घेतले आहे. हे हेलिकॉप्टर कसे ऑपरेट करायचे याचे प्रशिक्षण देण्यात आलंय. जोधपूर सीमेवर ही हेलिकॉप्टर जाणार असल्याने पाकड्यांनी धसका घेतला आहे.
AH-64E अटॅक हेलिकॉप्टर अत्यंत घातक आहे. बंकर नष्ट करण्याचीही त्याच्यात क्षमता आहे. स्टिंगर हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र आहे. 30 मिमी चेन गन आणि रॉकेट्स आहे. नाईट व्हिजन, सर्व हवामानात उड्डाण करण्याची क्षमता आणि शत्रूच्या हल्ल्यांपासून संरक्षण करण्याचे खास वैशिष्ट या हेलिकॉप्टरमध्ये आहे. हे हेलिकॉप्टर जोधपूर येथील 451 एव्हिएशन स्क्वाड्रनमध्ये तैनात केले जातील.
पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल जनरल असीम मुनीर यांनी दोन ते तीन दिवसांपूर्वीच भारत- पाक सीमेजवळ येऊन लष्कराची भेट घेतली. त्यांनी चेतावणी देत म्हटले की, देशांतर्गत आणि बाहेरील धोक्यांना उत्तर देण्यासाठी पाकिस्तानी सैन्य तयार आहे. पाकिस्तानातून आलेल्या दहतवाद्यांनी पहलगाममध्ये केलेल्या दहशतावादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये युद्धाती स्थिती निर्माण झाली होती. दोन्हीकडूनही हल्ले सुरू होते. त्यामध्येच भारतीय लष्कराने आपली ताकद जगाला दाखवून देत पाकड्यांना सळो की पळो करून सोडले होते.
