भारत लवकरच महाशक्ती बनेल, या देशाच्या माजी पंतप्रधानांच मोठं भाकित

ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे, येत्या काही दशकात जगात मजबूतपणे उदयास येणाऱ्या देशांबद्दल त्यांनी वक्तव्य केले आहे. त्यांच्या मते २०५० पर्यंत नवी जागतिक व्यवस्था बदलेल आणि तीन महासत्ता उदयाल येतील. इतर राष्ट्रांना बहुध्रुवीय जगाशी जुळवून घ्यावे लागेल.

भारत लवकरच महाशक्ती बनेल, या देशाच्या माजी पंतप्रधानांच मोठं भाकित
Follow us
| Updated on: Oct 02, 2024 | 7:00 PM

भारत गेल्या काही वर्षात जगात महत्त्वाचा देश बनला आहे. भारताकडे आता जगातील देश मोठ्या आशेने बघतात. याादरम्यान आता ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांनी 2050 पर्यंत अमेरिकेशिवाय भारत आणि चीन हे दोन देश देखील जगातील महासत्ता बनतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. ब्लेअर म्हणाले की चीन, भारत आणि अमेरिका हे तीन देश महासत्ता म्हणून उदयास आल्याने एक जटिल जागतिक व्यवस्था निर्माण होईल. त्यावर मात करण्यासाठी जागतिक नेत्यांना तयार राहावे लागेल. एका मुलाखतीत ते म्हणाले की, भारत लवकरच महासत्ता बनणार आहे.

महासत्ता होणारे तीन देश कोणते?

टोनी ब्लेअर म्हणाले की, ‘येत्या काळात जग वेगळ्या पद्धतीने बदलत जाणार आहे. पण तीन देश महासत्ता होण्याचा मार्गावर आहेत. ज्यामध्ये चीन, अमेरिका आणि भारत या तीन देशांचा समावेळ आहे, एक देश म्हणून तुमच्या बाजुने कोण कोण आहेत आणि तुमच्यासोबत किती देशांना जुळवून घ्यायचे आहे यावर तुमचं महत्त्व ठरतं. असे ही ते म्हणाले.

टोनी ब्लेअर हे 1997 ते 2007 पर्यंत ब्रिटनचे पंतप्रधान होते. ते पुढे म्हणतात की, सध्याची जागतिक परिस्थिती खूपच गुंतागुंतीची बनली आहे. मी पंतप्रधान होतो तेव्हा अमेरिका हा एकमेव मुख्य महासत्ता देश होता. पण आता चीन आणि भारत नवीन महासत्ता म्हणून उदयास येत आहेत. यासाठी इतर देशांना मुत्सद्दी रणनीतींचा पुनर्विचार करण्याची आवश्यकता आहे. तुम्हाला एक मजबूत युती तयार करावी लागेल, जी या तिन्ही महासत्तांशी समान पातळीवर बोलू शकेल.

इस्रायल -हिजबुल्लाह संघर्ष

इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यातील संघर्षाच्या वाढत्या धोक्याबद्दल ब्लेअर म्हणाले की, ‘इस्रायलच्या उत्तरेत जे काही घडत आहे त्यामुळे संघर्ष वाढण्याची शक्यता आहे, ही एक धोकादायक परिस्थिती आहे. त्याचे समाधान आवश्यक आहे. यासाठी इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात शांततेचा एकच व्यवहार्य मार्ग आहे आणि तो म्हणजे द्विराज्य सिद्धांत.

पश्चिम आशियात जे काही चालले आहे ते संपवण्यात चीन महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असे ब्लेअर यांचे मत आहे. शांतता चर्चेत चीन महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असे ते म्हणाले. चीनने आपला मित्र इराणला संघर्ष थांबवायला सांगावे. संघर्ष वाढून दोन्ही बाजूंना फायदा होणार नाही.

'कारण टायगर अभी जिंदा है...',अमोल कोल्हेंची फटकेबाजी, बघा काय म्हणाले?
'कारण टायगर अभी जिंदा है...',अमोल कोल्हेंची फटकेबाजी, बघा काय म्हणाले?.
उद्धव ठाकरेंवर अ‍ॅन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया, डॉक्टरांचा सल्ला काय?
उद्धव ठाकरेंवर अ‍ॅन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया, डॉक्टरांचा सल्ला काय?.
भाजप आमदारासमोर महिलांना वाटलेल्या साड्या मराठा आंदोलकांनी पेटवल्या अन
भाजप आमदारासमोर महिलांना वाटलेल्या साड्या मराठा आंदोलकांनी पेटवल्या अन.
UP च्या बहरइचमध्ये देवी विसर्जनावेळी गोळीबार, संतप्त जमावाकडून जाळपोळ
UP च्या बहरइचमध्ये देवी विसर्जनावेळी गोळीबार, संतप्त जमावाकडून जाळपोळ.
सिद्दीकींच्या हत्येचा कट याच घरात शिजला; बघा एक्सक्ल्युझिव्ह व्हिडीओ
सिद्दीकींच्या हत्येचा कट याच घरात शिजला; बघा एक्सक्ल्युझिव्ह व्हिडीओ.
बाबा सिद्दीकींसह झिशान यांच्याही हत्येचा होता कट, आरोपींची मोठी कबुली
बाबा सिद्दीकींसह झिशान यांच्याही हत्येचा होता कट, आरोपींची मोठी कबुली.
राज ठाकरे राजकीय सस्तन प्राणी, जे साडेचार वर्षे..अंधारेंची बोचरी टीका
राज ठाकरे राजकीय सस्तन प्राणी, जे साडेचार वर्षे..अंधारेंची बोचरी टीका.
आचारसंहितेपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाचा धडाका, 19 निर्णय जारी
आचारसंहितेपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाचा धडाका, 19 निर्णय जारी.
सरकारकडून टोलमाफी अन् राज ठाकरे म्हणाले, 'ही आनंदाची बाब, पण फक्त...'
सरकारकडून टोलमाफी अन् राज ठाकरे म्हणाले, 'ही आनंदाची बाब, पण फक्त...'.
सरकारकडून टोलमाफी अन् मनसेचा एकच जल्लोष; अविनाश जाधव म्हणाले...
सरकारकडून टोलमाफी अन् मनसेचा एकच जल्लोष; अविनाश जाधव म्हणाले....