AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

न्यूज 9 ग्लोबल समीट: तज्ज्ञांनी शेअर बाजाराचे अल्टरनेट इन्व्हेस्टमेंट ऑप्शन सांगितले

पर्यायी गुंतवणूक करण्याकडे काही वर्षांत वेगाने वाढ होत आहेत. 2020 ते 2025 दरम्यान सोन्याची किंमतीत मोठी वाढ झाली आहे. क्रिप्टोमध्ये बिटकॉईनने 2021 चा रेकॉर्ड तोडला आणि दुबईसारख्या शहरात रिअर इस्टेटची मागणी मोठी वाढली आहे.

न्यूज 9 ग्लोबल समीट: तज्ज्ञांनी शेअर बाजाराचे अल्टरनेट इन्व्हेस्टमेंट ऑप्शन सांगितले
| Updated on: Jun 19, 2025 | 7:29 PM
Share

देशातील सर्वात मोठा न्युज ग्रुप TV9 नेटवर्कचा दुसरा ग्लोबल समिट दुबईत भरला आहे. या ग्लोबल समिटमध्ये अनेक मोठ्या मुद्यांवर चर्चा झाली आणि टीव्ही 9 नेटवर्कच्या या व्यासपीठावर अनेक बड्या हस्तींनी महत्वाची माहीती शेअर केली आहे. या समिटमधील एका शानदार पॅनल डिस्कशनमध्ये गुंतवणूकीच्या जगाला नवी दिशा दाखवण्यात आली. या चर्चासत्रात पर्यायी गुंतवणूक म्हणजे आल्टरनेट इन्व्हेस्टमेंटवर चर्चा झाली. ज्यात सोने, क्रिप्टोकरन्सी आणि रिअर इस्टेट सारख्या पर्यायांकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले. पॅनलमध्ये एंड्रयू नायलर, मुराली मलयप्पन, पंकज रजदान आणि फिरोझ अझीझ सारख्या मोठ्या तज्ज्ञांनी सहभाग घेतला.

क्रिप्टोने केली शानदार कमाई

पॅनल चर्चासत्रात एंड्रयू नायलर यांनी सांगितले की एका वर्षात निफ्टीने 9 टक्के रिर्टन दिला आहे. जो ठीक-ठाक आहे. परंतू सोन्याने 36%, क्रिप्टोने 56% आणि दुबईतील रिअर इस्टेटने 15-20% टक्क्यांची ग्रोथ दाखवली आहे. हे आकडे सांगतात की लोक त्यांच्या पैशाला डायव्हर्सिफाय करु इच्छीत आहेत. शेअर बाजारातील चढ उताराची भीती आणि पर्यायी गुंतवणूकीतून मिळालेला चांगला परतावा यातून हा बदल दिसून येत आहे.

मुराली मलयप्पन यांनी सांगितले की पर्यायी गुंतवणूक गेल्या काही वर्षात वेगाने वाढत आहे. 2020 ते 2025 दरम्यान सोन्याच्या किंमतीत झालेली वाढ, क्रिप्टोत बिटकॉईनने 2021चा रेकॉर्ड तोडला आणि दुबईसारख्या शहरात रिअल इस्टेटची मागणीने आकाश गाठले आहे.

सोन्यावर जादा भरोसा

सोन्यात गुंतवणूक करणे हे गुंतवणूकदारांसाठी सुरक्षित पर्याय राहीला आहे. या चर्चा सत्रात फिरोज अझीझ यांनी सांगितले की जेव्हा जगात अनिश्चितेचे वातावरण असते तेव्हा लोक सोन्याच्या मागे धावतात. गेल्या एक वर्षांत सोन्याने 36% चा रिटर्न दिला आहे. तो निफ्टीच्या 9% हून किती तरी अधिक आहे.

एंड्रयू नायलर यांनी सांगितले की सोन्याच्या दागिन्याशिवाय ETFs आणि गोल्ड बॉन्ड्समध्ये देखील गुंतवणूकीचा चांगला पर्याय आहे.गेल्या दहा वर्षांत याचा परतावा सरासरी 8-10% राहीला आहे.जो शेअरपेक्षा कमी आहे, परंतू रिस्क देखील कमी आहे. भारतातील संस्कृतीत सोन्याचे महत्व यास खास बनवत आहे. परंतू बऱ्याच काळापासून शेअरसारखा नफा मिळवणे कठीण आहे.

क्रिप्टोकरेन्सी: रिस्की, परंतू रॉकेट

क्रिप्टोकरेन्सीच्या जगात बिटकॉईनने धूम मचवली आहे. पंकज राजदान याने सांगितले की गेल्या एक वर्षांत क्रिप्टोने 56% टक्क्यांचे रिटर्न दिले आहे. 2024 मध्ये बिटकॉईन 64,960 डॉलर होता, जे 2025 मध्ये 104,919 डॉलर झाले होते. हा रिटर्न निफ्टी आणि सोन्याहून कमी आहे. परंतू आता यात जोखीम देखील मोठी आहे.

फिरोज अझीज यांनी सांगितले की ज्यांचा टेक्नॉलॉजीवर विश्वास आहेत असे 18-35 वर्षांचे तरुण क्रिप्टोत गुंतवणूक करीत आहेत.परंतू यात चढउतार खूपच टोकाचा असल्याने सावधानता देखील बाळगली पाहीजे. भारतात क्रिप्टोवर टॅक्स आणि नियम कठोर आहेत. परंतू युएईत यावर कोणतीही बंदी नाही.त्यामुळे येथे क्रिप्टो करन्सीचे क्रेझ वाढले आहे. रिसर्च केल्याशिवाय क्रिप्टोत गुंतवणूक करणे धोकादायक होऊ शकते.

दुबईच्या शानदार वाढीला रिअल इस्टेटने दिली चालना

रिअल इस्टेट हा नेहमीच गुंतवणुकीचा एक खात्रीशीर मार्ग राहिला आहे आणि दुबईमध्ये तो आणखीच शानदार आहे. मुरली मलयप्पन म्हणाले की, 2024-25 मध्ये दुबईमध्ये निवासी मालमत्तेच्या किमती 15-20% ने वाढल्या. भाड्याने मिळणाऱ्या उत्पन्नाचे उत्पन्न 6-8% आहे, जे युरोप किंवा अमेरिकेपेक्षा जास्त आहे. दुबईमध्ये मालमत्तेची मागणी इतकी वाढली की 2024 मध्ये 1,000 हून अधिक नवीन प्रकल्प सुरू झाले आणि हा ट्रेंड 2025 मध्येही सुरूच आहे.

भारतातील अनिवासी भारतीय आणि गुंतवणूकदार दुबईमध्ये फ्लॅट खरेदीकरून भाडे मिळवत आहेत. परंतु त्यात मोठा पैसा गुंतवावा लागतो आणि लगेच पैसे काढणे सोपे नसते. तरीही, दुबईची रिअल इस्टेट हा दीर्घकालीन एक मजबूत पर्याय आहे, विशेषतः जेव्हा मालमत्तेचे मूल्य सतत वाढत असते असे पंकज राजदान यांनी सांगितले.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.