Nepal Violence : ते शस्त्रधारी कोण? नेपाळमधील हिंसेमागील चेहरा पहिल्यांदाच समोर, हिंदू राष्ट्र की कम्युनिस्टांच्या हातात सत्ता?
Nepal Student Protest Violence : नेपाळमध्ये गेल्या तीन दिवसांपासून विद्यार्थ्यांच्या आडून पंतप्रधान केपी शर्मा ओली यांचे सरकार खाली खेचण्यात आले. अर्थमंत्र्याला पळवू पळवू मारण्यात आले. पण कोणत्याही आंदोलनाचा खरा चेहरा समोर यायला थोडा वेळ लागतोच, तो आता समोर आला आहे.

नेपाळमध्ये गेल्या तीन दिवसांपासून उग्र प्रदर्शन दिसले. विद्यार्थी, नागरिक सोशल मीडियावरील बंदी आणि भ्रष्टाचाराविरोधात रस्त्यावर उतरले. अफगाणिस्तान, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेशानंतर भारताचा अजून एक देश अस्थिर झाला. नेपाळमधील हिंसेत अर्थमंत्र्याला पळवू पळवू मारण्यात आले. एका मंत्र्याच्या घराला लावलेल्या आगीत त्याची पत्नी जिवंत जळाली. या आंदोलनात 400 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या आडून सुरू झालेल्या या आंदोलनाचा खरा चेहरा आता समोर आला आहे. आंदोलकांमध्ये काही तरुणांच्या हाती थेट शस्त्र, रायफल्स दिसल्याने आंदोलन हे घडवून आणल्याची चर्चा होत आहे. लोकांच्या मनातील घुसमट समोर येत असतानाच त्यावर इतरांनी तर पोळी भाजली नाही ना? असा सवाल केल्या जात आहे. आता या आंदोलनामागे हिंदू संघटना आहेत की साम्यवादी संघटना आहेत हे लवकरच समोर येईल.
तो आरोप काय?
काही तज्ज्ञांच्या मते नेपाळला हिंदू राष्ट्र करण्याचा प्रयत्न सुरू आहे. राजेशाही पुन्हा आणण्याची तयारी करण्यात येत आहे. तर काही तज्ज्ञांच्या मते काही चीनधार्जिणे स्वार्थी समूह आणि राजकीय नेत्यांनी ही आग भडकवली. सत्ता उलथवून टाकण्यासाठी या लोकांनी रसद पुरवली. सुरुवातीला विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना समोर करण्यात आलं आणि नंतर या आंदोलकांमध्ये गुंड पेरण्यात आले. या आंदोलनाआडून सरकारी संस्था, औद्योगिक अस्थापना, कंपन्या, सरकारी कार्यालये, पोलीस स्टेशन यांच्यावर हल्ला करण्यात आले. मॉल्स, बँकांमध्ये लूट करण्यात आली. त्यासाठी हिंसक जमावाला प्रोत्साहित करण्यात आले. अनेक मंत्र्यांची घरं जाळण्यात आली. अर्थमंत्र्याला रस्त्यावर बेदम मारहाण करण्यात आली.
नेपाळमध्ये लष्करी राजवट
नेपाळमध्ये काल रात्रीपासून लष्करी राजवट लागू करण्यात आली. यावरूनही मोठे वादंग उठले आहे. लष्कराने नेपाळवर ताबा मिळवला आहे. यामागे चीनचा तर हाती नाही ना, याविषयीची जोरदार चर्चा सुरू आहे. नेपाळचे स्वातंत्र्य, सार्वभौमत्व, प्रादेशिक अखंडता,राष्ट्रीय एकतेसाठी लष्कर वचनबद्ध असल्याचे लष्करप्रमुख अशोक राज सिग्देल यांनी म्हटलं आहे. या सर्व घाडमोडींमागे काही असंतूष्ट गट कार्यरत होते असे बंदुकधारी आणि आधुनिक रायफलीधारी तरुण आंदोलनात दिसल्याने समोर आले आहे. बांगलादेशातही असेच चेहरे होते. पण त्यांच्या हातात बंदुका नव्हत्या. तर कट्टर धार्मिक विचार होता. श्रीलंकेतही अनेक तरुणांच्या हातात शस्त्र दिसली होती. पाकिस्तानमधील बंड लष्कराच्या दबावामुळे लागलीच मोडीत निघाले होते. तर अफगाणिस्तानमध्ये तालिबानहीच शस्त्रधारी संघटना आंदोलनाचे नेतृत्व करत होती.
