AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Israel Gaza War | इस्रायली सैनिकांनी वापरली अनोखी ट्रीक, हमासचे अतिरेकी लपलेल्या भुयारात भरले समुद्राचं पाणी

इस्रायलने हमासला संपविण्यासाठी सुरु केलेल्या युद्धाला अजूनही संपूर्ण यश आलेले नाही. गाझापट्टीत हमासचे अतिरेक्यांचा लपण्याचा अड्डा असलेल्या अनेक भुयारात आता इस्रायली डिफेन्स फोर्स अखेर समुद्राचे पाणी भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जहाज बुडायला लागल्यावर उंदीर कसे आधी बाहेर येतात तसे अतिरेकी बाहेर पडतील असा इस्रायलचा कयास आहे.

Israel Gaza War | इस्रायली सैनिकांनी वापरली अनोखी ट्रीक, हमासचे अतिरेकी लपलेल्या भुयारात भरले समुद्राचं पाणी
gaza tunnel
| Updated on: Jan 31, 2024 | 6:08 PM
Share

तेल अविव | 31 जानेवारी 2024 : हमासच्या अतिरेक्यांनी इस्रायलवर गेल्यावर्षी 7 ऑक्टोबर रोजी हल्ला केल्यानंतर इस्रायलने गाझापट्टीवर मोठा हल्ला करीत युद्ध छेडले आहे. या युद्धात प्रचंड मनुष्यहानी झाली आहे तरी गाझापट्टीत लपलेले हमासचे अतिरेकी काही केल्या शरण आलेले नाहीत. त्यामुळे अखेर इस्रायली डिफेन्स फोर्सने आता ‘उंगली तेडी’ करण्याचा निर्णय घेतला आहे. हमासचे अतिरेकी लपण्याचे अड्डे  असलेल्या त्यांच्या भुयारात आता इस्रायलने भूमध्य समुद्राचे पाणी टाकण्याचा निर्णय घेतला आहे. गाझातील 800 हून अधिक भुयारात पाणी भरले जाणार आहे. यासाठी इस्रायलने पंप देखील बसविले आहेत.

अमेरिकन वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये या संदर्भात बातमी आली आहे. इस्रायली सैन्याने पाच मोठे पंप भूमध्य समुद्राजवळ बसविले आहे. याद्वारे भुयारात समुद्राचे पाणी भरले जाणार आहे. हे पंप अल-शाती रेफ्युजी कॅंपच्या उत्तरमध्ये लावले होते. तेथे सुमारे दीड किलोमीटर लांब पाईपलाईन टाकली आहे. प्रत्येक पंपाची ताकद हजारो क्युबिक मीटर पाणी दर तासाला खेचण्याची क्षमता आहे. गाझापट्टीतील या भुयार लपून हमासचे अतिरेकी गमिमी काव्याने इस्रायली सैन्याशी लढा देत आहेत. या प्रकल्पाबाबत इस्रायलने अजूनही अधिकृत प्रतिक्रीया दिलेली नाही. गाझामध्ये पाण्याची कमतरता आहे. त्यामुळे अनेकांना हा प्रकल्प गाझातील पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी असावा असे वाटत होते.

 भूस्खलनचाही धोका

या भुयारात पाणी भरण्यापूर्वी त्याची नीट तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे ओलिसांची सुटका करणे सोपे होणार आहे. त्यानंतर त्यात कोणताही इस्रायली नागरिक नसल्याचे पाहूनच त्यात शेवटी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. तसेच या भुयारात पाणी गेल्यानंतर त्या टीकणार नाहीत असेही म्हटले जात आहे. काही महिन्यांनी ही भुयारे एकतर पाणी शोषून घेतील किंवा कमजोर होऊन नष्ट होतील असे म्हटले जात आहे.

भुजल स्तरावर होणार परिणाम ?

समुद्राचे पाणी अशा प्रकारे भुयारात टाकल्याने शहरातील पाणी पुरवठा आणि सिवेज सिस्टीमवरही परिणाम होईल असे म्हटले जात आहे.तसेच या प्रयोगाने गाझाच्या अंडरग्राऊंड पाण्याच्या भुजल स्तरावर याचा काय विपरित परिणाम होईल याचा विचार करावा लागणार आहे.

कुख्यात गुंड गजा मारणेच्या पत्नीला दादांच्या राष्ट्रवादीचे तिकीट
कुख्यात गुंड गजा मारणेच्या पत्नीला दादांच्या राष्ट्रवादीचे तिकीट.
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.