जगातील सर्वाधिक धोकादायक रस्त्यांची यादी जाहीर, भारताचा कितवा क्रमांक?

जगातील सर्वाधिक धोकादायक रस्ते असलेल्या देशांची आणि सर्वात सुरक्षित रस्ते असलेल्या देशांची यादी जाहीर करण्यात आलीय.

जगातील सर्वाधिक धोकादायक रस्त्यांची यादी जाहीर, भारताचा कितवा क्रमांक?


Most dangerous countries for driving नवी दिल्ली : जगभरातील 56 देशांमधील रस्त्यांचा अभ्यास करुन इंटरनॅशनला ड्रायव्हिंग ट्रेनिंग संस्थेने एक अहवाल प्रसिद्ध केलाय. यात जगातील सर्वाधिक धोकादायक रस्ते असलेल्या देशांची आणि सर्वात सुरक्षित रस्ते असलेल्या देशांची यादी जाहीर करण्यात आलीय. या यादीत भारताचा समावेश पहिल्या 5 देशांमध्ये करण्यात आलाय.

धोकादायक रस्त्यांच्या सुचीत पहिल्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिका हा देश आहे. या यादीत दक्षिण आफ्रिकेनंतर दुसऱ्या स्थानावर थायलंड आणि तिसऱ्या स्थानावर अमेरिका आहे. यानंतर भारताचं नाव येतं. या यादीत भारत चौथ्या क्रमांकाचा धोकादायक रस्ते असलेला देश आहे. या संस्थेने म्हटलंय, ‘आम्ही सर्व देशांचा 4 निकषांवर अभ्यास केला. प्रत्येक निकषावर या देशांना 10 पैकी गुण देण्यात आले. यानंतर या 5 निकषांना मिळालेल्या गुणांची सरासरी काढून संबंधित देशाला सरासरी गुण देण्यात आले.

रस्त्यांची सुरक्षितता निश्चित करण्यातील महत्त्वाचे निकष कोणते?

या संस्थेने सुरक्षित रस्त्यांच्या निकषात अनेक महत्त्वाचे निकष समाविष्ट केले होते. यात प्रत्येकी 1,00,000 लोकसंख्येमागे रस्त्यावर अपघातात होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण, वाहनाच्या पुढील सिटवर बसलेल्या प्रवाशांचं सिट बेल्ट वापरण्याचं प्रमाण आणि दारु किंवा इतर नशेचे पदार्थ घेऊन गाडी चालवणे, व्यसन करुन गाडी चालवताना झालेले मृत्यू अशा निकषांचा समावेश होता. ही आकडेवारी जागतिक आरोग्य संघटनेच्या ‘ग्लोबल हेल्थ ऑब्जर्वेटरी’मधील आकडेवारीवर आधारीत होती.

पहिल्या क्रमांकावरील दक्षिण आफ्रिकेकडून नाराजी

या संस्थेच्या अहवालात दक्षिण आफ्रिकेच्या रस्त्यांना सर्वाधिक धोकादायक रस्ते ठरवण्यात आलंय. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेतील जस्टिस प्रोजेक्ट एस ए (जेपीएसए) या संस्थेने यावर नाराजी व्यक्त केलीय. तसेच या निष्कर्षांना आव्हान दिलंय. ही संस्था एक गैर सरकारी संस्था असून दक्षिण आफ्रिकेतील रस्त्यांच्या अपघात संबंधी नियमांमध्ये सुधारणा व्हावी यासाठी काम करते. जेपीएसएचे अध्यक्ष हॉवर्ड देम्बोवस्की म्हणाले, “या यादीत जगातील सर्वात खराब रस्ते असलेल्या देशात दक्षिण आफ्रिकेचा समावेश योग्य नाही. यासाठी वापरण्यात आलेली आकडेवारी जुनी आहे.”

जगातील रस्त्यांवर प्रवास करण्यासाठी सर्वात सुरक्षित देश कोणता?

या अहवालानुसार, जगातील रस्त्यांवर प्रवास करण्यासाठी सर्वात सुरक्षित देश नॉर्वे हा आहे. यानंतर जपान दुसऱ्या क्रमांकावर आणि तिसऱ्या क्रमांकावर स्वीडन आहे.

हेही वाचा :

Road Accident | स्कॉर्पियो डिव्हाईडर ओलांडून ट्रकवर धडकली, नऊ प्रवाशांचा मृत्यू

महामार्गांवरील अपघातग्रस्तांचा जीव वाचवण्यासाठी पोलिसांची ‘हायवे मृत्यूंजय योजना’!

Ulhasnagar | महिलेला कारची धडक, चालकाकडून चक्कर येऊन पडल्याचा बनाव, CCTV मुळे अपघाताचा खुलासा

व्हिडीओ पाहा :

List of Most dangerous countries in world for safely driving

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI