AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Israel-Hamas War | युद्धात इस्रायलसाठी हेच ‘सॅपर्स इंजिनिअर्स’ बाजी पलटवतील, कोण आहेत हे?

Israel-Hamas War | प्रत्यक्ष जमिनीवरच युद्ध लढण्याचा इस्रायली सैन्याचा असा आहे फुलप्रूफ प्लान. जमिनीवरच्या लढाईत कुठले-कुठले युनिट सहभागी असणार? कशा पद्धतीने आक्रमण होणार? जाणून घ्या, सर्वकाही.

Israel-Hamas War | युद्धात इस्रायलसाठी हेच 'सॅपर्स इंजिनिअर्स' बाजी पलटवतील, कोण आहेत हे?
Israel-Hamas War
| Updated on: Oct 16, 2023 | 11:12 AM
Share

जेरुसलेम : इस्रायली सैन्य एकाचवेळी अनेक आघाड्यांवर लढत आहे. पण खऱ्या युद्धाला आता सुरुवात होईल. युद्धाच काऊंटडाऊन सुरु झालं आहे. कुठल्याही क्षणी युद्धाची घोषणा होऊ शकते. इस्रायलचे हजारो सैनिक गाझा पट्टीजवळ उभे आहेत. फक्त आक्रमण या घोषणेची त्यांना प्रतिक्षा आहे. त्यानंतर गाझाच्या छोट्या, रुंद गल्ल्यांमध्ये भीषण युद्धाला सुरुवात होईल. इस्रायली सैन्य कुठल्याही क्षणी गाझा पट्टीत घुसू शकतं. फक्त पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या आदेशाची प्रतिक्षा आहे. गाझा पट्टीजवळ 10 हजारपेक्षा जास्त सैनिकांनी तळ ठोकला आहे. रणगाडे आणि रॉकेट लॉन्चर प्रकोप करण्यासाठी तयार आहेत. 2006 नंतर इस्रायली सैन्य पुन्हा एकदा मोठ जमिनी युद्ध लढणार आहे. हमासला मिटवून टाकण्यासाठी समुद्र, जमीन आणि हवेतून प्रहार करण्याची रणनिती आहे.

इस्रायली सैन्य अर्बन वॉर फेयर म्हणजे रहिवाशी भागात युद्ध लढण्यात पारंगत आहे. सध्या ग्राऊंड ऑपरेशनची फुल प्रूफ तयारी करण्यात आलीय. जेणेकरुन इस्रायली सैन्याच कमीत कमी नुकसान होईल. हमासला पूर्णपणे संपवण्याचा चंग इस्रायलयने केलाय. यशस्वी ऑपरेशनसाठी इस्रायली सैन्याला जमिनीवरच्या युद्धाची स्पेशल ट्रेनिंग देण्यात आलीय. जवानांना हमासचे दहशतवादी दिसताच, गोळ्या मारण्याची सूट आहे. इस्रायलकडून जमिनीवरच्या युद्धात कोण-कोण लढणार? ते समजून घ्या.

सॅपर्स इंजिनिअर्स काय करणार?

इन्फॅन्ट्री फोर्स, कमांडो, सॅपर्स ग्राऊंड ऑपरेशनची अमलबजावणी करतील. सॅपर्स इंजिनिअर्स या युद्धात महत्वाची भूमिका बजावतील. त्यांच्यावर बरच काही अवलंबून असेल. सॅपर्स इंजिनिअर्स इस्रायलच्या विजयाचा पाया रचतील. सॅपर्स इंजिनिअर्सवर भू-सुरुंग हटवण्याची जबाबदारी असते. गरज पडल्यास सॅपर्स इंजिनिअर्स पूल, इमारत, भिंत आणि टनेल उद्धवस्त करतील. गाझा पट्टीत अरुंद रस्ते आणि छोट्या-छोट्या गल्ल्या आहेत. अशावेळी सॅपर्स इंजिनिअर्सची भूमिका महत्त्वाची असेल. गाझा जिंकल्यानंतर काय करणार?

जमिनीवर युद्ध लढणाऱ्या सैन्याला इस्रायली एअरफोर्स आकाशातून कव्हर देईल. इस्रायली एअरक्राफ्ट, हेलिकॉप्टर आणि ड्रोन जमिनीवरील सैन्याला सुरक्षा देतील. बॉर्डर तसेच समुद्रातून आर्टिलरी आणि रॉकेट लॉन्चरने हल्ला करण्याची तयारी आहे. गाझा जिंकल्यानंतर काय करायच त्याचा प्लान सुद्धा तयार आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.