Plane Crash | ‘आम्ही क्रॅश होणार आहोत’, ‘आई, आय लव्ह यू’… प्लेन क्रॅश होण्यापूर्वीचे अखेरचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील

Plane Crash | 'आम्ही क्रॅश होणार आहोत', 'आई, आय लव्ह यू'... प्लेन क्रॅश होण्यापूर्वीचे अखेरचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील

यापूर्वी झालेल्या विमान अपघातादरम्यान लोकांनी मृत्यूला समोर पाहून काही असे अखेरचे शब्द म्हटले आहेत, जे वाचून कुणाचेही डोळे पाणावतील.

Nupur Chilkulwar

|

Jan 10, 2021 | 11:45 AM

जकार्ता : इंडोनेशियाची (Indonesia Plane Crash) राजधानी जकार्ता येथून शनिवारी 62 जणांना घेवून (Last Words Of People Before Plane Crash) उड्डाण केलेल्या श्रीविजय एअर फ्लाइट 182 अपघातग्रस्त झालं आहे. या विमानात चालक आणि क्रू मेंबर्ससह 62 जण होते. उड्डाण घेतल्याच्या काहीच वेळात या विमानाचा एअर ट्राफीक कंट्रोलरशी संपर्क तुटला होता (Last Words Of People Before Plane Crash).

अद्याप या विमानातील लोकांची काहीही माहिती मिळालेली नाही. मात्र, रविवारी सकाळी इंडोनेशियाच्या बचाव दलाला जावा समुद्रात शरीराचे अंग, कपड्यांचे तुकडे आणि विमानाचे काही अवशेष मिळाले आहेत. तर, इंडोनेशियन नौसेनेने दावा केला आहे की ज्या ठिकाणी विमान अपघातग्रस्त झाला, ते ठिकाण त्यांनी शोधून काढलं आहे.

आजपर्यंत विमानात प्रवास करणाऱ्या प्रवाशांची कुठलीही माहिती मिळालेली नाही. यापूर्वी झालेल्या विमान अपघातादरम्यान लोकांनी मृत्यूला समोर पाहून काही असे अखेरचे शब्द म्हटले आहेत, जे वाचून कुणाचेही डोळे पाणावतील.

प्लेनक्रॅशइन्फो डॉट कॉमने गेल्या अनेक वर्षांत झालेल्या विमान अपघातादरम्यान पायलटने म्हटलेल्या अखेरचे शब्दांचा अहवाल तयार केला आहे. हे संदेश वाचून त्यावेळच्या परिस्थिती काय असेल हे कळतं. कुणी आपल्या अखेरच्या क्षणांमध्ये आईची आठवण केली तर कुणी आपल्या पत्नीबाबतच प्रेम व्यक्त केलं. कुणी हैराण होतं तर कुणी घाबरलेलं होतं. तर काही असेही अखेरचे क्षण होते जिथे काही जण मदत मागत होते. तर कुणी देवाचं स्मरण करत होतं (Last Words Of People Before Plane Crash).

वाचा असेच काही हृदयद्रावक अखेरचे संदेश

विमान अपघाताची तारीख     एअरलाइन                                           अखेरचे शब्द

5 जानेवारी, 1969                एरियाना अफगान एअरलाईन्स             सर्व संपलं!

25 सप्टेंबर, 1978                 पॅसिफिक साऊथवेस्ट एअरलाईन्स       आई, आय लव्ह यू!

9 मे, 1987                           एलओटी पॉलिश एअरलाईन्स                गुड नाईट, गुड बाय, आम्ही मरणार आहोत!

7 जून, 1989                        सुरिनाम एअरवेज                                 अखेर, मी मरणार आहे

21 ऑगस्ट, 1995                 अटलांटिक एअरलाईन्स                        एमी, आय लव्ह यू

31 ऑक्टोबर, 1999             इजिप्त एयर                                           माझा देवावर पूर्ण विश्वास आहे

1 जून, 2009                        एअर फ्रान्स                                          आम्ही क्रॅश होणार आहोत, हे नाही होऊ शकत

31 ऑगस्ट, 1988                 डेल्टा एअरलाईन्स                                आमचं इंजिन खराब झालं आहे. आम्ही वाचू शकणार नाही.

18 ऑगस्ट, 1993                 अमेरिकन इंटरनॅशनल एअरवेज            आम्ही मरणार आहोत! असं नाही होऊ शकत!

31 जानेवारी, 2000              अलास्का एअरलाईन्स                             आह… अखेर मृत्यू समोर आलाच

Last Words Of People Before Plane Crash

संबंधित बातम्या :

Breaking : श्रीविजय एअर फ्लाइट 182 चा संपर्क तुटला, उड्डाण घेताच हवेमध्ये गायब

Air Strike | बालाकोट एअर स्ट्राईकमध्ये 300 मृत्यू, पाकच्या डिप्लोमॅटचं मोठं वक्तव्य

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें