AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

News9 Global Summit : अमेरिकेचं टॅरिफ धोरण भारतासाठी मोठी संधी

टीव्ही 9 नेटवर्कतर्फे दुबईमध्ये ‘न्यूज 9 ग्लोबल समिट’चे दुसऱ्यांदा आयोजन करण्यात आलं आहे. या समिटची थीम भारत-यूएई भागीदारी: समृद्धी आणि प्रगतीसाठी अशी आहे. गुरुवारी या समिटमध्ये ‘टेक्टोनिक टॅरिफ : नेव्हिगेशन द न्यू वर्ल्ड ऑर्डर' या विषयावर चर्चा करण्यात आली.

News9 Global Summit : अमेरिकेचं टॅरिफ धोरण भारतासाठी मोठी संधी
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 19, 2025 | 4:30 PM
Share

टीव्ही 9 नेटवर्कतर्फे दुबईमध्ये ‘न्यूज 9 ग्लोबल समिट’चे दुसऱ्यांदा आयोजन करण्यात आलं आहे. या समिटची थीम भारत-यूएई भागीदारी: समृद्धी आणि प्रगतीसाठी अशी आहे. गुरुवारी या समिटमध्ये ‘टेक्टोनिक टॅरिफ : नेव्हिगेशन द न्यू वर्ल्ड ऑर्डर’ या विषयावर चर्चा करण्यात आली. या चर्चेमध्ये WTO चे माजी भारतीय राजदूत जयंत दासगुप्ता, सीएसईपीचे अध्यक्ष डॉ. लवीश भंडारी आणि बेवर्ली हिल्स पोलो क्लबचे सीईओ अजय बिंदू हे सहभागी झाले होते.

चर्चेचा मुख्य विषय हा अमेरिकेनं टॅरिफ धोरणात अचानक केलेला मोठा बदल हा होता. 1938 नंतर करण्यात आलेली ही सर्वात मोठी वाढ असल्याचं अनेक तज्ज्ञांनी म्हटलं आहे. अमेरिकेनं टॅरिफमध्ये प्रचंड वाढ केली, या वाढीमुळे जगभरातील धोरणकर्त्यांपुढे मोठं आव्हान निर्माण झालं आहे. अमेरिकेच्या नव्या टॅरिफ धोरणाचा जागतिक व्यापाराला मोठा फटका बसू शकतो, या धोरणामुळे जागतिक व्यापाराचे नियम अस्थिर झाले आहेत. मात्र या अस्थिरतेच्या काळात एक नवा पर्याय म्हणून उदयास येण्याची भारताला मोठी संधी आहे, असा या पॅनलमधील चर्चेचा सूर आहे.

पॅनलने असं म्हटलं की, भारताची मजबूत देशांतर्गत मागणी, राजनैतिक समज आणि अलिकडच्या काळात झालेल्या धोरणात्मक सुधारणा हे सर्व घटक जगतिक पुरवठा साखळीत महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. अमेरिकेनं चीनवर प्रचंड टॅरिफ लावलं आहे, त्यामुळे भारताला ही एक चांगली संधी आहे.

दरम्यान या चर्चेमध्ये भारत आणि यूएईमधील व्यापक आर्थिक भागीदारी करारावर देखील भर देण्यात आला. तज्ज्ञांच्या मते हा करार द्विपक्षीय व्यापार धोरणाचे एक उत्तम उदाहरण आहे. हा करार भविष्यामध्ये एक उत्तम उदाहारण म्हणून पुढे येऊ शकतो.

दरम्यान जगातील वाढता आर्थिक राष्ट्रवाद आणि सध्या मोठ्या देशांमध्ये सुरू असलेल्या संघर्षांवरही पॅनलमध्ये सहभागी झालेल्या तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. अनेक आंतरराष्ट्रीय संघटनांमधून अमेरिकेनं घेतलेली माघार आणि देशांतर्गत उत्पादनावर दिलेला भर, या बदलामुळे जागतिक पुरवठा साखळीत व्यत्यय येऊ शकतो, अशी भीतीही यावेळी व्यक्त करण्यात आली आहे. हा काळ निश्चितच प्रचंड आव्हानांनी भरलेला आहे, असंही पॅनलने म्हटलं आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.