इराण ताब्यात घेतलेल्या जहाजावरील पाकिस्तानी नागरिकांची सुटका करणार, पण भारतीयांचं काय?

इराण आणि इस्रायल यांच्यात तणाव असताना इराणने इस्रायलच्या उद्योगपतीचे असलेले कंटेनर असलेले जहाज ताब्यात घेतले आहे. ज्यावर वेगवेगळ्या देशांचे नागरिक आहेत. यामध्ये भारत आणि पाकिस्तानी नागरिकांचा देखील समावेश आहे. पाकिस्तानच्या नागरिकांना सोडले जाणार आहे.

इराण ताब्यात घेतलेल्या जहाजावरील पाकिस्तानी नागरिकांची सुटका करणार, पण भारतीयांचं काय?
iran on pakistan
Follow us
| Updated on: Apr 15, 2024 | 10:39 PM

Israel iran conflict : इराणच्या नौदलाने इस्रायलच्या उद्योगपीच्या कंपनीचे जहाज ताब्यात घेतले होते. आता या जहाजावर अडकलेल्या पाकिस्तानींना सोडण्याची घोषणा इराणच्या सैन्याने केली आहे. पाकिस्तानचे नागरिक असल्याची पुष्टी झाल्यानंतर दोन्ही देशांमधील बंधुत्वाचे संबंध लक्षात घेऊन कायदेशीर औपचारिकता पूर्ण केल्यानंतर त्याला सोडण्यात येईल. असे वृत्त पाकिस्तानमधील जिओ न्यूजने दिले आहे. पाकिस्तानमधील इराणचे राजदूत रजा अमीरी मोकादम यांनी सांगितले की त्यांनी तेहरानमधील उच्च अधिकाऱ्यांशी तपशील सामायिक केला आहे आणि ते जहाजावर पाकिस्तानी नागरिकांच्या उपस्थितीची पुष्टी होण्याची वाट पाहत आहेत.

जहाजावर कोणी पाकिस्तानी असेल तर बंधुभाव लक्षात घेऊन कायदेशीर औपचारिकता पूर्ण करून त्या नागरिकाची सुटका करू, असे मोकदम यांनी म्हटले आहे. इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने इस्रायलचे एक कंटेनर जहाज ताब्यात घेतले आहे. जहाजाचे ऑपरेटिंग ऑफिसर (सीओओ) च्या कुटुंबाने पाकिस्तान सरकारकडे मदत मागितली होती आणि त्याच्या सुटकेची विनंती केली होती. यानंतर, पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने हे प्रकरण इस्लामाबादमधील इराणी अधिकाऱ्यांकडे उचलून धरले आणि जहाजावर आपले नागरिक असल्याची माहिती दिली. पाकिस्तानींना सोडण्यात येईल, असे इराणने स्पष्ट केले आहे.

जहाजावर दोन पाकिस्तानी नागरिक

जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, इराणी सैन्याने ताब्यात घेतलेल्या जहाजावर दोन पाकिस्तानी होते. त्यापैकी मुहम्मद अदनान अझीझ, MSC Aries या पोर्तुगीज ध्वजांकित जहाजाचे COO आहेत. अदनानचे कुटुंब कराचीत राहते आणि लंडनमध्ये त्याचे नातेवाईकही आहेत. कुटुंबाने अदनानच्या सुरक्षिततेबद्दल त्यांच्या चिंता व्यक्त केल्या आहेत. इराणच्या लष्कराने ताब्यात घेतलेल्या जहाजात अदनान अझीझसोबत आणखी एक पाकिस्तानीही असल्याचा दावा केला जात आहे.

सीरियातील इराणच्या वाणिज्य दूतावासावर इस्रायलने केलेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर संपूर्ण प्रदेशात वाढलेल्या तणावादरम्यान इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ हे जहाज ताब्यात घेतल्याचे ऐकून त्यांना धक्का बसल्याचे अदनानच्या कुटुंबीयांनी सांगितले. जहाजाच्या मालकी किंवा प्रादेशिक मुद्द्यांशी अदनान अझीझचा काहीही संबंध नाही, असे आम्ही स्पष्ट केले आहे. तो फक्त व्यावसायिक म्हणून आपले काम करत होता आणि तो पकडला गेला..

