अमेरिका भारतावर 20-25 टक्के टॅरिफ लादणार? जाणून घ्या..
भारताला चांगला मित्र आहे, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं असलं तरी देखील अमेरिका भारतावर टॅरिफ लादू शकते, असे संकेत मिळत आहे. भारतावर 20 ते 25 टक्के शुल्क (टॅरिफ) लादण्याचे संकेत आहे.

अमेरिकेच्या मनात नेमकं काय आहे हे कळायला मार्ग नाही. भारत हा चांगला मित्र आहे, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. पण, इतर कोणत्याही देशापेक्षा जास्त शुल्क आकारले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी 1 ऑगस्ट 2025 च्या टॅरिफ डेडलाइनच्या दोन दिवस आधी हे मोठं विधान केलं आहे. मागच्या काही आठवड्यांपासून ट्रम्प म्हणत आहेत की, अमेरिका भारतासोबत सात-एक कराराच्या जवळ आहे. असं असलं तरी आता टॅरिफवर पुन्हा एकदा ट्रम्प सरकार लादण्याचा विचार करत असल्याचं सध्या तरी दिसत आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर भरमसाठ कर लादण्याची धमकी दिली आहे. ते म्हणाले की, भारतावर 20 ते 25 टक्क्यांपर्यंत शुल्क लादले जाऊ शकते. मात्र, दोन्ही देश व्यापार करारावर वाटाघाटी करत असल्याने अंतिम शुल्क अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही, असे ते म्हणाले.
हा करार अद्याप अंतिम झालेला नाही, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. स्कॉटलंडच्या पाच दिवसांच्या दौऱ्यावरून परतल्यानंतर एअर फोर्स वनमधून घेतलेल्या पत्रकार परिषदेत ट्रम्प म्हणाले की, भारताने 20 ते 25 टक्के शुल्कासाठी तयार राहावे.
भारतावर जास्त शुल्क आकारल्याचा आरोप
भारताने इतर देशांच्या तुलनेत अमेरिकेवर जास्त शुल्क लादल्याचा आरोप करत आता आपण पदभार स्वीकारत असल्याने हे सर्व संपेल, असे त्यांनी सांगितले. भारतावर 20 ते 25 टक्के शुल्क आकारले जाणार का, असे विचारले असता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, ‘होय, मला तसे वाटते. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा भारत-पाकिस्तानमधील शस्त्रसंधीचे श्रेय घेतले. भारत माझा मित्र आहे. त्यांनी माझ्या विनंतीवरून पाकिस्तानबरोबरचे युद्ध संपवले. भारतासोबतचा करार अद्याप अंतिम झालेला नाही.’
भारताला एक चांगला मित्र म्हणून संबोधले
‘’भारत हा चांगला मित्र आहे, पण इतर कोणत्याही देशापेक्षा जास्त शुल्क आकारले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 1 ऑगस्ट 2025 च्या टॅरिफ डेडलाइनच्या दोन दिवस आधी हे वक्तव्य केले आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून ट्रम्प म्हणत आहेत की, अमेरिका भारतासोबत सात-एक कराराच्या जवळ पोहोचली आहे. सध्या तरी 1 ऑगस्टच्या डेडलाइनपूर्वी कोणत्याही अंतिम व्यापार कराराची घोषणा होण्याची शक्यता नाही.
दरम्यान, आता अमेरिकेच्या मनात नेमकं काय आहे, ते पुन्हा टॅरिफचा वाद निर्माण करणार का? की मित्र-मित्र म्हणून टॅरिफ लादणार, हे येत्या काळातच कळू शकेल.
