AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Indian Nurse Nimisha Priya : येमेनच्या कोठडीत निमिषा प्रियाला कोणकोणत्या सुविधा मिळतात ?

साना तुरुंग हूती बंडखोरांच्या नियंत्रणाखाली आहे जिथे कैद्यांना अगदी मूलभूत सुविधांसाठीही पैसे मोजावे लागतात. फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली भारतीय नर्स निमषा प्रिया ही देखील सध्या याच तुरूंगात आहे. तिथे तिला कोणकोणत्या सुविधा मिळतात जाणून घेऊया.

Indian Nurse Nimisha Priya : येमेनच्या कोठडीत निमिषा प्रियाला कोणकोणत्या सुविधा मिळतात ?
भारतीय नर्स निमिषा प्रियाImage Credit source: TV9 bharatvasrh
| Updated on: Jul 19, 2025 | 12:54 PM
Share

येमेनच्या साना तुरुंगात कैद असलेली आणि जीवन-मरणाच्या अनिश्चित रेषेवर सध्या अडकलेली भारतीय नर्स निमिषा प्रियाबद्दल एक नवीन अपडेट आली आहे. येमेनमध्ये असलेल्या निमिषा यांच्या आईने अमेरिकन आउटलेट सीएनएनला सांगितले आहे की त्यांची मुलगी खूप तणावात आहे. येमेनच्या साना तुरुंगाची गणना जगातील सर्वात धोकादायक तुरुंगांमध्ये केली जाते.साना तुरुंगावर हूती बंडखोरांचा ताबा आहे आणि हे बंडखोर त्यांच्या मर्जीने हे तुरुंग चालवतात. निमिशा 2017 साला पासून या तुरुंगात कैद आहे. तर चला जाणून घेऊया की या सना तुरुंगात निमिषा प्रियाला कोणत्या सुविधा मिळतात?

 येमेनमधील सना तुरुंगाबद्दल जाणून घेऊया

येमेनमधील सना येथील तुरुंग हा देशातील सर्वात मोठा कोठडी मानला जातो. 1991 साली हा तुरूंग स्थापन झाला तर 1993 सालापासून त्यात कैद्यांना ठेवण्यास सुरुवात झाली. सना तुरुंगात सर्व प्रकारचे कैदी राहतात.

या तुरुंगावर हुथी बंडखोरांचा ताबा आहे आणि हूती त्यांच्या स्वतःच्या नियमांनुसार ते चालवतात. सना तुरुंगात पुरुष आणि महिलांसाठी वेगवेगळे वॉर्ड आहेत.

2015 साली मध्ये अमेरिकन संशोधक केसी कोम्ब्स यांनी साना तुरुंगाला भेट दिली होती. कोम्ब्सच्या मते, 15/8 च्या या प्रत्येक सेलमध्ये सूर्यप्रकाश आत येण्यासाठी पाईप बसवलेले असतात. तुरुंगाच्या भिंती बाहेरून खूप मजबूत दिसतात, परंतु जेव्हा जवळ बॉम्ब पडतो तेव्हा आत कंपन जाणवते.

जेलमध्ये कोणकोणत्या सुविधा मिळतात ?

  • भारतीय नर्स निमिषा प्रिया हिला साना तुरुंगात, इतर महिला कैद्यांसोबत ठेवले जाते. निमिषाला त्या महिलांसोबत ठेवले जाते ज्या राजकीय कैदी आहेत आणि हुथींनी त्यांना छळण्यासाठी ताब्यात घेतले आहे.
  • निमिषाला आठवड्यातून एकदा तिच्या कुटुंबाशी बोलण्यासाठी फोन दिला जातो. निमिषा तिच्या पती आणि मुलाशी व्हॉट्सॲप कॉलद्वारे बोलते. 2023 साली निमिषाने केरळमधील काही माध्यम संस्थांना व्हॉट्सॲप कॉलद्वारे मुलाखत दिली.
  • निमिषाला तिच्या कुटुंबाला भेटण्याचीही परवानगी आहे. 18 जून 2025 रोजी निमिषा तिच्या आईला शेवटची भेटली. त्यावेळी ती खूप तणावात होती. तिला परत येण्याची कोणतीही आशा वाटत नव्हती, असे निमिषाच्या आईने सीएनएनला सांगितले.
  • अल अरेबियाच्या मते, हुथी बंडखोरांच्या नियंत्रणाखाली असलेल्या तुरुंगांमध्ये कैद्यांकडून चांगल्या अन्न आणि पाण्यासाठी पैसे घेतले जातात. हुथी बंडखोर या पैशाचा वापर त्यांची शस्त्रे खरेदी करण्यासाठी करतात.
  • तर पैसे न देणाऱ्यांना हौथी बंडखोर घाणेरडे अन्न आणि घाणेरडे पाणी देतात. पैसे देणाऱ्या कैद्यांना चांगले जेवण दिले जाते. निमिषावर हत्येचा आरोप असून 2017 सालापासून ती येमेनच्या सना तुरुंगात कैद आहे.
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला.
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट.
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग.
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता.
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल.
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा.
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?.
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड.
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा.
जेजुरीत भंडाऱ्यानं आगीचा भडका उडाला, प्रत्यक्षदर्शीनं सांगितल घडल काय?
जेजुरीत भंडाऱ्यानं आगीचा भडका उडाला, प्रत्यक्षदर्शीनं सांगितल घडल काय?.