दोन भारतीय वंशाच्या अधिकाऱ्यांचा व्हाईट हाऊस सिक्‍युरिटी काऊंसिलमध्ये समावेश, बायडन यांची घोषणा

अमेरिकेचे (US) नवे अध्यक्ष जो बियडन यांनी शुक्रवारी (8 जानेवारी) दोन भारतीय वंशाच्या अधिकाऱ्यांचा व्हाईट हाऊस सिक्‍युरिटी काऊंसिलमध्ये समावेश केलाय.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 1:09 AM, 9 Jan 2021
दोन भारतीय वंशाच्या अधिकाऱ्यांचा व्हाईट हाऊस सिक्‍युरिटी काऊंसिलमध्ये समावेश, बायडन यांची घोषणा

वॉशिंग्टन : अमेरिकेचे (US) नवे अध्यक्ष जो बियडन यांनी शुक्रवारी (8 जानेवारी) दोन भारतीय वंशाच्या अधिकाऱ्यांचा व्हाईट हाऊस सिक्‍युरिटी काऊंसिलमध्ये समावेश केलाय. भारतीय-अमेरिकन सुमोना गुहा यांना दक्षिण आशियाच्या वरिष्ठ संचालकपदी (Senior Director) आणि तरुण छाबडा यांना औद्योगिक आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी (National Security) वरिष्ठ संचालकपदी नियुक्ती करण्यात आली. याशिवाय बायडन यांनी व्हाईट हाऊसच्या (White House) राष्ट्रीय सुरक्षा परिषदेतील इतर अनेक नियुक्त्यांचीही घोषणा केली (Joe Biden names two Indian americans in US national security council).

सुमोना गुहा (Sumona Guha) बायडन-हॅरिस कँपेनमध्ये दक्षिण आशिया परराष्ट्र नीतीचे (Foreign Strategy) कार्यकारी समूह सह-अध्यक्ष होते. ते स्टेट डिपार्टमेंट एजन्सीच्या पथकात काम करत होते. सुमोना गुहा सध्या अलब्राईट स्टोनब्रिज समुहात वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून काम करत आहेत. त्यांनी याआधी परराष्ट्र विभागाचे अधिकारी म्हणून आणि नंतर राज्य नीती नियोजन विभागाचे सचिव म्हणून काम केलेलं आहे.

ओबामा सरकारमध्ये गुहा बायडन यांचे सल्लागार होते

सुमोना गुहा ओबामा यांच्या कार्यकाळात बायडन उपराष्ट्राध्यक्ष असताना त्यांच्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा विभागाचे सल्लागार होते. गुहा यांनी जॉन्स हॉपकिन्स आणि जॉर्जटाऊन विद्यापिठातून शिक्षण घेतलंय. तेथेच तरुण छाबडा हे देखील औद्योगिक आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी वरिष्ठ सल्लाकार होते. गुहा जॉर्ज टाउन विश्वविद्यालयात सेंटर फॉर सिक्युरिटी अँड इमर्जिंग टेक्नोलॉजीत सीनिअर फेलोव आहेत.

तरुण राष्ट्रीय सुरक्षा परिषदेतही सहभागी

ओबामा-बायडन यांच्या काळात तरुण छाबडा यांनी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत रणनीती विभागाचे संचालक आणि मानवाधिकार, राष्ट्रीय सुरक्षेच्या मदुद्याचे संचालक होते. त्यांनी पेंटागनमध्ये रक्षा सचिवांचे एक भाषण लेखक म्हणूनही काम केलंय.

हेही वाचा :

डोनाल्ड ट्रम्पना हटवलं जाऊ शकतं का? कसे? वाचा ‘अमेरिकन यादवीतली’ मोठी बातमी

अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प समर्थकांचा धुडगूस, पोलिसांच्या गोळीबारात चौघांचा मृत्यू

स्पेशल रिपोर्ट: अमेरिका यादवी युद्धाच्या उंबरठ्यावर आहे का?

Joe Biden names two Indian americans in US national security council