AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pahalgam Terror Attack : तुरुंगात बंद असलेल्या दहशतवाद्यांच्या चौकशीतून पहलगाम हल्ल्याबद्दल मोठा खुलासा

Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यासंदर्भात एक महत्त्वाची माहिती मिळाली आहे. तुरुंगात बंद असलेल्या लश्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यांच्या चौकशीतून हा खुलासा झाला आहे.

Pahalgam Terror Attack : तुरुंगात बंद असलेल्या दहशतवाद्यांच्या चौकशीतून पहलगाम हल्ल्याबद्दल मोठा खुलासा
Pahalgam Terror Attack
| Updated on: May 05, 2025 | 12:42 PM
Share

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तपासात महत्त्वाचा खुलासा झाला आहे. आता मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना कमांडोजसारखी ट्रेनिंग देण्यात आली होती. जम्मू-काश्मीरच्या तुरुंगात बंद असलेल्या लश्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यांच्या चौकशीतून हा खुलासा झाला आहे. पहलगामच्या हल्लेखोरांना पाकिस्तानच्या स्पेशल सर्विस ग्रुप (SSG) कमांडोजसारखी ट्रेनिंग देण्यात आली होती. 15-20 असे कमांडर काश्मीर खोऱ्यात आहेत, जे परदेशी दहशतवाद्यांच्या छोट्या-छोट्या ग्रुप्सच नेतृत्व करत आहेत. भारतीय सुरक्षा यंत्रणांच मोठं नुकसान करणं हाच ISI चा मुख्य उद्देश असल्याच समोर आलय. याआधी तीन मोठ्या हल्ल्यात SSG कमांडोज सहभाग समोर आलाय.

गगनगीर, गांदरबलमध्ये 7 नागरिकांची हत्या, बूटा पथरी हल्ला, लष्कराच्या ताफ्यावर हल्ला 2 जवान शहीद, 2 पोर्टरचा मृत्यू, पहलगाम हल्ला, तपास यंत्रणांना याबद्दल महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. आता तपास यंत्रणांचा सर्व फोकस SSG ट्रेनिंग घेतलेल्या या कमांडर्सचा शोध घेण्यावर आहे. कारण काश्मीर खोऱ्यासाठी हे दहशतवादी धोकादायक बनले आहेत.

सहानुभूती बाळगणाऱ्यांवर कारवाई

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर तपास यंत्रणांकडून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांबद्दल सहानुभूती बाळगणाऱ्यांविरोधात सुद्धा कठोर कारवाई सुरु आहे. मागच्या काही दिवसात काश्मीर रीजनमध्ये 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचे समर्थक आणि त्यांच्याबद्दल सहानुभूती बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्यात आलीय.

तपास यंत्रणांना महत्त्वाचे पुरावे मिळाले

कुपवाड़ा रीजनमध्ये 15, हंदवाडामध्ये 12, पुलवामामध्ये 14 जणांवर पब्लिक सेफ्टी एक्ट अंतर्गत कारवाई करण्यात आलीय. सूत्रांनुसार, पब्लिक सेफ्टी एक्टअंतर्गत संशयितांच्या घरावर कारवाई करण्यात येईल. एनआयए सूत्रांनुसार, या कारवाईने आता गती पकडली आहे. ओवर ग्राऊंड वर्कसच्या चौकशीतून तपास यंत्रणांना महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत.

सशस्त्र दहशतवाद्यांचा पर्यटकांवर हल्ला

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तपास एनआयए करत आहे. एनआयए आधी ओवर ग्राऊंड वर्कसची चौकशी करुन पुरावे गोळा करत आहे. पहलगाम दहशतवादी हल्ला 22 एप्रिलला झाला. निशस्त्र लोकांना टार्गेट करण्यात आलं. सशस्त्र दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. यानंतर भारताने पाकिस्तान विरुद्ध काही कठोर पावलं उचलली आहेत.

सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?.
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?.
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा.
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?.
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.