व्हायरल वास्तव : मोदी आणि हिटलरच्या 'या' फोटोमध्ये खरंच साम्य?

नवी दिल्ली : सत्ता मिळवण्यासाठी नेतेमंडळी काय करतील, याचा काही नेम नाही. अनेकदा सत्तेसाठी खोटे फोटो वापरत नेत्यांना ट्रोल करण्यात आल्याचे प्रकार अनेकदा समोर आलेत. नुकतंच काँग्रेसच्या सोशल मीडिया हेड दिव्या स्पंदना यांनी सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हिटलरचे साम्य असलेला एक फोटो शेअर केला. मात्र या फोटोची छेडछाड करत त्याचा वापर केल्याचे नेटकऱ्यांनी …

व्हायरल वास्तव : मोदी आणि हिटलरच्या 'या' फोटोमध्ये खरंच साम्य?

नवी दिल्ली : सत्ता मिळवण्यासाठी नेतेमंडळी काय करतील, याचा काही नेम नाही. अनेकदा सत्तेसाठी खोटे फोटो वापरत नेत्यांना ट्रोल करण्यात आल्याचे प्रकार अनेकदा समोर आलेत. नुकतंच काँग्रेसच्या सोशल मीडिया हेड दिव्या स्पंदना यांनी सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हिटलरचे साम्य असलेला एक फोटो शेअर केला. मात्र या फोटोची छेडछाड करत त्याचा वापर केल्याचे नेटकऱ्यांनी दिव्याच्या पोस्टवर कमेंट केली. तसंच दिव्या यांना नेटकऱ्यांनी ट्रोलही केलं

या फोटोमागचं वास्तव काय ? 

काही दिवसांपासून सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जर्मनीचा हुकूमशहा अॅडॉल्फ हिटलर लहान मुलासोबतचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोत हिटलर एका लहान मुलीचे कान ओढत आहे, तर दुसऱ्या फोटोत नरेंद्र मोदीही एका मुलाचे कान ओढताना दिसत आहेत. या फोटोवरुन नरेंद्र मोदी आणि हिटलरमध्ये साम्य असल्याचा दावा अनेक विरोधी पक्षांनी केला आहे. मात्र हा फोटो खोटा असल्याचे समोर आले आहे. त्याशिवाय काही समाजकंटकांनी फोटोसोबत छेडछाड़ केली असल्याचेही समोर आले.

या फोटोची सत्यचा पडताळली असता, हिटलरच्या खऱ्या फोटोत ते एका लहान मुलीसोबत उभे आहेत. त्यात त्यांनी तिच्या कानावर हात न ठेवता, तिच्या खांद्यावर हात ठेवला आहे. मात्र कुणीतरी फोटोशॉपच्या मदतीने हिटलरच्या फोटोसोबत छेडछाड केली आहे आणि हिटलरचा लहान मुलीचा कान पकडतानाच फोटो तयार केला.

त्याचप्रकारे नरेंद्र मोदींनी 31 ऑगस्ट 2014 मध्ये जपान दौऱ्यावेळी एका नायजेरियन मुलासोबत फोटो काढला होता. यावेळी त्यांनी त्या मुलाचे लाडात कानही ओढले होते. त्यानंतर हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.  मोदींनी काढलेला हाच फोटो कोलाज केला आणि हिटलर- मोदीमधील साम्य दाखवण्याचा प्रयत्न केला.

मात्र काँग्रेसच्या सोशल मीडिया हेड दिव्या स्पंदना यांना याबाबत कोणतीही माहिती नसल्याने त्यांनी हा फोटो शेअर केला. दिव्या यांनी हा फोटो शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांनी ‘फोटोशॉप है आंटी’ असे म्हणत ट्रोल केलं आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *