पीओके नाही, पाकिस्तानमध्ये घुसून मारलंय, नकाशावर पाहा

नवी दिल्ली : पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशामध्ये संतापाची लाट उसळली होती. या भ्याड हल्ल्यात भारताचे 40 जवानांना आपले प्राण गमवावे लागले. हा हल्ला जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने केला होता. यामुळे पाकिस्तनवर कठोर कारवाई करावी अशी मागणी भारतातील जनतेकडून करण्यात येत होती. मात्र पुलवामा हल्ल्यानंतर भारताने बेधडक असे उत्तर दिलं. आज पहाटे 3.30 वाजता भारतीय …

पीओके नाही, पाकिस्तानमध्ये घुसून मारलंय, नकाशावर पाहा

नवी दिल्ली : पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशामध्ये संतापाची लाट उसळली होती. या भ्याड हल्ल्यात भारताचे 40 जवानांना आपले प्राण गमवावे लागले. हा हल्ला जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने केला होता. यामुळे पाकिस्तनवर कठोर कारवाई करावी अशी मागणी भारतातील जनतेकडून करण्यात येत होती. मात्र पुलवामा हल्ल्यानंतर भारताने बेधडक असे उत्तर दिलं. आज पहाटे 3.30 वाजता भारतीय वायुसेनेने PoK मध्ये एअर स्ट्राईक केली. हा हल्ला दहशतवादी संघटनांच्या लाँचवर करण्यात आला.

उरी हल्ल्यानंतर भारताने पहिल्यांदा सर्जिकल स्ट्राईक केला तेव्हा पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांना मारलं होतं. पण 1971 नंतर पहिल्यांदाच पाकिस्तानच्या सीमेत प्रवेश करुन भारतीय वायुसेनेने जैश ए मोहम्मदच्या कंट्रोल रुमला नेस्तनाबूत केलं. यामध्ये जैश ए मोहम्मदचे अत्यंत महत्त्वाचे कमांडरही ठार करण्यात आले आहेत.

पीओके आणि पाकिस्तान यांच्यातली जी शंका होती, ती खुद्द पाकिस्तानचे पत्रकार मुशर्रफ जैदी यांनीच ट्वीट करुन याबाबत सांगितलं. ते म्हणतात, ज्या बालाकोटमध्ये हा हल्ला झालाय, ते शहर पीओकेमध्ये नाही. जर भारतीय वायुसेनेने बालाकोटमध्ये हल्ला केला असेल तर हा पाकिस्तानवर हल्ला झालाय. बालाकोट पाकिस्तानमधील प्रांत खैरब पंख्तुवामध्ये आहे. भारताने फक्त एलओसीच ओलांडली नाही, तर हा पाकिस्तानवर हल्ला आहे.”

नकाशात पाहा कुठे आहे बालाकोट?

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *