AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतासाठी मोठी खुशखबर, युद्ध संपलं? आता 48 तासांनंतर तो निर्णय येणार; व्हाईट हाऊसमध्ये मोठी घडामोड

इराणवरील युरेनियम संवर्धनावरील स्थगिती हाच दोन्ही देशांतील प्रमुख वादाचा मुद्दा असल्याचे बोलले जात आहे. इराण्चया युरेनियम संवर्धनावर 20 वर्षांची स्थगिती असावी, असे अमेरिकेला वाटते.

भारतासाठी मोठी खुशखबर, युद्ध संपलं? आता 48 तासांनंतर तो निर्णय येणार; व्हाईट हाऊसमध्ये मोठी घडामोड
donald trump and mojtaba khamenei and strait of hormuzImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 06, 2026 | 8:41 PM
Share

America Iran War : अमेरिका आणि इराण आंच्यातील युद्ध अजूनही संपलेले नाही. युद्धावर कायमस्वरुपी तोडगा निघावा यासाठी दोन्ही देशांकडून प्रयत्न केला जात आहे. परंतु इराणकडे असलेला युरेनियमचा साठा आणि इराणकडून चुरू असलेला अणूकार्यक्रम यावर एकमत होत नाहीये. तसेच होर्मुझची सामुद्रधुनी हादेखील गंभीर विषय होऊन बसला आहे. दरम्यान, दोन्ही देशांमध्ये चर्चा चालू असतानाच एक महत्त्वाची आणि मोठी माहिती समोर आली आहे. दोन्ही देशांत जवळजवळ एकमत झाले असून एका पानाचा करारही तयार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पुढचे 48 तास महत्त्वाचे आहेत. सर्व काही सुरळीत झाले तर दोन्ही देशांतील युद्ध समाप्त झाल्याची घोषणा केली जाऊ शकते.

नेमकी काय माहिती समोर आली आहे?

मिळालेल्या माहितीनुसार इराणसोबतचे युद्ध समाप्त करण्यासाठी तसेच अणुकार्यक्रमावर व्यापक चर्चा करण्यासाठी एक पानी सामंजस्य करार तयार करण्यात आला आहे. या सामंजस्य करारावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सहमत होण्याची शक्यता आहे. या करारात 14 महत्त्वाच्या तरतुदी आहेत. यावर अमेरिकेची सहमत अंतीम टप्प्यात आहेत. हा सामंजस्य करार लागू झाला तर तत्काळ युद्धविराम लागू होणार आहे. हा करार अस्तित्त्वात आल्यास अमेरिका तत्काळ प्रभावाने इराणवरील निर्बंध हटवणार आहे. तसेच अब्जो डॉलर किंमत असलेली इराणी मालमत्ता इराणकडे पुन्हा सुपूर्द केली जाणार आहे. दोन्ही देशांत होर्मुझ सामुद्रधुनीतील तणाव कमी करण्यावर तसेच सागरी मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी सहकार्य केले जाणार आहे.

दोन्ही देशांतील वादाचा मुद्दा नेमका काय?

इराणवरील युरेनियम संवर्धनावरील स्थगिती हाच दोन्ही देशांतील प्रमुख वादाचा मुद्दा असल्याचे बोलले जात आहे. इराण्चया युरेनियम संवर्धनावर 20 वर्षांची स्थगिती असावी, असे अमेरिकेला वाटते. तर हा कालावधी 5 वर्षांचा असावा, अशी इराणची भूमिका आहे. दोन्ही देश हा कालावधी 12 ते 15 वर्षांपर्यंत करण्यास सहमती दाखवण्याची शक्यता आहे. इराणकडून या अटीचे उल्लंघन झाल्यास स्थगितीचा कालावधी वाढवण्याचाही तरतूद असावी, अशी अमेरिकेची भूमिका आहे. हा करार झाल्यास इराण 3.67 टक्क्यांपर्यंतच युरेनियमचा साठा करू शकतो. या युरेनियम साठ्याचा वापर अण्वस्त्र निर्मितीसाठी केला जाणार नाही, याचाही हमी इराणला द्यावी लागणार आहे. त्यामुळे आता या एका पानाच्या सामंजस्य करारावर दोन्ही देश सहमत होणार का? पुढच्या 48 तासांत नेमके काय होणार? याकडे जगाचे लक्ष लागले आहे.

Follow Us
NEET पेपर लीक घोटाळ्याचा धक्कादायक गौप्यस्फोट, ती खळबळजनक डील समोर...
NEET पेपर लीक घोटाळ्याचा धक्कादायक गौप्यस्फोट, ती खळबळजनक डील समोर....
आमदार जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावर बसून प्रवास, PM मोदींच्या आवाहनाचा
आमदार जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावर बसून प्रवास, PM मोदींच्या आवाहनाचा.
ठाण्याचंही नाव आलं समोर, NEET पेपरफुटी प्रकरणी आत्तापर्यंत काय काय...
ठाण्याचंही नाव आलं समोर, NEET पेपरफुटी प्रकरणी आत्तापर्यंत काय काय....
मोदींचे मंत्री हे नियम पाळणार का? मोदींच्या आवाहनानंतर ठाकरेंचा सवाल!
मोदींचे मंत्री हे नियम पाळणार का? मोदींच्या आवाहनानंतर ठाकरेंचा सवाल!.
...म्हणून याला भाजप कारणीभूरत, NEET पेपरफुटी प्रकरणी राहुल गांधींची...
...म्हणून याला भाजप कारणीभूरत, NEET पेपरफुटी प्रकरणी राहुल गांधींची....
नाशिकच्या प्रिटींग प्रेसमध्ये... NEET पेपरफुटीचं नाशिक कनेक्शन उघड
नाशिकच्या प्रिटींग प्रेसमध्ये... NEET पेपरफुटीचं नाशिक कनेक्शन उघड.
सोने व्यवसायासह कारागीरांनाही मोठा फटका बसू शकतो?
सोने व्यवसायासह कारागीरांनाही मोठा फटका बसू शकतो?.
भारतात कच्च्या तेलाचा किती साठा उरलाय? राजनाथ सिंह यांनी सागितलेल्या..
भारतात कच्च्या तेलाचा किती साठा उरलाय? राजनाथ सिंह यांनी सागितलेल्या...
पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर शरद पवार यांची पोस्ट चर्चेत, म्हणाले...
पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर शरद पवार यांची पोस्ट चर्चेत, म्हणाले....
राष्ट्रवादीच्या नव्या यादीवरून वाद, प्रफुल पटेल यांना डावललं?
राष्ट्रवादीच्या नव्या यादीवरून वाद, प्रफुल पटेल यांना डावललं?.