AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रशिया, चीन, तुर्की नाही तर आता हे 3 महाशक्ती देश इराणला वाचवणार; शुक्रवारी मोठी घडामोड

इराण आणि इस्रायलमध्ये भीषण युद्ध सुरू आहे, इराणकडून इस्रायलवर मोठा हल्ला करण्यात आला, त्यानंतर आता इस्रायलने अधिक आक्रमक भूमिका घेतली असून, इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई इस्रायलचच्या टार्गेटवर आहेत.

रशिया, चीन, तुर्की नाही तर आता हे 3 महाशक्ती देश इराणला वाचवणार; शुक्रवारी मोठी घडामोड
| Updated on: Jun 19, 2025 | 6:06 PM
Share

इराण आणि इस्रायलमध्ये भीषण युद्ध सुरू आहे, इराणकडून इस्रायलवर मोठा हल्ला करण्यात आला, त्यानंतर आता इस्रायलने अधिक आक्रमक भूमिका घेतली असून, इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई इस्रायलचच्या टार्गेटवर आहेत. याचदरम्यान आता तीन सुपरपावर देशांनी इराणला वाचवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. विशेष म्हणजे या तीन देशांमध्ये इराणचे खास मित्र राष्ट्र असलेल्या चीन, तुर्की किंवा रशिया या तीन देशांपैकी एकाचाही समावेश नाहीये.

रॉयटर्समध्ये प्रकाशीत करण्यात आलेल्या वृत्तानुसार जर्मनी, फ्रान्स आणि ब्रिटन या तीन देशांचे परराष्ट्र मंत्री शुक्रवारी जिनेवामध्ये इराणच्या समकक्ष मंत्र्यांसोबत अणू कार्यक्रमावर चर्चा करण्याचं नियोजन करत असल्याची माहिती समोर आली आहे. इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेला वाद हा युद्ध नाही तर चर्चेच्या माध्यमातून सोडवण्यात यावा असा प्रयत्न या तीन्ही देशांकडून सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता जर्मनी, फ्रान्स आणि ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री येत्या शुक्रवारी इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्यासोबत इराणच्या अणू कार्यक्रमावर चर्चा करणार आहेत.

अमेरिकेच्या परवानगीनंतर होणार चर्चा

समोर आलेल्या माहितीनुसार या तीन्ही देशांनी इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत चर्चेचं नियोजन केलं आहे. मात्र ही चर्चा अमेरिकेच्या परवानगीनंतरच होणार आहे. येत्या शुक्रवारी जिनेवामध्ये इराणच्या समकक्ष मंत्र्यांसोबत अणू कार्यक्रमावर चर्चा करण्याचं नियोजन आहे. या युद्धावर आता चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्याचा प्रयत्न जागतिकस्तरावर सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.

तर दुसरीकडे आज युद्धाच्या पार्श्वभूमीवर चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग आणि रशियांच्या राष्ट्राध्यक्षांची देखील चर्चा झाली आहे. या दोन्ही देशांनी इराणला पाठिंबा देतानाच इस्रायलकडून सुरू असलेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे. इस्रायलने आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन केल्याचं चीन आणि रशियानं म्हटलं आहे. आज चीनचे राष्ट्रपती आणि रशियाचे राष्ट्रपती यांचं फोनवर बोलणं झालं, दोन्ही देशांनी इस्रायलने घेतलेल्या या भूमिकेचा निषेध केला आहे, सैन्यांच्या बळावर नाही तर चर्चेतून यावर मार्ग काढला जावा अशी भूमिका चीन आणि रशियाची आहे.

बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?.
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ.
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?.