War: पाकिस्तान की अफगाणिस्तान, कोणत्या देशाची ताकद जास्त? कोण ठरणार वरचढ? वाचा
Pakistan vs Afghanistan Military Power: पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सीमेवरील तणाव वाढला आहे. पाकिस्तानने सर्वप्रथम तालिबानवर क्षेपणास्त्रे डागली. याला प्रत्युत्तर देताना शनिवारी रात्री अफगाणिस्तानने पाकिस्तानवर हल्ला केला. त्यामुळे आता आगामी काळात युद्ध पेटण्याची शक्यता आहे. या दोन्ही देशांकडे किती सैनिक आहेत, कोणती शस्त्रे आहेत याची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सीमेवरील तणाव वाढला आहे. पाकिस्तानने सर्वप्रथम तालिबानवर क्षेपणास्त्रे डागली. याला प्रत्युत्तर देताना शनिवारी रात्री अफगाणिस्तानने पाकिस्तानवर हल्ला केला. ड्युरंड रेषेजवळील बहरामपूर जिल्ह्यात झालेल्या या हल्ल्यात 58 पाकिस्तानी सैनिक ठार झाले आहेत. आता अफगाणिस्तानने पाकिस्तानच्या 25 चौक्याही ताब्यात घेतल्या आहेत. तसेच 7 सैनिकांना ओलीस ठेवले आहे. त्यामुळे आता आगामी काळात युद्ध पेटण्याची शक्यता आहे. या दोन्ही देशांकडे किती सैनिक आहेत, कोणती शस्त्रे आहेत याची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
पाकिस्तानची ताकद काय आहे?
ग्लोबल फायरपॉवरच्या 2025 च्या लष्करी पॉवर रँकिंगनुसार पाकिस्तान हा सर्वात शक्तिशाली सैन्य असणारा जगातील 12 व्या क्रमांकाचा देश आहे. 2024 मध्ये पाकिस्तानने संरक्षण क्षेत्रावर 10.2 अब्ज डॉलर्स (जीडीपीच्या 2.7%) खर्च केले. पाकिस्तानच्या लष्करात एकूण 1704000 कर्मचारी आहेत. तसेच पाकिस्तानकडे 1399 लष्करी विमाने आहेत. तसेच 1839 रणगाडे आहेत. पाकिस्तानकजे सागरी सीमेचे रक्षण करण्यासाठी नौदल देखील आहे.
अनुबॉम्ब
अनुबॉम्बवर 2023 मध्ये जगाने 91.4 अब्ज डॉलर्स खर्च केले, त्यापैकी पाकिस्तानने 1 अब्ज डॉलर्स खर्च केले. भारताच्या अण्वस्त्र चाचण्यांनंतर पाकिस्ताननेही 1998 मध्ये अनुबॉम्ब विकसित केला होता. CSIS नुसार, पाकिस्तानचे अण्वस्त्रे प्रामुख्याने मोबाइल लघु आणि मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक मिसाईलवर आधारित आहेत. चीनकडून मदत मिळाल्याने पाकिस्तानची अण्वस्त्रे आणखी मजबूत झाली आहेत.
शस्त्रे खरेदी
2015 ते 2019 आणि 2020 ते 2024 या काळात पाकिस्तानच्या शस्त्रास्त्र आयातीत 61% वाढ झाली. या काळात, पाकिस्तानने लढाऊ विमाने आणि युद्धनौकांसह अनेक शस्त्रांची खरेदी केली. पाकिस्तान हा जागतिक स्तरावर पाचवा सर्वात मोठा शस्त्रास्त्र आयातदार देश आहे. 2020 ते 2024 या काळात पाकिस्तानने चीनकडून 81% शस्त्रे आयात केली.
अफगाणिस्तानची ताकद
ग्लोबल फायरपॉवरच्या 2025 च्या लष्करी पॉवर क्रमवारीत अफगाणिस्तान 118 व्या क्रमांकावर आहे. तालिबानचे सैन्य हलक्या शस्त्रांनी सुसज्ज आहे. देशात हवाई दल, नौदल किंवा आधुनिक तोफखाना कॉर्प्स नाही. लष्करी सिद्धांत अनियमित आणि विखुरलेला आहे. तालिबानकडे 80 हजार लष्करी कर्मचारी आहेत. तसेच 30000 निमलष्करी दलाचे कर्मचारी आहेत.
अफगाणिस्तानकडे 50 (एमबीटी) रणगाडे आहेत. 300 बख्तरबंद वाहने (एएफव्ही), 40 लढाऊ विमाने, 30 हेलिकॉप्टर, 15 वाहतूक विमाने, 10 ए-29 सुपर टुकानो, 20 एमआय-17 हेलिकॉप्टर आणि 10 यूएच-60 ब्लॅकहॉक हेलिकॉप्टर्स आहेत. अफगाणिस्तानकडे प्रगत क्षेपणास्त्र प्रणाली नाहीत. तालिबान सरकारला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता नाही. त्यामुळे या देशाकडे आधुनिक शस्त्रे नाहीत. तालिबानची ताकद ही गनिमी युद्धात आहे. त्यांच्याकडे दीर्घकाळ लढण्याची क्षमता आहे.
