History : अमेरिकेने 21 हजार लोकांना मृत्यूच्या दाढेतून वाचवलं, काय आहे जर्मनीच्या बुचेनवाल्डची घटना?

History : अमेरिकेने 21 हजार लोकांना मृत्यूच्या दाढेतून वाचवलं, काय आहे जर्मनीच्या बुचेनवाल्डची घटना?

आजच्याच दिवशी म्हणजे 11 एप्रिल रोजी (11 April History) 1945 मध्ये अमेरिकेच्या सैनिकांनी बुचेनवाल्ड छळ छावणीतील कैद्यांना मुक्त केलं होतं.

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Apr 11, 2021 | 4:41 PM

Buchenwald Concentration Camp : हजारो लोकांना मृत्यूच्या दाढेतून सुखरुप बाहेर काढणारी एक घटना आजही जगभरात आठवली जाते. या घटनेत हिटलरच्या नाझी सैन्याने लाखो निरपराध लोकांचं हत्याकांडही केलं होतं. ही घटना आहे दुसऱ्या जागतिक महायुद्धाची (Second World War). त्यावेळी केवळ यहूदींवरच अत्याचार झाले असं नाही तर अगदी स्वतःच्या देशासाठी लढणाऱ्या सैनिकांवरही जबरदस्ती करत क्रुरतेने वागवण्यात आलं. यावेळी अमेरिकेने पुढाकार घेत जर्मनीतील बुचेनवाल्ड छळ छावणीत (Buchenwald Concentration Camp Location) कैद असलेल्या हजारो लोकांचा जीव वाचवला होता. आजच्याच दिवशी म्हणजे 11 एप्रिल रोजी (11 April History) 1945 मध्ये अमेरिकेच्या सैनिकांनी बुचेनवाल्ड छळ छावणीतील कैद्यांना मुक्त केलं होतं (Know all about the history of 11 April 1945 about Buchenwald Concentration Camp and America).

अमेरिकेच्या सैनिकांनी जवळपास 21 हजार लोकांना या छळ छावणीतून सुरक्षित बाहेर काढलं. या 21 हजार पीडितांना जर्मनीच्या नाझी सैनिकांनी या छळ करण्याच्या उद्देशाने येथे कैद केलं होतं. दुसरं महायुद्ध संपल्यानंतर ज्या निवडक छळ छावण्यांमधील कैद्यांना मुक्त करण्यात आलं त्यापैकी ही छावणी होती (Buchenwald Concentration Camp Atrocities).

या छावणीतील कैद्यांकडून अमानुषपणे काम करुन घेतलं जात होतं. काम करुन घेताना पुरेसं अन्न न देणं, थकलेल्या शरीरामुळे काम करता न आल्यास अमानुष मारहाण करणं, आजारी कैद्यांनाही काम करण्यास भाग पाडत छळ करणं आणि बंडखोरीचा थोडासा प्रयत्न झाला तरी हत्या करणं असे अनेक प्रकार इथं करण्यात आले. यामुळे दर महिन्याला येथे शेकडो सामान्य नागरिकांचा बळी जात होता.

धोकादायक वैद्यकीय चाचण्यांसाठी आणि प्रयोगांसाठी थेट कैदेतील नागरिकांचा वापर

याशिवाय जर्मन सैन्य या छळ छावण्यांमधील कैद्यांवर अनेक धोकादायक वैद्यकीय प्रयोगही करायचे. नाझी सैन्यातील डॉक्टरांनी प्राण्यांवर करावयाचे प्रयोग थेट या कैदेतील माणसांवर केल्याने त्यांच्यावर अनेक दुष्परिणाम झाले. यात अनेकांचे जीवही केले.

56 हजार लोकांचा मृत्यू

या छळ छावणीतून बचावलेल्या एका कैद्याने या आठवणी आपण कधीही विसरु शकत नसल्याचं सांगितलं. जेव्हा केव्हा मला कुणी विचारतं की बुचेनवाल्ड छावणी कशी होती तेव्हा तेव्हा मला डोळ्यासमोर मृतदेह दिसायला लागतात (About Buchenwald Concentration Camp).’ या छावणीची सुरुवात 1937 मध्ये झाली होती. त्यानंतर 8 वर्षे सुरु राहिलेल्या या छळ छावणीत एकूण 2 लाख 50 हजारांपेक्षा अधिक पुरुष, महिला आणि लहान मुलांना ठेवण्यात आलं होतं.

या ठिकाणी जवळपास 56 हजार लोकांची हत्या करण्यात आली. यात यहूदी, रोमन आणि सोवियत कैद्यांचा समावेश होता. त्यांनी या छावणीच्या चार भिंतींमध्येच आपला अखेरचा श्वास घेतला (Buchenwald Concentration Camp Deaths). छळ छावणीतून वाचवण्यात आलेल्या अनेकांना आपण या छावणीतून जीवंत बाहेर पडत असल्यावर विश्वास बसला नाही.

हेही वाचा :

व्हायरल वास्तव : मोदी आणि हिटलरच्या ‘या’ फोटोमध्ये खरंच साम्य?

‘त्याने देखील स्टेडियमला स्वत:चं नाव दिलं होतं’, जितेंद्र आव्हाडांकडून पंतप्रधान मोदींची हिटलरशी तुलना

नरेंद्र मोदी नवीन भारताचे नवीन हिटलर : मनसे

व्हिडीओ पाहा :

Know all about the history of 11 April 1945 about Buchenwald Concentration Camp and America

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें