AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nepal Flash Flood : चिखलाने माखलेले कपडे, खांद्यावर सिलेंडर… हे दृश्य पाहून अख्खं जग हेलावलं; हा माणूस आहे तरी कोण?

नेपाळमधील पूर आणि भूस्खलनाने शेकडो कुटुंब उद्ध्वस्त झाली. या भीषण आपत्तीत, नेपाळचे गृहमंत्री सुदन गुरुंग स्वतः चिखलात उतरून बचावकार्यात सहभागी झाले. ऑक्सिजन सिलेंडर उचलण्यापासून ते जखमींना मदत करेपर्यंत, त्यांचे व्हिडिओ व्हायरल झाले. काहीजणांनी कौतुक केले, तर काहीजणांनी त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

Nepal Flash Flood : चिखलाने माखलेले कपडे, खांद्यावर सिलेंडर... हे दृश्य पाहून अख्खं जग हेलावलं; हा माणूस आहे तरी कोण?
| Updated on: Sep 04, 2026 | 5:19 PM
Share

नेपाळमध्ये नुकताच आलेला महाभयानक पूर आणि भूस्खलनामुळे शेकडो कुटुंब उद्ध्वस्त झाली. अनेकांचा मृत्यू झाला, हजारो अजूनही बेपत्ता असून कित्येकांचं घर-दार, अख्खा संसार उघड्यावर पडलाय. त्रिशुली घाटी आणि भोटेकोशी भागात सगळं काही मोडून पडल्याचं, उद्ध्वस्त झालेलं दिसून आलं. अनेक लोक सुरुंगात अडकले, कित्येकांची घर वाहून गेली. मदत छावणीमध्ये हजारो बेघर लोकं मदतीसाठी वाट पहात आहेत.

याचदरम्यान, नेपाळच्या मंत्र्यांचा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये चिखलाने माखलेल्या कपड्यांमध्ये एक व्यक्ती रेस्क्यू टीमसोबत चालताना दिसतोय. त्याच्या खांद्यावर ऑक्सिजन सिलेंडर असून जवळच एका जखमी कामगाराला स्ट्रेचरवरून नेलं जात होतं. ना कुठे कडेकोट सुरक्षा ना मंत्र्यांचा तामझाम. ती व्यक्ती स्वतःच मदत आणि बचावकार्यात सहभागी झालेली दिसली. ही व्यक्ती म्हणजे नेपाळचे गृहमंत्री सुदन गुरुंग आहेत.

रेस्क्यू टीमसोबत उतरले मैदानात

पूर येत असताना सुदन गुरुंग त्रिशूली-3A हायड्रोपॉवर प्रकल्पाच्या बोगद्याजवळ रेस्क्यू टीमसोबत दिसले. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ते कधी ऑक्सिजन सिलेंडर उचलताना, तर कधी जखमींना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यासाठी मदत करत होते . मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी मदत छावण्यांनाही भेट दिली आणि तेथे राहणाऱ्या लोकांशी थेट संवाद साधला. त्यांच्या उपस्थितीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत.

एका व्हिडिओमध्ये तर ते चिखलाने भरलेल्या जमिनीवर कामगार आणि रेस्क्यू टीमच्या सदस्यांसोबत उभे असल्याचे दिसले. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये ते एका जखमी व्यक्तीला आधार देत होते. तसेच, मदत छावणीत ते लोकांमध्ये बसून त्यांच्या समस्या देखील ऐकत होते. या फोटोंनी आणि व्हिडीओंनी लोकांचं लक्ष वेधून घेतलं. अनेकांनी त्यांचा हा मदतीचा अंदाज पाहून कौतुक केलं . ते मंत्री कमी आणि रेस्क्यू टीमचे मदतनीस जास्त वाटतात अशा प्रतिक्रिया काहींनी सोशल मीडियावर दिल्या.

