AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

म्यानमारमधील सैन्य कारवाईने भारताची काळजी वाढली, 100 पेक्षा अधिक लोकांची घुसखोरी

हिसेंत होरपळत असलेल्या म्यानमारमधून जवळपास 100 पेक्षा अधिक लोक म्यानमारमधून पळून येत भारताच्या ईशान्य भागात घुसल्याचं बोललं जातंय.

म्यानमारमधील सैन्य कारवाईने भारताची काळजी वाढली, 100 पेक्षा अधिक लोकांची घुसखोरी
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Mar 15, 2021 | 2:05 AM
Share

नेप्यिडॉ : म्यानमारमध्ये तयार झालेल्या राजकीय संकटामुळे भारताची काळजी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हिसेंत होरपळत असलेल्या म्यानमारमधून जवळपास 100 पेक्षा अधिक लोक म्यानमारमधून पळून येत भारताच्या ईशान्य भागात घुसल्याचं बोललं जातंय. याबाबत या भागातील एका गावातील स्थानिक नेत्यानेच ही माहिती दिलीय. यापूर्वीही सैन्य उठावानंतर म्यानमारमधून लोक भारतात आल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत (Infiltration of More than 100 citizen of Myanmar in India after Military action and violence) .

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मिझोराम राज्यातील परक्वान गावातील काउंसिलचे अध्यक्ष रामलियानी यांनी दुजोरा दिलाय. रामलियानी म्हणाले, “आत्तापर्यंत 116 नागरिकांनी तियु नदी ओलांडून भारतात प्रवेश केलाय. हे लोक ज्या रस्त्याने म्यानमारमधून भारतातील परक्कान गावात आले तेथे आसाम रायफलचे सैन्य तैनात नसल्याचंही सांगितलं जातंय.

म्यानमार पोलीस आणि अग्निशामक विभागाचा सहभाग

आत्तापर्यंत स्थानिक नेत्यांच्या या माहितीवर सरकारकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. रामलियाना यांना या म्यानमारच्या लोकांनी भारतात प्रवेश कधी केला हे सांगता आलेलं नाहीये. काही स्थानिक पत्रकारांनी दावा केलाय की, यात म्यानमार पोलीस आणि अग्निशामक विभागाचा सहभाग आहे. ग्रहमंत्रालयाकडून या मुद्द्यावर मागील हप्त्यात मिझोरम, मणिपूर, नागालँड आणि अरुणाचल प्रदेश या 4 राज्यांना सूचना देण्यात आल्यात. यानुसार निर्वासितांना भारतात घुसण्यापासून आडवण्यासाठी योग्य पावले उचलावीत.

या चारही राज्यांच्या सिमा म्यानमारला लागून आहेत. भारताने म्यानमारच्या 7 पोलीस अधिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. जे भारतीय सीमेत आले होते. त्यांनी भारतीय अधिकाऱ्यांना दिलेल्या माहिती प्रमाणे तेथील सैन्याच्या मागे लागले होते कारण हे त्यांच्या सूचनांचे पालन करत नव्हते.

हेही वाचा :

Myanmar : आधी 19 वर्षांच्या मुलीची डोक्यात गोळी झाडून हत्या, नंतर रात्री अंधारात मृतदेह उकरुन सिमेंट भरलं

आंग सान सू की यांच्यावर म्यानमार सैन्याकडून सर्वात मोठा आरोप, 11 किलो सोनं आणि कोट्यावधींच्या लाचेचा दावा

Special Story | म्यानमारमध्ये लोकशाहीला सुरुंग! लष्कराचा उठाव, भारतावर काय परिणाम?

व्हिडीओ पाहा :

Infiltration of More than 100 citizen of Myanmar in India after Military action and violence

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...