AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दसऱ्याच्या दिवशी आंतरराष्ट्रीय बाजारातून आनंदाची बातमी! अमेरिकेला मोठा दणका, या गोष्टी होणार स्वस्त, युरोपीय देशांनी…

EFTA Agreement : अमेरिकेने लावलेल्या टॅरिफनंतर भारतामध्ये चिंतेचे वातावरण बघायला मिळाले. काही व्यापारावर मोठा परिणाम टॅरिफचा झाला. आता भारतासाठी अत्यंत आनंदाची बातमी येताना दिसत आहे.

दसऱ्याच्या दिवशी आंतरराष्ट्रीय बाजारातून आनंदाची बातमी! अमेरिकेला मोठा दणका, या गोष्टी होणार स्वस्त, युरोपीय देशांनी...
EFTA Agreement
| Updated on: Oct 02, 2025 | 11:19 AM
Share

अमेरिकेने लावलेल्या टॅरिफनंतर मोठा फटका भारताला बसला. अमेरिकेत होणारी तब्बल 70 टक्के निर्यात बंद झाली. हे नुकसान भरून काढण्यासाठी भारताकडून विविध पर्याय शोधली जात आहेत. भारत आणि युरोपियन मुक्त व्यापार संघटना (EFTA) यांच्यातील मुक्त व्यापार करार हा चार प्रमुख युरोपीय देशांचा समूह आहे. नॉर्वे, आइसलँड, लिकटेंस्टाईन आणि स्वित्झर्लंड. या चार देशांसोबत भारताचा हा पहिलाच मुक्त व्यापार करार आहे. या चार देशांसोबत भारत व्यापार करणार आहे. या करारानुसार, 15 वर्षात सुमारे 8.86 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक मिळण्याची अपेक्षा आहे. हेच नाही तर यामुळे भारतात 10 लाख नवीन रोजगार निर्माण होण्याची संधी देखील आहे.

मुळात म्हणजे भारताच्या दृष्टीकोनातून हा करार अत्यंत महत्वाचा आहे. फक्त व्यापार संबंधच मजबूत होणार नाहीत तर भारतीय निर्यातदार आणि उद्योगपतींसाठी ही नवीन बाजारपेठ असणार आहेत. EFTA ने भारताच्या 99.6 टक्के निर्यातीवर कर सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. ही भारतासाठी अत्यंत मोठी दिलासादायक बाब आहे. भारतीय व्यापाऱ्यांना एक वेगळी आणि नवीन बाजारपेठ या माध्यमातून मिळणार आहे.

भारतीयांसाठी दिलासा असा की, एफटीएच्या अंमलबजावणीमुळे काही गोष्टी भारतीय बाजारपेठेत आता स्वस्त होणार आहेत. कपडे, बिस्किटे, चॉकले, सुकामेवा, कॉफी, घड्याळे यांच्या किंमती  कमी होतील. केमिकल्स आणि प्लास्टिक प्रोडक्ट्स देखील स्वस्त होण्याचे मोठे संकेत आहेत. अमेरिकेने भारतावर मोठा टॅरिफ लावला. त्यानंतर आता या चार देशांची बाजारपेठ भारताला मिळालीये.

भारताने मोठे पाऊस उचलत आतापर्यंत 16 देश आणि गटांसोबत FTA वर स्वाक्षरी केली आहे. यामध्ये भूतान, श्रीलंका, सिंगापूर, मलेशिया, कोरिया, जपान, थायलंड,ऑस्ट्रेलिया, यूके, यूएसई, मॉरिशससह अन्य देशांचा समावेश आहे.  एफटीएनुसार, व्यापार करार हा दोन किंवा अधिक देशांमधील एक करार असतो. जो व्यापारावरील शुल्क कमी करतो किंवा काढून टाकतो. त्याचा उद्देश त्या देशांमधील व्यापाराला चालना देणे आणि व्यापारातील अडथळे दूर करणे आहे.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.