कोणी केलं कौतुक, तर कोणाचं टीकास्त्र

मात्र सुदन गुरुंग यांच्याबद्दल सर्वांचं मत एकसारखं नाही. नैसर्गिक आपत्तीच्या काळात एखाद्या नेत्याने थेट प्रभावित लोकांमध्ये पोहोचणे गरजेचं असतं, असं काही लोकांचं म्हणणं आहे. त्यांच्या मते, अशा वेळी लोकांना सरकार आपल्या पाठीशी ठामपणे उभे आहे, असा विश्वास मिळतो.

मात्र, काही लोकांनी याबाबत प्रश्नही उपस्थित केले. मदत आणि बचावकार्याचा योग्य समन्वय साधणे ही गृहमंत्र्यांची जबाबदारी आहे आणि त्यासाठी कमांड रूममधून काम करणे अधिक प्रभावी ठरू शकते. मंत्र्यांनी स्वतः चिखलात उतरून बचावकार्यात सहभागी होणे आवश्यक नव्हतं,असं म्हणत काहींनी टीकाही केली. तरीही सुदन गुरुंग यांच्या व्हायरल व्हिडीओची नेपाळमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.

Follow Us
ओबीसी आरक्षण संपता कामा नये! छगन भुजबळांचा महायुतीला घरचा आहेर; मराठा
Chhagan Bhujbal | ओबीसी आरक्षण संपता कामा नये! छगन भुजबळांचा महायुतीला घरचा आहेर; मराठा आरक्षणावरून सरकारला थेट सवाल
हृदयद्रावक घटना! राष्ट्रीय कुस्तीपटू अश्विनी पौळ यांनी तीन मुलांसह...
Dharashiv | नळदुर्ग किल्ल्यावर हृदयद्रावक घटना! राष्ट्रीय कुस्तीपटू अश्विनी पौळ यांनी तीन मुलांसह जीवन संपवलं; चौघांवर गुन्हा
बीडमध्ये उद्धव ठाकरेंची मोठी खेळी! 396 बूथप्रमुखांशी थेट संवाद
Uddhav Thackeray | बीडमध्ये उद्धव ठाकरेंची मोठी खेळी! 396 बूथप्रमुखांशी थेट संवाद; प्रत्येकासाठी 10 लाखांची पॉलिसी जाहीर
पक्षाच्या नावाचा दुरुपयोग करणाऱ्यांचा लवकरच निकाल लागेल ठाकरेंचा इशारा
Uddhav Thackeray | पक्षाच्या नावाचा दुरुपयोग करणाऱ्यांचा लवकरच निकाल लागेल! उद्धव ठाकरेंचा सज्जड इशारा
विनयभंग, जीवे मारण्याची धमकी; घरी 100 पुरुष पाठवतो म्हणाले!
Sanjay Gaikwad | विनयभंग, जीवे मारण्याची धमकी; घरी 100 पुरुष पाठवतो म्हणाले! संजय गायकवाडांविरोधात आरती आंबींची पोलिसांत तक्रार दाखल
पुण्याच्या पायाभूत सुविधांचा विकास आणि आधुनिक शहर निर्मितीचे फडणवीसांच
पुण्याला वेगवान गतिशीलता असलेलं शहर बनवणार
नागपुरात डीजेच्या आवाजावर पोलीस ॲक्शन मोडवर
नागपुरात डीजेवरील बंदीनंतर पहिली कारवाई
आंदोलक घोड्यावर बसून अंतरवालीत
आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा आंदोलक घोड्यावर बसून अंतरवालीत
बापटांची मराठी ट्रेंडिंग-सीएम फडणवीस
'बापटांची मराठी ट्रेंडिंग,मला ट्यूशनच घ्यावी लागेल'-सीएम फडणवीस
शरद पवारांची भेट, लगेच सुनेत्रा पवारांची भेट! काकडेंच्या दौऱ्याने...
NCP | शरद पवारांची भेट, लगेच सुनेत्रा पवारांची भेट! विक्रम काकडेंच्या दौऱ्याने राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चांना वेग