AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकेकाळी जय-वीरूसारखे मित्र असणारे इस्रायल-इराण कट्टर शत्रू कसे बनले? वाचा…

इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरु झाले आहे. या दोन्ही देशांमध्ये यापूर्वी चांगले राजनैतिक संबंध होते. मात्र आता हे दोन्ही देश एकमेकांचे शत्रू कसे बनले ते जाणून घेऊयात.

एकेकाळी जय-वीरूसारखे मित्र असणारे इस्रायल-इराण कट्टर शत्रू कसे बनले? वाचा...
Iran israel history
| Updated on: Jun 16, 2025 | 9:21 PM
Share

इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरु झाले आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ले केले जात आहेत. मात्र एकेकाळी या दोन देशांमधील मैत्री ही जय-वीरू मजबूत होती. या दोन्ही देशांमध्ये चांगले राजनैतिक संबंध होते, तसेच दोन्ही देश एकमेकांशी लष्करी आणि गुप्तचर माहिती देत होते. हे दोन्ही देश मिळून दुसऱ्या देशांवर हल्ला करत असतं. मात्र आता हे दोन्ही देश एकमेकांचे शत्रू कसे बनले ते जाणून घेऊयात.

गेल्या 45 वर्षांत इराण आणि इस्रायलमधील कटुता वाढली आहे. गेल्या चार दिवसांपासून एकमेकांवर हल्ले सुरु आहेत. इस्रायल तेहरानवर आणि तेल अवीवला लक्ष्य करत आहे.संघर्ष इतका वाढला आहे की, अमेरिका, रशिया आणि चीन हे युद्ध प्रेक्षक बनून पाहत आहेत.

इस्रायल आणि इराणमधील मैत्री

इस्रायलची स्थापना 1948 मध्ये झाली.त्यापूर्वी हा देश ब्रिटिशांच्या ताब्यात होता. इस्रायलला अमेरिका आणि सोव्हिएत युनियनची मान्यता होती, परंतु अरब देश मान्यतेसाठी तयार नव्हते. त्यामुळे या देशाची स्थापना झाल्यानंतर लगेचच अरब देशांनी या देशावर हल्ला केला, मात्र इस्रायलने युद्ध जिंकले.

इराणमध्ये रजा पहलवी हे देशाची सुत्रे सांभाळत होते. त्यांनी इराणला धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनवले होते. या मैत्रीची सुरुवात 1950 मध्ये झाली. कारण त्यावेळी इराणने इस्रायलला व्यावहारिकदृष्ट्या मान्यता दिली. तसेच जेव्हा इस्रायलला मोठ्या पाठिंब्याची आवश्यकता होती, जेव्हा त्यांना इराणकडून पाठिंबा मिळाला. त्यानंतर तुर्की आणि इथिओपियानेही पाठिंबा दिला होता. जेव्हा जेव्हा इजिप्त, इराक आणि सीरियासारखे देश इस्रायलविरुद्ध बोलले तेव्हा इराणकडून त्यांना पूर्ण पाठिंबा मिळाला.

संरक्षणात सहकार्य

इस्रायल आणि इराणमधील वेळेनुसार वाढत गेली. इराणची गुप्तचर संस्था सावक आणि इस्रायलची गुप्तचर संस्था मोसाद समन्वयाने काम करू लागली. सुरुवातीच्या टप्प्यात मोसादने सावकच्या एजंटनाही प्रशिक्षण दिले. इराणी सैनिक सब मशीन गन आणि इतर शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण घेण्यासाठी इस्रायलमध्ये जात असत. त्यानंतर इराण-इराक संघर्षादरम्यान इस्रायलने मित्राला मदत केली.

इराणकडे तेलाचे साठे आहे, त्यावेळी इस्रायलला तेलाची गरज होती. 1960 च्या दशकात इस्रायलला इराणकडून नियमित तेलाचा पुरवठा व्हायचा. इराणने इलात-अश्केलोन पाइपलाइन टाकली होती, ज्याद्वारे तेल इस्रायलला जात असे. त्या बदल्यात इस्रायलने इराणला शेती, सिंचन आणि शस्त्रास्त्राचे तंत्रज्ञान दिले होते.

प्रोजेक्ट फ्लॉवर

इराण आणि इस्रायलने एकत्र येत प्रोजेक्ट फ्लॉवर हा क्षेपणास्त्र कार्यक्रम देखील सुरू केला होता. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट अणुऊर्जेवर चालणारी पाणबुडी क्षेपणास्त्रे विकसित करणे हे होते. क्षेपणास्त्र असेंब्ली प्लांट देखील स्थापन करण्यात आले होते. मात्र इराणमधील शाह सल्तनत संपल्यानंतर हा प्रकल्प रद्द करण्यात आला.

दोन्ही देश एकमेकांचे शत्रू कसे बनले?

इराणमध्ये 1979 साली इस्लामिक क्रांती झाली आणि शाह यांना पदावरून काढून टाकण्यात आले. यामुळे इस्रायल आणि इराणमधील मैत्री तुटली आणि शत्रुत्व वाढलं. इराण एक इस्लामिक देश बनला आणि त्यांनी इस्रायलला ‘शत्रू’ असे संबोधले. कालांतराने हे शत्रुत्व इतके वाढले की इराण इस्रायलला आपला नंबर 1 शत्रू मानू लागला. इराणने हिजबुल्लाह, हमास सारख्या संघटनांना पाठिंबा दिला. त्यामुळे इस्रायलने इराण हा आपल्यासाठी धोका आहे असे समजून हा दोन्ही देशांमधील वाद आणखी वाढला आणि आता त्याचे यु्द्धात रुपांतर झाले.

ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.