AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराण विरुद्ध इस्रायल युद्धात कोण ठरलं वरचढ? डोनाल्ड ट्रम्प यांच्या मते ‘हा’ देश समजदार

इराण-इस्रायलमधील युद्धबंदीनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नेदरलँड्सच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी या युद्धाबाबत महत्वाची माहिती दिली आहे.

इराण विरुद्ध इस्रायल युद्धात कोण ठरलं वरचढ? डोनाल्ड ट्रम्प यांच्या मते 'हा' देश समजदार
trump on iran and israel
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jun 25, 2025 | 11:12 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेलं इराण-इस्रायलमधील युद्ध थांबलं आहे. या युद्धबंदीनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नेदरलँड्सच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ट्रम्प नाटो देशांच्या नेत्यांची भेट घेत आहेत. यात युद्धबंदीनंतर कोणत्या देशाला आघाडी मिळाली याबाबतही चर्चा होत आहे. अशातच आता डोनाल्ड ट्रम्प यांनी या युद्धाबाबत महत्वाची माहिती दिली आहे.

नाटो देशांच्या बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ट्रम्प म्हणाले की, “इराणकडे खनिज तेल आहे, ते समजदार लोक आहेत. या युद्धात इस्रायलचे खूप नुकसान झाले आहे. गेल्या दोन दिवसांत बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी अनेक इमारती उद्ध्वस्त केल्या आहेत.” ट्रम्प यांच्या या विधानामुळे इराण या युद्धात वरचढ ठरल्याचे संकेत मिळाले आहे. तसेच इराणने असा दावा केला होता की, इस्रायलने युद्धबंदीसाठी पुढाकार घेतला होता या दाव्यालाही बळकटी मिळाली आहे.

इस्रायलचे मोठे नुकसान

12 दिवस चाललेल्या इराण आणि इस्रायलमधील यु्द्धात इस्रायलचे मोठे नुकसान झाले आहे. इस्रायली मीडियानेही हे स्वीकारले आहे. एका रिपोर्टनुसारइस्रायलमधील सुमारे 39 हजार लोकांनी नुकसान भरपाईसाठी अर्ज केले आहेत. यातील बहुतांशी लोकांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत. तसेच अनेकांच्या वाहनांचे नुकसान झाले आहे.

समोर आलेल्या आकडेवारीनुसार इस्रायलमधील 30,809 नागरिकांनी घराचे नुकसान झाल्याने भरपाई देण्यात यावी असा अर्ज केला आहे, तसेच 3719 लोकांनी वाहनांच्या नुकसानीसाठी भरपाई मिळावी म्हणून अर्ज केला आहे. तसेच यंत्रसामग्री आणि इतर वस्तूंच्या नुकसान भरपाईसाठी 4085 लोकांनी अर्ज केला आहे.

इराणचे किती नुकसान?

इस्रायलने केलेल्या हल्ल्यामुळे इराणमध्येही मोठे नुकसान झाले आहे. मात्र इमारतींच्या किंवा घरांच्या नुकसानीची माहिती मिळाली नाही. इस्रायलच्या हल्ल्यामुळे इराणमध्ये सुमारे 600 लोकांचा मृत्यू झाला आहे, यात अनेक लष्करी अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. तसेच इस्रायलमध्ये 30 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता