AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महासंकट येणार, अनेक देश बरबाद होणार, जपानी बाबा वेंगाची घाबरवणारी भविष्यवाणी; भारतासाठी किती चिंता?

जपानचे प्रसिद्ध भविष्यवेत्ता रयो तत्सुकी यांच्या भविष्यवाण्यांनी जगभर खळबळ उडाली आहे. त्यांच्या पूर्वीच्या अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत. आता त्यांनी 2025 मध्ये महाविनाशकारी त्सुनामीचा इशारा दिला आहे. ही त्सुनामी 2011 च्या जपानच्या त्सुनामीपेक्षा तीनपट मोठी असेल असा दावा आहे. यामुळे आशियातील अनेक देशांना धोका आहे.

महासंकट येणार, अनेक देश बरबाद होणार, जपानी बाबा वेंगाची घाबरवणारी भविष्यवाणी; भारतासाठी किती चिंता?
जपानी बाबा वेंगाची घाबरवणारी भविष्यवाणी
| Updated on: Apr 07, 2025 | 2:05 PM
Share

बाबा वेंगा आणि नास्त्रेदमसच्या भविष्यवाण्या लोकांमध्ये नेहमीच कुतुहूल निर्माण करतात. त्यांचे असंख्य घाबरणारे दावे खरे ठरले आहेत. त्यामुळे अख्खं जग हादरून गेलंय. आता अजून एक अशीच मोठी आणि घाबरवणारी भविष्यवाणी समोर आली आहे. जपानचे प्रसिद्ध कलाकार आणि भविष्यवेत्ता रयो तत्सुकी यांनी ही भविष्यवाणी केली आहे. रयो तत्सुकी यांना जपानचे बाबा वेंगा संबोधले जाते. रयो यांच्या मते जुलै 2025मध्ये जगात विनाशकारी आपत्ती येणआर आहे. ही आपत्ती आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या संकटांपैकी एक असणार आहे. विशेष म्हणजे रयो यांच्या भविष्यवाण्या यापूर्वीही खऱ्या ठरल्या आहेत. त्यामुळे त्यांनी आता केलेली भविष्यवाणी कुणीही सहज घेताना दिसत नाहीये. सर्वांनीच त्यांची भविष्यवाणी गंभीरपणे घेतली आहे.

रयो तत्सुकी यांनी 1995मध्ये त्यांच्या डायरीत एक भविष्यवाणी लिहिली होती. 25 वर्षानंतर म्हणजे 2020मध्ये जगात एक रहस्यमयी व्हायरस येईल. एप्रिलमध्ये या व्हायरसचा हाहा:कार होईल. पण काही काळासाठी तो शांत होईल आणि 10 वर्षानंतर पुन्हा हा व्हायरस येईल, अशी भविष्यवाणी रयो यांनी केली होती. 2020मध्ये कोव्हिड व्हायरस आला आणि जगाला मोठा ताप झाला. त्यामुळे रयोच्या भविष्यवाणीकडे संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं गेलं.

प्रिन्स डायना, कोबे भूकंप आणि त्सुनामी

रयो यांच्या सर्व भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत. 1991मध्ये त्यांनी फ्रेडी मर्करी यांच्या मृत्यूची भविष्यवाणी केली होती. त्यानंतर काही महिन्यानंतर मर्करीचा एड्सने मृत्यू झाला. 1995मध्ये त्यांनी भूकंपाचं स्वप्न पाहिलं होतं. जपानच्या कोबे शहरात नंतर भूकंप आला आणि त्यात सहा हजाराहून अधिक लोक मृत्यूमुखी पडले होते.

सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे 1992मध्ये त्यांनी स्वप्नात एका महिलेची आकृती पाहिली. त्याखाली लिहिलं होतं… ‘Diana? Died?’ त्यानंतर बरोबर पाच वर्षानंतर 31 ऑगस्ट 1997 रोजी ब्रिटेनची प्रिन्सेस डायनाचा मृत्यू झाला होता.

2025मध्ये काय घडणार?

रयो यांच्या डायरीत असंख्य भविष्यवाण्या आहेत. त्यांनी जगाला या भविष्यवाण्यांमधून सावध केलं आहे. जुलै 2025च्या आसपास जगाला आणखी एका विनाशकारी संकटाचा सामना करावा लागू शकतो. जुलै 2025 मध्ये जगात एक मोठी त्सुनामी दिसेल. जपानमध्ये 2011मध्ये आलेल्या त्सुनामीहून तीनपट मोठी ही त्सुनामी असेल. या नैसर्गिक संकटाने केवळ जपानलाच फटका बसणार नाही तर फिलिपाईन्स, तैवान, इंडोनेशिया आणि इतर देशांनाही त्याचा फटका बसणार असल्याचं रियो यांनी म्हटलंय.

जपानच्या आसपासच ही त्सुनामी येमार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. पण त्यामुळे भारताचीही चिंता वाढली आहे. यापूर्वी 26 डिसेंबर रोजी भारताने अशीच विनाशकारी त्सुनामी झेलली होती. ही त्सुनामी इंडोनियाच्या सागरी क्षेत्रात आलेल्या भूकंपामुळे निर्माण झाली होती. त्यामुळे निर्माण झालेल्या त्सुनामीमुळे दक्षिण भारतातील अनेक राज्यात हाहा:कार उडाला होता.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.