अमेरिकेत भीषण स्फोट, मोठी खळबळ, तब्बल इतक्या लोकांचा मृत्यू, अमेरिकन सैन्यासाठी…
सध्या अमेरिका जगाचे केंद्रबिंदू बनली आहे. नुकताच अमेरिकेने चीनवर तब्बल 100 टक्के टॅरिफ लादला आहे. आता अमेरिकेतून खळबळ उडवणारी बातमी येत असून अमेरिकत मोठा स्फोट झाला असून अनेक लोकांची जीव गेली आहेत.

अमेरिकेतून एक अत्यंत हैराण करणारी बातमी पुढे येतंय. अमेरिकेतील दक्षिणेकडील टेनेसी राज्यात मोठा स्फोट झाला असून त्याचा धक्कादायक असा व्हिडीओ पुढे आलाय. या व्हिडीओवरून स्पष्ट होतंय की, हा स्फोट किती जास्त भयंकर आहे. या स्फोटात एकही व्यक्ती वाचू शकला नाहीये. स्फोट इतका शक्तिशाली होता की तो काही किलोमीटरपर्यंत दूर घरांना हादरा बसला. रिपोर्टनुसार, या स्फोटानंतर सर्वकाही उद्धवस्थ झाले असून सर्व लोक बेपत्ता आहेत. त्यांचे मृतदेह ओळखणे देखील कठीण आहे. 19 लोकांचे जीव या स्फोटामध्ये झाल्याचे सांगितले जात आहे. या स्फोटामुळे अमेरिकेत एकच मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच बचावकार्य घटनास्थळी पोहोचले आणि मदत सुरू केली. बेपत्ता लोकांचा शोध घेतला जात आहे.
इतका भयंकर स्फोट नेमका का झाला? याचे कारण अद्याप पुढे येऊ शकले नाहीये. अमेरिकेच्या संरक्षण विभाग आणि इतर कंपन्यांसाठी विविध प्रकारची स्फोटके येथे तयार केली जात असत. हिकमन काउंटीमधील बक्सनॉर्ट येथील अॅक्युरिटी एनर्जेटिक सिस्टम्स नावाच्या कारखान्यात हा स्फोट झाला. अमेरिकेच्या संरक्षण विभागासाठी येथे घातक स्फोटके तयार केली जात असत. मात्र, अचानक येथे मोठा स्फोट झाला आणि होत्याचे नव्हते झाले.
रिपोर्टनुसार, सकाळी 7.45 वाजता कारखान्यात मोठा स्फोट झाला. घटनास्थळाचे ड्रोन फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आणि काही फोटो बघितल्यावर स्पष्ट होते की, हा स्फोट किती जास्त भयंकर होता. स्फोटानंतर कारखान्याचे काहीच राहिले नाही. संपूर्ण कारखाना उद्धवस्थ झाला असून परिसराचे अत्यंत मोठे नुकसान झाले. कारखाना पूर्णपणे ढिगाऱ्यात गेलाय.
Major explosion hit the Accurate Energetic Systems factory in Bucksnort, Tennessee.
The blast destroyed a building, was felt up to 20 miles away, and left 19 workers missing.
Several deaths and injuries have been confirmed.
AES makes explosives for military and industrial… pic.twitter.com/D2PzZBJ4Ru
— Clash Report (@clashreport) October 10, 2025
कारखान्याच्या थोडी दूर वाहने पार्किंगमध्ये लावण्यात आली होती. त्या वाहनांचे देखील मोठे नुकसान झाले असून घटनास्थळावरील वाहनांना देखील आग लागल्याचे बघायला मिळाले. आता तपास यंत्रणांकडून हा स्फोट नेमका कसा झाला, याचा शोध घेतला जात आहे. या भयंकर स्फोटामुळे लोकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण बघायला मिळत आहे.
