AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

US Tariff On India : ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे भारताचं किती लाख कोटीचं नुकसान? आकडा बाहेर आला

US Tariff On India : भारताने श्रेय दिलं असतं, तर नोबेल शांती पुरस्कारासाठीचा दावा अधिक भक्कम झाला असता. रशिया-युक्रेन युद्ध रोखण्यात अपयश हे सुद्धा ट्रम्प यांच्या नाराजीच एक कारण आहे. म्हणून रशियाकडून तेल खरेदीच कारण पुढे करुन भारतावर टॅरिफ लावलाय.

US Tariff On India : ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे भारताचं किती लाख कोटीचं नुकसान? आकडा बाहेर आला
| Updated on: Aug 29, 2025 | 4:06 PM
Share

अमेरिकेने लावलेल्या 50 टक्के टॅरिफमुळे भारताचं 52 लाख कोटींच नुकसान होऊ शकतं. जेफरीज इक्विटी स्ट्रेटजी ग्लोबल हेडचे क्रिस्टोफर वुड यांनी हा दावा केला आहे. ही एक ब्रोकरेज फर्म आहे. वुड यांनी आपलं वीकली न्यूजलेटर ‘ग्रीड एंड फियर’ मध्ये म्हटलय की, डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेल्या 50% टॅरिफमुळे भारतीय अर्थव्यवस्थेच 55-60 बिलियन डॉलरच नुकसान होऊ शकतं. टेस्टाइल, फूटवेयर, ज्वेलरी अँड जेम्स या सेक्टर्सच सर्वात जास्त नुकसान होईल.

डोनाल्ड ट्रम्प नाराज असल्यान त्यांनी भारतावर टॅरिफ लावला, असा वुड यांनी दावा केला आहे. मे महिन्यात भारताने पाकिस्तानसोबत झालेल्या सीजफायरच श्रेय ट्रम्प यांना नाकारलं होतं. भारताने सीजफायरच श्रेय ट्रम्प यांना देण्यास नकार दिलेला. भारताने जर हो म्हटलं असतं, तर ट्रम्प यांचा नोबेल शांती पुरस्कारासाठीचा दावा अधिक भक्कम झाला असता. रशिया-युक्रेन युद्ध रोखण्यात अपयश हे सुद्धा ट्रम्प यांच्या नाराजीच एक कारण आहे. म्हणून रशियाकडून तेल खरेदीच कारण पुढे करुन भारतावर टॅरिफ लावलाय.

भारतात शेतीतून किती कोटी लोकांना रोजगार मिळतो?

भारत-अमेरिका एका मोठ्या व्यापार कराराला अंतिम स्वरुप देण्याच्या जवळ असताना हा टॅरिफ लावण्यात आला. दोन्ही देशांमध्ये अनेक मुद्यांवरुन पेच आहे. शेती एक महत्त्वाचा विषय आहे. वुड यांनी भारताची बाजू घेतली. कुठलही सरकार कृषी क्षेत्र परदेशी आयातीसाठी खुलं करणार नाही. कारण याचा परिणाम थेट गरीब शेतकऱ्यांवर होईल. भारतात शेती जवळपास 25 कोटी शेतकरी आणि मजुरांसाठी उत्पन्नाचा स्त्रोत आहे. एकट्या शेतीतून भारतात 40 टक्के वर्कफोर्सला रोजगार मिळतो.

आर्थिक मंदीची भिती

वुड यांनी टॅरिफमुळे आर्थिक मंदीची भिती व्यक्त केली. चालू तिमाहीत GDP ग्रोथ रेट फक्त 8 टक्के राहण्याचा अंदाज आहे. अलीकडेच हा ग्रोथ रेट 10-12% टक्के होता. FY25 मध्ये 10 टक्के ग्रोथ FY26 मध्ये घटून 8.59% राहू शकतो. कोविडची वर्ष वगळता हा मागच्या 20 वर्षातील सर्वात कमी ग्रोथ रेट असेल. सरकार या परिस्थितीचा सामना करण्यासाठी पावलं उचलत आहे. आधी बजेटमध्ये इनकम टॅक्सची कपात आणि आता GST मध्ये मोठ्या बदलाची घोषणा. आता चार टॅक्स बदलून फक्त दोनच 5% आणि 18% करण्यात येणार आहेत.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.