जहाज यूएई बंदरातून निघाले होते

पोर्तुगीज ध्वजांकित MSC Aries जहाज UAE बंदरातून भारताकडे निघाले होते. हे लंडनस्थित झोडियाक मेरिटाइमशी जोडलेले आहे, जो इस्रायली अब्जाधीश इयाल ऑफरच्या झोडियाक ग्रुपचा भाग आहे. जहाजाच्या क्रूमध्ये भारतीय, फिलिपिनो, पाकिस्तानी, रशियन आणि एस्टोनियन नागरिकांचा समावेश होता. यापैकी सर्वाधिक 17 लोक भारतीय आहेत.

या जहाजातील भारतीयांच्या सुटकेसाठीही प्रयत्न सुरू आहेत, मात्र अद्यापपर्यंत इराणकडून तसे आश्वासन मिळालेले नाही. इराणचे परराष्ट्र मंत्री होसेन अमीर अब्दुल्लायान यांनी सांगितले की, भारतीय अधिकाऱ्यांना जहाजातील भारतीय क्रू सदस्यांना भेटण्याची परवानगी दिली जाईल. भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनीही रविवारी या विषयावर इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांशी फोनवर चर्चा केली.

Non Stop LIVE Update
पैसे घ्या, पण... ; बिल्डरपुत्रानं पोर्शे कार अपघातानंतर काय म्हटलं
पैसे घ्या, पण... ; बिल्डरपुत्रानं पोर्शे कार अपघातानंतर काय म्हटलं.
BIG Breaking : आता सातबाऱ्यावर आईचंही नाव लागणार, कुणासाठी होणार नियम
BIG Breaking : आता सातबाऱ्यावर आईचंही नाव लागणार, कुणासाठी होणार नियम.
पॅन-आधार लिंक केलंय? नसेल केलं तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची
पॅन-आधार लिंक केलंय? नसेल केलं तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची.
पुणे अपघात अन् आरोप थेट अजितदादांपर्यंत, नार्को टेस्टची होतेय मागणी
पुणे अपघात अन् आरोप थेट अजितदादांपर्यंत, नार्को टेस्टची होतेय मागणी.
लोकसभेत पाठिंबा पण त्याबदल्यात आता मदत नाही? या निवडणुकीत मनसे vs भाजप
लोकसभेत पाठिंबा पण त्याबदल्यात आता मदत नाही? या निवडणुकीत मनसे vs भाजप.
राज्यात 40 पार कोण? महायुती की मविआ? काय म्हणताय राजकीय विश्लेषक?
राज्यात 40 पार कोण? महायुती की मविआ? काय म्हणताय राजकीय विश्लेषक?.
बिल्डरपुत्रान दोन जीव चिरडले अन व्यवस्थेन नियम तुडवले, धंगेकरांचा सवाल
बिल्डरपुत्रान दोन जीव चिरडले अन व्यवस्थेन नियम तुडवले, धंगेकरांचा सवाल.
ही भाषा नको, नेहमी छगन भुजबळांचं का ऐकून घ्यावं? राणेंचा करारा जवाब
ही भाषा नको, नेहमी छगन भुजबळांचं का ऐकून घ्यावं? राणेंचा करारा जवाब.
या निवडणुकीत काय होणार? ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही; दादा काय म्हणाले
या निवडणुकीत काय होणार? ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही; दादा काय म्हणाले.
या नशेडी व्यवस्थेत एका आमदाराचा मुलगा होता, नाना पटोलेंचा रोख कुणावर?
या नशेडी व्यवस्थेत एका आमदाराचा मुलगा होता, नाना पटोलेंचा रोख कुणावर?.